भारतीय रेल्वे फक्त श्रीमंताचीच ?

   


  आपण भारतीय लोक टीव्हीवर  दिल्ली  येथील शेतकऱ्यांचा आंदोलना विषयक बातम्या बघण्यात  मग्न असताना केंद्र सरकारकडून भारतीय रेल्वेत दोन अत्यंत महत्वाचे बदल करण्यात आले .  हे दोन्ही बदल भारतीय रेल्वे निव्वळ श्रीमंतांचीच का ? अशा प्रश्न उपस्थित व्हावा असे होते . पारंपरिक माध्यमांतून या विषयी फारशी चर्चा न झाल्याने त्याविषयी सांगणारी ही पोस्ट 

       तर मित्रानो भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागांतर्गत येणारे 11 मार्ग कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्तावाला भारतीय रेल्वे बोर्डाची मान्यता मिळणे.  आणि भारतीय रेल्वेची उपकंपनी असणाऱ्या IRCTC ( Indian Railway catering and Tourist Cooperation ) मधील आपला  आतापर्यंत असणारा 87.5%  वाटा हा 75% वर आणणे हे आहेत 

         भारतीय रेल्वेकडून बंद करण्यात आलेल्या .11 .मार्गांपैकी  9 मार्ग हे मीटरगेज चे आहेत .तर 2 हे ब्रॉड गेज आहेत . या रेल्वमार्गावर प्रचंड तोटा होतो असे   कारण यासाठी रेल्वेतर्फे देण्यात येत आहे . सध्या भारतीय रेल्वेमार्फत विविध मीटरगेज आणि नॅरो गेजचे  रेल्वेमार्ग ब्रॉड गेज मध्ये करण्याचेकाम सुरु असल्याने 9 मार्ग बंद करणे एकवेळ समजू शकते मात्र राहिलेल्या दोन रेल्वेमार्गामुळे भारतीय रेल्वे सर्वसामान्यांची नसून धन धांडग्याची तर बनलेली नाही ना ? अशा प्रश्न उपस्थित होतो . या  11 मार्गांपैकी बहुसंख्य मार्ग हे गुजरात राज्यातील असून यां अकरा मार्गांपैकी सगळ्यांत छोटा मार्ग हा साडेसहा किलोमीटरचा आहे तर सर्वात मोठा वर्ग  63 किमीचा आहे तर लांबीच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मार्ग 53 किमीचा असून या सर्व मार्गांची एकत्रित लांबी ही  226 किमी आहे . याबाबत स्थानिकांची अद्याप पर्यंत काहीही प्रतिक्रिया आलेली नाही . मात्र भविष्यात येते का ? हे बघणे उत्सुकतेचे ठरेल . 


भारतीय रेल्वेचे प्रत्यक्ष खाजगीकरण शक्य नसल्याने उप कंपन्यांचा माध्यमातून सरकारने रेल्वेचे खाजगीकरण करण्यास सुरवात केली आहे . त्याच मालिकेत भारतीय रेल्वेच्या 17  प्रमुख उप कंपन्यांपैकी आघाडीची रेल्वे कंपनी असणाऱ्या IRCTC ( Indian Railway catering and Tourist Cooperation ) या कंपनी मधील सध्याचा आपला  आतापर्यंत असणारा 87.5%  वाटा हा 75% वर आणण्याची तयारी सरकारने सुरु केली आहे , काही महिन्यापूर्वीच 100% असणारा आपला IRCTC मधील   वाटा आय पी ओ मार्फत  87.5 केला होता जो आता सेबीच्या नॅशनल स्टॉक एक्झेज यामध्ये लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांमध्ये ज्यांचे  10%जास्त भागभांडवल असणाऱ्या शेअरधारकांसाठी जलद निधी उप्लब्धतेअसाठी असणाऱ्या  ऑफर फॉर सेल या तरतुदीचा आधार घेत पुन्हा 12.5% टक्याने कमी करत 75% करण्याचे ठरवले आहे 

भारतीय रेल्वे ही  गोर गरिबांच्या प्रवाश्याचे एक महत्वाचे साधन म्हणून ओळखले जाते .त्यातील हे बदल त्यांच्यावर निश्चितच परिणाम करतील मात्र त्याची तीव्रता कशी असेल ? हे बघणे आवश्यक आहे बघूया भविष्याच्या पेटाऱ्यात   अजून काय आहे . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?