देशातील अंतर्गत धूसमुस

                   

 आज सध्या आपल्या भारतात कृषी कायद्याविरोधात राळ उठवले असताना, भारतातील मिझोराम आणि त्रिपूरा, तसेच पंजाब आणि हरीयाणा या दोन एकमेकांबरोबर सीमा आणि राजधानी शेअर करणाऱ्या राज्यांत वादाची ठिणगी पडलेल्या आहेत . तसे आपल्या भारताला दोन शेजारच्या राज्यात वाद निर्माण होणे नवे नाही , दोन्ही राज्यातून वाहणाऱ्या नद्या , अथवा सीमाच्या बाबत निश्चित मानांकन न झाल्याने आपल्या भारतात दोन शेजारच्या राज्यात आपल्या भारतात कायमस्वरूपी वाद चालूच असतात . मात्र सध्याचा अशांत अस्थिर  वातावरणात असे वाद उफाळून येणे अधिक धोक्याचे आहे . त्यातही असा वाद जर त्रिपुरा आणि मिझोराम अश्यासारख्या देशाच्या संरक्षणासाच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या  महत्वत्त्वाच्या राज्यातील असेल तर परिस्थिती अजूनच बिकट होते , त्याचप्रमाणे पाकिस्तानसारख्या राष्ट्राला लागून असणाऱ्या पंजाब आणि भारताच्या प्रमुख औद्योगिक राज्यात समावेश असणाऱ्या पंजाब आणि हरियाणा या राज्यातील वाद असेल तर मग विचारायलाच नको , अश्या प्रकारचे राज्यांतर्गत असणारे वाद सोडवण्यासाठी घटनेने आखून दिलेल्या चौकटीतील मार्ग यावेळी कुचकामी पडतात . प्रादेशिक अस्मितांना प्रचंड धुमारे फुटतात त्यामुळे नवीन प्रश्न निर्माण होतात हे सांगायचे कारण  म्हणजे गेल्या काही  दिवसतात मिझोराम आणि त्रिपूरा, तसेच पंजाब आणि हरीयाणा या दोन एकमेकांबरोबर सीमा आणि राजधानी शेअर करणाऱ्या राज्यांत  घडलेल्या घटना 
           पहिले पंजाब आणि हरियाणा या राज्यातील वाद बघूया . 
तर मित्रानो पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी एकच आहे ती म्हणजे चंदिगढ . आणि सध्या दोन्ही राज्यातील वादाचा मुद्दा देखील चंदिगढ हाच आहे . आजमितीस चंदिगढ दोन्ही राज्याची सामाईक राजधानी आहे . जी 1947 साली पंजाबचा काही भाग पाकिस्तानात  जाताना, त्यावेळचा अविभक्त पंजाबची राजधानी  असणाऱ्या  लाहोरचा समावेश पाकिस्तानात झाल्यामुळे,  पंजाबची नवी राजधानी म्हणून उभारण्यात आली होती. त्यावेळेच्या पंजाबात आताच हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि सध्याचा पंजाबचा समावेश होत होता या अविभिक्त पंजाबमधून हिंदी भाषिकांचा प्रदेश सन 1966 साली वेगळा काढण्यात आला हो म्हणजे सध्याचे हरियाणा राज्य पुढे 1972 पंजाबमधील डोंगराळ भागाचे नवीन राज्य करण्यात आले ते म्हणजे हिमाचल प्रदेश या हिमाचल प्रदेशची राजधानी आहे  .शिमला तर पंजाब आणि हरियाणाची राजधानी आहे चंदिगढ . पंजाब मधून हरियाणा वेगळा करताना पुढील दहा वर्ष दोघांची संयुक्त राजधानी म्हणून चंदिगढ असेल असे ठरले होते ,या काळात हरियाल स्वतःची राजधानी  उभारायची होती जे झाले नाही आणि वादाला सुरवात झाली  पंजाबमधील प्रमुख राजकीय पक्ष असणाऱ्या अकाली डाळीची प्रारंभापासून मागणी आहे की पूर्णतः चंदिगढ पंजाबला मिळावे . तर हरियाणाच्या त्यास विरोध आहे  आठवड्यापूर्वी हरियाणा  विधानसभेच्या एका पोटनिवाडणुकीत एका उमेदवाराने प्रचारादरम्यान  मला निवडून दिल्यास चंदिगढ हरियाणाला देण्यास केंद्र सरकारला भाग पाडू अश्या प्रकारचे विधान केल्यामुळे या वादाला पुन्हा तोंड फुटले 

आता बघूया त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यातील वाद बघूया 
त्रिपुरा आणि मिझोराम हे दोन्ही राज्य बांगलादेश या देशाच्या चितगाव या विभागाला लागून आहेत . चितगावला लागूनच म्यानमारच्या राखाइन हे राज्य आहे जे रोहिंग्या मुस्लिमा बांधवांमुळे  चर्चित आहे . बांगलादेशातील चकमा हे आदिवासी देखील याच भागात  राहतात हि झाली भौगोलिक आणि जनजातीय विविधता , या विभागात सुरु असणारा विवाद सुरु झाला तो ऑगस्टच्या 15 तारखेपासून .जेव्हा या भागातील फूलडुंगसेई या गावातील 130 नागरिकांकडे त्रिपुरा आणि मिझोराम या दोन्ही राज्यातील दोन्ही राज्यांचे रेशन कार्ड,  मतदार कार्ड  आहेत आणि ते नागरिक दोन्ही राज्यातील लोककल्याणकारी यॊजनाचा फायदा घेतात ही बाब त्रिपुरा राज्यलीत प्रशासनाला समजल्यावर या  गावावर त्रिपुरा राज्याने दावा केला 1 ऑक्टोबर रोजी स्थानिक आदिवासी संघटना सॉंग्रॉन्ग्मा यांनी या ठिकाणी शंकराचे मंदिर आणि समाजमंदिरबांधण्यास सुरवात केली ज्याला मिझोराम प्रशासनाने विरोध करता या ठिकाणी संचारबंदी लागू केली . परिसरातील वाढता तणाव बघता केंद्राने याठिकाणी निमलष्करी दले आणि  केंद्रीय पोलीस दलांची नेमणूक केली 22 ऑक्टोबर रोजी या भागातून संरक्षण दलाई काढून घ्यावीत आणि हा भाग कधीही त्रिपुराचा नव्हता असे पात्र मिझोरामच्या गृहसचिवांनी त्रिपुराच्या गृहसचिवांना पाठवल्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली , सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे

.   याच मिझोरामच्या  राज्यचा आसाम या राज्याबरोबर सीमा सीमा विवाद असल्याचे आपणास माहिती असेलच त्या ठिकाणी देखील स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती भारताला असे विवाद परवडणारे नाहीत याचे लवकरात  लवकर निवकरण होवो अशी सदिच्छा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?