मार्केंडेय ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेला गड मार्केंडय !


        आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोकण आणि उर्वरीत महाराष्ट्राला वेगळी करणारी पर्वतरांग म्हणजे सह्याद्री पर्वतरांग. उत्तरेला साल्हेर मुल्हेर या डोंगरी किल्यापासून सुरु होवून कोल्हापूरला संपणारी ही डोंगररांग. जर मुख्य शाखेचा विचार केला असता सुमारे 600 किमी (नाशिक पुणे रस्त्यावर लागणारे घाट या सह्याद्रीच्या उपशाखेमुळे लागतात, या उपशाखा वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहेत) या डोंगररांगेत अनेक देवस्थाने आहेत. त्यापैकीच एक म्हणजे राम रावण युद्दात लक्ष्मण मुर्च्छीत होवून पडल्यावर  त्याचे प्राण वाचवण्यासाठी भगवान हनुमान हिमालयातून संजिवनी वनस्पतीचा डोंगर घेवून जात असताना त्याचा पडलेल्या तूकड्यावर वसलेले देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धै पीठ असणारे  शक्तीपीठ अर्थात सप्तश्रूंगी. या सप्तश्रूंगी पर्वतासमोरच अजून एक पर्वत आहे. ज्यावर ध्यानस्थ होवून मार्केंडेय ऋषींनी सप्तशतीचा पाठ केला ,जो देवीने ऐकला असी श्रद्धा आहे तो म्हणजे मार्केंडयचा डोंगर.
.             नाशिक जिल्ह्यात दिंडोरी आणि कळवण या तालूक्याचा सीमारेषेवर असलेल्या या पर्वतावर मी नुकताच नाशिकमधील विविध समाजोपयोगी कार्य करणाऱ्या गरूडझेप प्रतिष्ठानच्या गिर्यारोहकांबरोबर गिर्यारोहण केले. तसा हा माझा गरुडझेपच्या गिर्यारोहणाकांच्या बरोबरीचा तिसरा ट्रेक . मात्र आधीच्या ट्रेकपेक्षा हा ट्रेक अनेक बाबतीत वेगळा होता. कारण या आधीचे ट्रेक हे हिवाळ्यात केले होते. ज्यावेळी पाउस पडत नव्हता, मात्र मार्केंडेयचा हा ट्रेक मात्र हिवाळा म्हणावा की पावसाळा म्हणावा , अश्या प्रकारच्या हवामानात केला. बेमोसमी आलेल्या पावसामुळे आपण मार्केंडेय ऋषींंच्या मंदीरापर्यत पोहचू शकू का ? अश्या धास्तीत असणाऱ्या मला गरुडझेपच्या अन्य सदस्यांमुळे वरती कधी पोहोचलो?, ते समजलेच नाही.

            वरती पोहोचल्यावर आम्ही तेथील मंदीरात रामरक्षा, गीतेतील कर्मयोगाचे महत्व सांगणारे श्लोक, मारुतीस्त्रोत आदी श्लोकांचे पठण केले. जेवण केले आणि जेवनानंतर मंदिर परीसराची स्वच्छता केली.  मार्केंडय या पर्वतावर चढाईचे 3 मार्ग आहेत .काहीसा धोकादायक असणारा सप्तश्रुंगी देवी पर्वतावरुन येणारा मार्ग , सापुतारा -कळवण या मार्गावरुन चढाईचा दुसरा मार्ग तर , आम्ही निवडलेला तिसरा मार्ग कळवण- धोडंब -पिंपळगाव बसवंत मार्गावरील मार्केंडय बारीपासूनचा मार्ग .
अनेकदा धडदाकट माणसे छोट्यासा अडचणीमुळे अयोग्य मार्गाचा अवलंब करतात .मात्र स्वतः अस्थि दिव्यांग असून देखील 1जानेवारी ते 15 मार्च या 75 दिवसात तब्बल 11वेळा कळसूबाई हे शिखर पादाक्रांत करुन विश्वविक्रम करणाऱ्या अंजली प्रधान दोनच दिवसापुर्वी हरीहर शिखर सर करुन आपल्यामध्ये आज आलेल्या आहेत, हे समजल्यावर अत्यंत स्फुरणच आले. गिर्यारोहण हा तसा तरुण रक्ताचा खेळ समजला जातो. नोकरी करुन  निवृत्त झाल्यावर साधारण माणसे याही क्षेत्रातून माघार घेतात. मात्र बि एस एन एल मधून निवृत्त झाल्यावर देखील या क्षेत्रात पाय रोवून असणारे आणि चालताना सातत्याने नव्या गोष्टींची माहिती करुन घेण्यासाठी संवाद साधणारे कुलकर्णी सर, दिन दुबळ्यांना कायद्याची सेवा देणारे भावसार दाम्पत्य,  महिलांना विविध विषयावर जागृत करण्यासाठी  उत्सुक असणाऱ्या वैशाली चव्हाण मँडम , त्यांचा मुलगा आदित्यवर्धन, संदिप भानोसे सर , त्यांची मुलगी रेणू, अंजली प्रधान यांची भाच्चे मंडळी  यांच्या संगतीत ट्रेक कधी संपला समजलेच नाही. 

वाटेत उतरत असताना अचानक समोर आलेल्या वानरसेनेला समोर जाताना कुलकर्णी सर, भानोसे सर यांनी केलेल्या मदतीचे मोल अवर्णीयच आहे.
मी हा ट्रेक केला तो डिसेंबर 2020 रोजी. मात्र बदलत्या हवामानामुळे  मला हिवाळ्याचा दिवसात पावसाळी हवेचा मनमुराद आनंद लूटता आला.
ट्रेकवरुन परताना वणी गावातील देवीचे दर्शन घेवून घरी परतलो. ते पुन्हा एकदा लवकरात लवकर ट्रेकवर जायचे हाच हेतू मनात धरुन!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?