स्वागत उत्तरायणचे -


 आपण लॉक डाउनच्या काळात सर्वांनी महाभारत बघितले आहेच . त्यात सांगितले आहेच  की,  या महाभारताच्या युद्धात मृत्यूशयेवर पडलेले असताना उत्तररायणाची वाट बघत असतात . उत्तरायण सुरु असताना प्राण जाणे शुभ समजले  म्हणून ते उत्तररायणाची वाट बघत असतात   \तर मित्रानो , आपल्याकडे विशेष शुभ मानल्या गेलेल्या उत्तररायणाचा प्रारंभ मंगळवारी २२ डिसेंबरला होत आहे . त्यानिमित्याने सर्वांना उत्तररायणाचा सुरवात होण्यासंदर्भात मनापासून शुभेच्छा हे का होते ते आता बघूया 
  पृथ्वी सूर्याभोवती फिरते , हे आता सर्वमान्य झाले आहे . याचा आपल्याला दृष्यपरिणाम म्हणजे सूर्याचे रोज बदलणारे स्थान . सामान्यतः आपण सूर्य पूर्वेला उगवतो असे मानतो . मात्र संपूर्ण वर्षात फक्त दोनच दिवस असतात ज्या दिवशी सूर्य वास्तविक पूर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो पूर्व दिशेपासून काही अंश उजव्या अथवा डाव्या बाजूला म्हणतात . यास सूर्याचा भासमान भ्रमण मार्ग म्हणतात . आपण शेजारील चित्रात तो बघू शकतात .  या भासमान भ्रमणात सूर्य  जेव्हा त्याच्या डाव्या  हाताच्या सगळ्यात कडेच्या बिंदूपर्यत पोहोचतो . ज्या बिंदूपासून तो परत    उजवीकडे भासमान भ्रमण सुरु करतो तो दिवस म्हणजे उत्तरायण सुरु होण्याचा दिवस जो  या वर्षी रविवार 22डिसेंबर 2019  रोजी आहे .

                  मित्रानो , उत्तरायण सुरु झाल्याने आता दिवसाचा कालावधी हळूहळू वाढत जाईल . ही प्रक्रिया  22 जून 2020 पर्यंत सुरु राहील . आपल्या भारतीय पंचांगानुसार पूर्वी या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असे
. मात्र पृथीच्या परांचन गतीमुळे तो सध्या 15 जानेवारीला होतो . हे सूर्याचे मकर राशीत भासमान भ्रमण आपण मकर संक्रांत म्हणून साजरे  करतो  खरेतर हा  उत्तरायण सुरु झाले याचा आनंदोत्सोव असतो . महाभारत युध्द्धच्या वेळी सुद्धा पितामह भीष्म यांनी आपले प्राण उत्तरायण सुरु होण्यापर्यंत रोखून धरले होते .
पृथीवर विविध ऋतू निर्माण होण्यासाठी हे उत्तरायण आणि दक्षिणायन महत्वाची भूमिका बजावतात . या दिवशी उत्तर गोलार्धात वर्षातील सगळ्यात छोटा दिवस आणि सगळ्यात मोठी रात्र असते तर दक्षिण गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सगळ्यात छोटी रात्र असते . या दिवसापासून उत्तर ध्रुवावर दिवस होण्यास सुरवात होते . तर अशा हा दिवस जो आपल्यासाठी अत्यंत महतवाचा आहे . तर एकमेकांना उत्तरायण दिनाच्या शुभेच्छा देऊन आपण हा दिवस साजरा करूया , मी तर चाललो हा दिवस साजरा कारण्यासाठी आपण येताय ना ? 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?