उरल्या फक्त आठवणी... त्या काळरात्रीच्या


ख्रिसमसची सुट्टी आनंदीत घालवण्यासाठी ते समुद्रकिनारी आले होते. मात्र हा दिवस आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस असणार आहे, याची त्यांना पुसटशी देखील कल्पना नव्हती. हवामान खात्यातर्फे  कोणत्याही वादळाची पुर्वसुचना देण्यात न आल्याने ते आनंदाने समुद्राचा लाटांशी खेळत होते. मात्र याच समुद्राचा लाटा आपल्या प्राणांचे हरण करणार आहेत, याबाबत त्यांना  काहीच माहिती नव्हती. जपानमध्ये या प्रकारचे संकट नवीन नसले तरी , ते ज्या प्रदेशात समुद्रात मज्जा करत होते, त्या प्रदेशात या प्रकारचे संकट आल्याचा कोणताही ज्ञात इतिहास नव्हता. त्यामुळे ते बिनधास्त समुद्राच्या लाटांशी खेळत होते. ते ज्या ठिकाणी होते. तिथे नुकतेच उजाडले होते. त्यामुळे सर्व जण निवांतपणे समुद्रकिनारी फिरत होते. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. हे त्या संकटावरुन दिसून येत आहे .
      कारण कोणाच्या ध्यानीमनी नसताना जागतिक प्रमाणवेळेनूसार रात्री 12 वाजून 58 (जिथे ही घटना घडली त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजून 58 मिनीटे { भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजून 28 मिनीटे}) मलेशियाचा उत्तर बेटाच्या पश्चिमेला समुद्रात रिक्टर स्केलवर 9 पेक्षा थोडा जास्त तिव्रतेचा भुकंप झाला. आणि  या भुकंपामुळे समुद्रात मोठ्या उंचीचा लाटा उसळल्या, ज्या वेगाने किनाऱ्याकडे आल्या , आणि  हिंदी महासागराला लागून असणाऱ्या 11 देशातील समुद्र किनाऱ्यावरील  लाखो लोकांना आपल्यातून कायमच्या दूर अनंताच्या प्रवाश्याला घेवून गेल्या, आणि 2004 डिसेंबर 26 हा दिवस एक काळा दिवस म्हणून इतिहासात नोंदवला गेला.

आज आपण या घटनेला मलेशियाची त्सुनामी म्हणून ओळखतो. लाखो लोकांना यमदर्शनास पाठवणारा , कोट्यावधी रुपयांचे नुकसान करणारा हा भुकंप झाला भारतीय भुप्पट (इंडीयन प्लेट, ) आणि बर्मा भुप्पट( बर्मा प्लेट) यांच्या टक्करीमुळे . रिक्टर स्केलवर याची तिव्रता 9.1 ते 9.3 इतकी प्रचंड होती. या भुकंपामुळे समुद्रात 15 ते20 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या . ज्यामुळे भारत , मालदिव, श्रीलंका  या देशांसह आशियान संघटनेतील देशांमध्ये मृत्यूचे तांडव घडले. आज 2020साली या घटनेला 16 वर्षे पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने या भुकंपात आपलेल्या सोडून गेलेल्या  अभागी जणांना भावपुर्ण आदरांजली.
      या भुकंपानंतर हिंदी महासागरात अशी कोणतीही आपत्ती आल्यास त्याची पुर्वसुचना देण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली. जी यंत्रणा उभारण्यात भारताचे योगदान प्रचंड प्रमाणात आहे.  श्रीलंकेचे एक महत्त्वाचे क्रिकेट स्टेडीयम यामुळे पुर्णतः खराब झाले होते. सध्या ते स्टेडीयम पुर्वपदावर आले आहे, मात्र यासाठी श्रीलंकेला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला होता. सुदैवाने  यानंतर जपानमध्ये 2011 मार्चमध्ये  असी आपत्ती  एकदा आली असली तरी, या नंतर  प्रदेशात असी आपत्ती आलेली नाही. 
या आपत्तीमुळे आपल्यापैकी अनेकांना त्सुनामी हा जपानी शद्ब माहिती झाला . जपानच्या या समस्येविषी जगाला  समजले. त्यानंतर झालेल्या भुकंपामध्ये सातत्याने त्सुनामी हा शद्ब ऐकयला मिळू लागला. या भुकंपामुळे पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेगात किंचीत घट झाली. ज्यामुळे दिवसाचा कालावधी काही मायक्रो सेंकदांनी वाढला . 

ही घटना मानवजातीवर दुरगामी परीणाम होती, याबाबत कोणाच्याच मनात संशय नसावा. आपल्या सुदैवाने आपणास 2011च्या मार्च महिन्यात आलेल्या जपानच्या भुकंपाचा अपवाद वगळता इतके भीषण तांडव आपण बघीतले नाही. ही शांतता अशीच रहावी, अशी इश्वरचरणी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?