स्मरण जग बदलणाऱ्या त्या तीन दिवस तीन .रात्रीचे

 


  भारतातील कोणत्याही राज्यातील रहिवासी असो, स्वामी विवेकांनद यांचे नाव ऐकताच नतमस्तक होतोच . स्वामी विवेकानंद यांचे शिकागो , येथील सुप्रसिद्ध भाषण त्याला मिळालेला प्रतिसाद याविषयी प्रत्येकाने कधीना कधी ऐकले असतेच कन्याकुमारी येथील शिलास्मारकाला पण आपल्यापैकी अनेकांनी भेट दिली असेल . स्वामी विवेकांनदानी आपल्या पारिजावर्क अवस्थेत असताना भेट दिलेल्या अखेरच्या काही ठिकाणांपैकी एक असणाऱ्या कन्याकुमारी येथे त्यांनी दिन दिवस तीन रात्र ध्यान केले होते . हे ध्यान करत असतानाच त्यांना , अमेरिकेत सर्वधर्म परिषदेत जाण्याविषयी , त्यांचे गुरु रामकृष्ण यांच्या दृष्टांत झाला , अशी आख्यायिका सांगण्यात येते . स्वामी विवेकांनद यांनी हे ध्यान 25 ते 27 डिसेंबर 1892रोजी केले होते . या 20 ला या घटनेला 128 वर्षे पूर्ण होईल . ध्यानात स्वामी विवेकानंदाना आपले कार्य  कोणत्या दिशेने   नेता येईल , असे समजले आणि त्यांनी सेवा कार्यासाठी रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ यांची स्थापना केलीया ध्यानाच्या आधी त्यांनी समस्त  भारतातील परिस्थितीचे अवलोकन केले होते , या पारिजावर्क अवस्थेतील खेत्रीच्या  महाराजांची भेट झाल्याचा प्रसंग ,लोकमान्य टिळकांची मुंबई -पुणे रेल्वेप्रवासात झालेली भेट  काकडी घाटाचा प्रसंग आदी प्रसंग सर्व ज्ञात आहे

       या ध्यानामध्ये स्वामी विवेकानंद याना एका काळी  जगत गुरु असणाऱ्या  भारताची अवनती का झाली ? जर भारताला परत जगत गुरु पदावर विराजमान होयचे असल्यास काय करावे लागेल ?  . भारताच्या आत्माअसणाऱ्या सनातन धर्माचा झालेला ऱ्हास भरून येण्यासाठी काय करावे लागेल ? याचा दृष्टांत झाला ? त्यांनी  पारिजावर्क अवस्थेत जे समाज बांधव विप्पन्न अवस्थेत बघितले होते , त्यांचा उद्धारासाठी काय करता येईल याबाबत  दृष्टांत  झाला . स्वामी विवेकानंदांच्या आयुष्याचा अभ्यास करता आपणास हे लक्षत येते की , या पासून स्वामी विवेकानंदांच्या कार्याने प्रचंड गती घेतली , जी आजही अव्याहतपणे सुरु असल्याचे आपणास दिसते .स्वामी विवेकानंद यांचे कार्य एका ब्लॉगपोस्टचा विषय नाहीच . तरी इथेच थांबतो , नमस्कर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?