श्रुष्टीचा विलोभनीय चमत्कार ! गुरु शनी एकत्र

     

     मित्रानो, येत्या 16  डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत  सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी आकाशात पश्चिमेला एक नाट्य रंगणार आहे. हे नाट्य सुमारे 400 वर्षानंतर घडत आहे , ज्याचा सर्वोच्च बिंदू हा  21 डिसेंबर हा असणार आहे . जर आपण हे नाट्य बघायला विसरलो तर , आपणास हे नाट्य बघायला थेट 2089 ची वाट बघावी , लागेल , अर्थात तो पर्यंत आपण असण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने ही संधी चुकवणे आपणस अत्यंत महाग पडू शकते . या नाट्यातील प्रमुख पात्र आहेत गुरु ग्रह आणि शनी ग्रह .
       तर मित्रानो ,  16  डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत गुरु ग्रह आणि शनी ग्रह यातील  पृथीसापेक्ष कोनीय अंतर अत्यंत कमी असणार आहे . ज्यामुळे गुरु ग्रह आणि शनी ग्रह हे वेगवेगळे न दिसता  एकत्रच दिसणार आहेत . त्यामुळे दोन्ही ग्रहांचा प्रकाश एकत्र होऊन आकाशात एकच मोठा ग्रह असल्याचे पृथीवरून दिसेल . पृथ्वीवर हा  देखावा विषवूत्तवार सर्वात उत्तम दिसणार आहे . याचा परमोच्च क्षण हा 21 डिसेंबर हा असणार आहे ,या  दिवशी या दोन ग्रहातील कोनीय अंतर फक्त 0.0060  अंश असणार आहे .मानवी डोळा  0.0025 अंशापर्यंत फरक ओळखू शकतो . हे बघता यातील गमंत लक्षात येऊ शकते . 
                    शनी ग्रह सूर्याभोवती पृथ्वीच्या एका वर्षाचा विचार करता साडे 29 वर्षात एक फेरी पूर्ण करतो . तर गुरु ग्रह 11.86 वर्षात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो . त्यामुळे दर  20 वर्षांनी गुरु ग्रह आणि शनी ग्रह हे एकमेकांच्या जवळ येतात . मात्र 2020 साली जितके जवळ आले आहेत तितके  जवळ येण्याचा प्रसंग सुमारे 400 ते 800 वर्षांनी जवळ येतात . सध्या गुरु आणि शनी हे मकर राशीत आहेत . त्यामुळे जर तुम्हाला मकर राश आकाशात ओळखता आल्यास तुम्ही या गोष्टीचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतात . सध्या सूर्य वृश्चिक राशीत असल्याने मकर रास  सूर्यास्तानंतर लवकर उगवते आणि मावळते . ( सूर्य ज्या राशीत असतो ती रास  आकाशात तर दिसतच नाही . मात्र राशीचक्रातील त्या पुढच्या राशी सूर्यास्तानंतर  लवकर उगवतात  आणि लवकर मावळतात . त्यामुळे मकर रास लवकर मवाळणार  आहे  ) त्यामुळे येत्या आठवड्याभरत तुम्ही सूर्यस्तानंतर लगेच आकाशदर्शन केल्यास तुम्ही या नाट्याचा आंनद ,मनमुराद घेऊ शकता 

हाच नव्हे तर , कोणताही खगोलीय चमत्कार बघण्यामुळे काहीही अनुचित होत नाही . अर्थात सूर्यग्रहणासारख्या काही गोष्टी बघताना डोळ्यांचे नुकसान होऊन अंधत्व येऊ नये म्हणून काही खबरदारी घ्यावी लागते ,इतकेच .ती घेतली की, खगोलीय चमत्कार बघण्यासारखे स्वर्गसुख नाही .  हा चमत्कार सध्या डोळ्याने देखील दिसू शकतो , मात्र द्विनेत्री ( Binocular ) अथवा दुर्बीण (Telescope ) असल्यास उत्तम आहे . मग बघताय ना श्रुष्टि चमत्कार .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?