मकर संक्रातीच्या निमित्ताने(भाग 2)

 


मकर संक्राती  हा सूर्याशी संबंधित सण असल्याचे आपणस माहिती आहेच . जो 14 जानेवारी किंवा  15 जानेवारीला साजरा करण्यात येतो सुर्याचे उत्तरायण आणि  मकर राशीत भासमान भ्रमण सुरु होण्याचा निमित्ताने हा सण साजरा करण्यात येतो हे ही आपणास माहिती आहेच .त्यातील उत्तरायण आणि मकर संक्राती चा सहसंबंध आपण  याआधीच्या भागात बघितला . आता सूर्य मकर राशीत जातो म्हणजे जय होते ते बघूया ज्यांना उत्तरायण आणि मकर संक्रातीचा संबंदात माहिती वाचायची आहे ते या लेखाच्या खाली दिलेल्या लिंक वॉर क्लीक करू शकतात 

तर मित्रानो , पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गाने फिरते या लंबवर्तुळाचा दोन केंद्रांपैकी एका केंद्राच्या ठिकाणी सूर्य असतो हे आपणास माहिती असेलच (केप्लर चे नियम ) पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचे स्थान बदलते त्यामुळे काही दिवाशांनी पृथ्वीवरून दिसणारे आकाश बदलते . प्राचीन लोकांनी या वर्षभरत दिसणाऱ्या या आकाशाचे बारा भागात विभाजन केले आणि त्यास राशी असे नाव दिले . जसे मकर रास , कुंभ रास मीन रास वगैरे , पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत फिरताना ज्या भागात असते त्या समोर येणारा  भाग सूर्यामुळे पृथीवरून बघताना दिसत नाही, आणि आपण सूर्य त्या राशीत आहे  असे म्हणतो , साधारतः हा बदल इंग्रजी महिन्याचा 14/ 15 तारखेस होतो , आपल्या भारतीय पंचांगानुसार त्यास संक्रात म्हणतात  अश्या बारा संक्रात आहेत . मात्र मकर संक्रात विशेष प्रसिद्ध आहे . जर एखादा ग्रह आणि सूर्य जर एकाच भागात असेल तर तो ग्रह सूर्यप्रकाशामुळे आपणास दिसत नाही आणि आपण त्या ग्रहाचा अस्त झाला असे म्हणतो . हा ग्रहाचा अस्ताच्या कालावधी त्या ग्रहाच्या सूर्याभोवताली फिरण्याचा वेगावर आणि पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेगावर अवलुबुन असतो . जो जास्तीत जास्त एक महिन्याचा असतो . प्रत्येक ग्रहाचा वर्षभरत एकदा अस्त  होतोच . 

           आपल्या सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती वेगवेगळ्या वेगाने फिरतात ,जसे पृथ्वी सूर्याभोवती  29 किमी प्रति सेकंद या वेगाने तर मंगळ  24 किमी प्रति सेकंद या वेगाने सूर्याभोवती फिरतात त्यामुळे बुध आणि शुक्र या ग्रहाचा अपवाद वगळता पृथ्वीवरून निरीक्षण करताना कधीकधी  इतर ग्रह मागे जात असल्याचे भासते (प्रत्यक्षात ते आपल्या गतीने पुढेच येत असतात ) त्यास ग्रहाचे वक्रि  चलन म्हणतात .

मकर राशीसंदर्भात खगोलीय दृष्टिकोनातून माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न होता जो आपणस आवडला असेलच अशी आशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो जाता जाता सर्वांनां मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा , तिळगुळ घ्या गॉड गॉड बोला 

उत्तरायण आणि मकर संक्रात यातील सहसंबंध सांगणाऱ्या लेखाची लिंक 

http://ajinkyatarte.blogspot.com/2021/01/1.html

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?