प्रवाश्यांचा सेवेसाठी भारतीय रेल्वे

       

 आपली भारतीय रेल्वे तंत्रज्ञानाचा बाबतीत अद्यावत होत असल्याचे आपणास माहिती आहेच. मागच्या 2020 या वर्षी WAG9HH, WAG12B ,सारखी ताकदवान रेल्वे इंजिनाची निर्मिती करुन हे  जगाला दाखवले सुद्धा आहेच. मात्र तंत्रज्ञानाबरोबर प्रवाश्यांचा सोयीसाठी कार्यरत असल्याचे नुकत्याच घडलेल्या दोन घडामोडीतून दिसते आहे. त्याविषयी आपणास  माहिती करुन देण्यासाठी आजचे लेखन.
         तर मित्रांनो, भारतीय रेल्वेची उपकंपनी असणाऱ्या "इंडीयन रेल्वे केटरींग अँड टुरीझम कार्पोरेशन"(IRCTC)तर्फे,  प्रवाश्यांना आपल्या प्रवाशाचे नियोजन करताना, कमी अडचणी याव्यात,  या हेतूने आय आर सि टि शी च्या संकेतस्थळावर अनेक ग्राहकोपयोगी ठरतील असे बदल करण्यात आले आहेत. तसेच यापुर्वी साइड लोअर आसानासाठी राजधानी, शताद्बी, हमसफर या सारख्या आरामदायी रेल्वेमध्येच देण्यात येणारी विशेष सोय यापुढे सर्व प्रकारच्या प्रवाशी गाड्यामध्ये साईड लोअर प्रकारच्या आसानासाठी देण्याचा निर्णय रेल्वेने घेतलेला आहे. आता हे दोन्ही निर्णय सविस्तर बघूया,  प्रथम IRCTC च्या संकेस्थळावरील बदल पाहूया .

           मित्रांनो, आयआरसिटीशी च्या संकेतस्थळावर प्रवाश्यांना आपले आरक्षण करताना रेल्वे शोधताना सोईचे व्हावे, या हेतूने तूम्हाला जर ठराविक वेळेतीलच रेल्वे हवी असल्यास, ती वेळ टाकून आपण त्या वेळेखरीज अन्य रेल्वेची यादी बघण्यात जाणारा वेळ आपण वाचवू शकतो.या आधी आपण ठरवलेल्या दिवशी सुटणाऱ्या सर्वच रेल्वेची रात्री 12 वाजल्यापासूनची यादी आपल्यासमोर यायची. मात्र यामुळे नोकरदारांचा सुरवातीचा बराचसा वेळ हा आपली आँफिसची वेळ संपल्यावर असणाऱ्या रेल्वे शोधण्यात जात असे, जो आता वाचेल. तसेच जर तूम्ही एखाद्या विशिष्ठ क्लास मधून प्रवास करत असाल जसे स्लिपर क्लास, टु टायर , फस्ट एसी वगैरै तर . इतर वर्गातील शिल्लक जागा बघण्यात जाणारा आपला वेळ वाचवण्यासाठी आपण आपल्या खात्यात आपणास हवा असणारा क्लास सोडून इतर क्लासच्या जागा न दिसण्याची सोय करु शकतो. पुर्वी आपण आसान आरक्षीत केल्यावर त्यासाठी किती पैसे द्यावे लागतील हे समजत असे . मात्र नव्या संकेतस्थळावर आपण आपल्या खात्यामध्ये आपला प्रवाश्याचा मार्ग निवडल्यावर लगेचच रेल्वेचा नावाखाली ही माहिती आता दिसायला लागेल. आपण जर एखाद्या मार्गावर सातत्याने प्रवास करत असाल तर आपल्या खात्यात तो मार्ग फेवरेट रुट या मथळ्याखाली नोंदवून आपला आरक्षणाचा वेळ वाचवू शकतो, तसेच आपल्या या आधीच्या प्रवाश्याची स्थिती, प्रवाश रद्द  केलेला असल्याच त्याचे पैसे परत मिळाले का ? आदी तपशील सहजतेने मिळण्याची सोय नव्या आयआरसिटीशी च्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. तसेच या आधी आपण खात्यात नोंदवलेला मोबाईल क्रमांक हा आपले खाते सुरु असल्यास सहजतेने दिसत असे, ते सहजतेने न दिसण्याची सोय नव्या आयआरसिटीशीच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. ज्यामुळे रेल्वे प्रवाश्याना अधिक जलद आणि सुरक्षीत सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

                आता बघूया , आरामदायी आसानासाठी भारतीय रेल्वे उचलत असणारी पाउले.
तर मित्रांनो,  आता पर्यत भारतीय रेल्वेच्या आरामदायी श्रेणीतील गाड्या वगळता, इतर सर्वसामान्य प्रवाशी गाड्यांमध्ये असणाऱ्या साइड लोअर प्रकारच्या आसानामध्ये सदर आसान दोन आसने जोडुन बनवण्यात येत असल्याने जर ही आसने व्यवस्थित जोडली गेली नाही, (जसे या दोन सिटच्या मध्ये जास्त अंतर राहणे, सिटच्या उंचीत फरक राहणे ) तर या आसानावर झोपलेल्या माणसाला त्रासाला सामोरे जावे लागत होते.पुर्वी रेल्वेच्या आरामदायी श्रेणीतील प्रवाश्यांना देखील या समस्येला सामोरे जावे लागत असे. मात्र या समस्येवर खिडीकीपासी अखंड सिट देवून जेव्हा दोन्ही सिट जोडायचा असतील तेव्हा ते खिडकीपाशी असणारे सिट ओढुन या जोडावर ठेवण्याचा  तोडगा काढण्यात आला होता. आता हाच प्रकार सर्व प्रकारच्या प्रवाशी रेल्वेत करण्याचा निर्णय रेल्वेने जाहिर केला आहे.
भारतीय रेल्वे तंत्रज्ञानप्रेमी आणि प्रवाशीस्नेही होण्यास सुरवात झाल्याचेच हे द्योतक मानावे लागेल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?