झपाट्याने कात टाकणारी भारतीय रेल्वे


आपली भारतीय रेल्वे झपाट्याने कात टाकत आहे, हे आपण जाणतातच.  केंद्र सरकारच्या  इतर कोणत्याही खात्यापेक्षा रेल्वे खात्यामध्ये विद्युतवेगाने बदल घडत असल्याचे आपणाला दिसले असेलच. याच बदलाच्या मालिकेत तीन बदल भारतीय रेल्वेच्या बाबतीत घडल्याचे गेल्या आठवड्याभरात दिसले, त्याची माहिती देण्यासाठी आजचे लेखन.

    तर मित्रांनो भारतीय रेल्वेच्या ताफ्यातून गरीब रथ प्रकारची सेवा बंद करण्याचा हालचाली वाढवून, भारतीय रेल्वेची उपकंपनी असणाऱ्या IRFC या कंपनींच्या आय पि  (  Initial public offerin   )चे बाजारात लोकार्पण आणि स्टँच्यु आँफ युनिटीसाठी 8 नव्या गाड्या सुरु करणे हे ते निर्णय होय.


           तर मित्रांनो तूम्हाला माहिती असेलच की 2006 पासून सुरु करण्यात येणाऱ्या गरीब रथ या प्रकारच्या रेल्वेमध्ये साइड च्या बाजूला सुद्धा मधले आसन आहे. (ज्यामुळे रेल्वेच्या एका डब्यात जास्त लोक प्रवास करत असल्याने रेल्वेला कमी पैस्यात एसी सेवा पुरवता येयची) त्यामुळे हे विशेष प्रकारचे डब्बे रेल्वेला फक्त गरीबरथ प्रकारच्या रेल्वेसाठी तयार करायला लागायचे. तसेच भारतीय रेल्वे दरवर्षी तीचा सर्व कोच तयार करण्याचा कारखन्यात कोणत्या प्रकारचे किती डब्यांची निर्मिती करण्यात येणारे आहे,हे प्रसिद्ध पत्रकातून जाहिर करत असते. एका वर्षातील उत्पादित डब्बे त्या वर्षापासूनच नव्हे, तर पुढच्या वर्षापासून देखील उपयोगात आणले जावू शकतात. हे आपणास ज्ञात असेलच. त्याच मालिकेत आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षात उत्पादित होणाऱ्या संभाव्य डब्यांचा उत्पादनाचा सुधारीत आराखडा (प्रथमतः प्रसिद्ध मे 2020) नुकताच प्रसिद्ध करण्यात आला . ज्यामध्ये गरीबरथसाठी लागणाऱ्या विशेष डब्यांचे उत्पादन शुन्य दाखवण्यात आले आहे. हे एकप्रकारचे गरीब रथ या प्रकारची रेल्वेसेवा थांबवण्यासाठी उचललेले पाउलच म्हणावे लागेल.ना

आता बघूया दूसरा बदल .तर भारतीय रेल्वेच्या 17 उपकंपन्यांपैकी IRCTCया उपकंपनीचे शेअर, शेअर बाजारात आणल्यानंतर IRFC (Indian Railway Finance Co operation) या उपकंपनीचे शेअर केंद्र सरकारने शेअर बाजारात आणले आहेत. ही उपकंपनी रेल्वेच्या स्थावर मालमत्तेचे व्यवस्थापन करणे, त्या भाड्याने देण्याबाबत नियमन करणे आदी कार्य करते. हीची स्थापना 1986 साली करण्यात आलेली आहे. 10 रुपयाचा एक शेअर असून तो 25ते 26 रूपयाला मिळू शकतो शेअर 575 शेअरचा  एक लाँट आहे. जो 14950 रूपयांचा होतो, तो एकावेळी किमान खरेदी करायला लागतोय. एकावेळी जास्तीत जास्त 13 लाँट खरेदी करावे लागत आहे.ज्यामध्ये 2475 शेअर येतात. तर त्यासाठी 1 लाख 94 हजार 350 रूपये खर्च करावे लागेल.तज्ज्ञांच्या मते IRCTCच्या IPOच्या वेळी मिळाला तेव्हढा लाभांश (डिव्हिडंड) यावेळी सुद्धा मिळेल या आशेवर या ठिकाणी गुंतवणूक करेल हे धाडसाचे ठरेल, असो


तिसरी बातमी ही केवडीया या पर्यटनस्थळाविषयीची आहे. केवडीया या  ठिकाणी असणाऱ्या सरदार पटेल यांच्या स्मारकाला अर्थात जगातील सर्वात उंच पुतळ्याला भेट देणे सोइस्कर व्हावे यासाठी  मुंबई - दादर (पश्चिम रेल्वेचे {रेल्वेच्या भाषेत DDR}[अधिक माहितीसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई दादरला रेल्वेचा भाषेत DR म्हणतात ]) अहमदाबाद ,चेन्नइ, रेवा, वारणशी,हजरत निझामुद्दीन {दिल्ली} आणि प्रतापनगर येथून रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे.ज्यासाठी डहोई ते चांदोही पर्यत 18किमीच्या मार्गाचे गेज रुपांतरण आणि चांदोही ते केवडीया पर्यत पुर्णतः  नव्याने ब्राडगेजचा मार्ग उभारला आहे. ज्यामुळे हे पर्यटन स्थळ रेल्वेच्या नकाश्यात आले आहे.

भारतीय रेल्वे सातत्याने बदलत जाणारच आहे. फक्त या बदलांचा वाईट परीणाम कमीत कमी लोकांवर व्हावा, अशी मनोकामना व्यक्त करत सध्यापुरते थांबतो, नमस्कार



         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?