भारतीय रेल्वेतील हे बदल आपणास माहिती आहे का ?

 

  मित्रांनो, आपली भारतीय रेल्वे प्रकाशाला लाजवेल इतक्या वेगात बदलत असल्याचे आपणास माहिती असेलच. केंद्र सरकारचे वेगाने कात टाकणारे मंत्रालय म्हणून कोणत्या मंत्रालयाचा उल्लेख करायचा असल्यास त्यासाठी रेल्वे मंत्रालयाखेरीज अन्य मंत्रालयाचा विचार करता येणे अवघड असल्याचे आपणास ज्ञात असेलच. याच बदलाच्या प्रक्रियेत 3 बदल नुकतेच भारतीय रेल्वेत झाले.हे तिन्ही बदल प्रवाशी सेवांशी निगडीत आहे.
      तर मित्रांनो, प्रवाश्यांच्या घरातून आपले सामान रेल्वे स्टेशनवर वाहून नेणे, आणि रेल्वे स्टेशनवरुन प्रवाश्यांचे सामान  घरी नेण्याचा उपक्रमाला प्रायोगिक स्तरावर पाटणा जंक्शन येथून सुरवात झाली आहे. रेल्वेस्टेशनहुन 50 किमीच्या अंतरासाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. ज्यासाठी दहा किलोच्या एक बँगसाठी 150 रूपये आकरण्यात येणार आहेत. एका तिकिटावर एकापेक्षा जास्त बँग असल्यास 50 रूपये अतिरीक्त आकरण्यात येणार आहे. प्रवाशी रेल्वेच्या संकेतस्थळावर अथवा नोडल एजन्सीचा अँपवर याबाबतची नोंदणी करण्यात आली आहे.

प्रवाश्यांना आरामदायी  सेवा मिळावी  , या हेतूने सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत सेवेचा विस्तार करण्यासाठी भारतीय रेल्वेने " मेधा " या खाजगी कंपनीच्या मार्फत 44 नविन ट्रेन तयार करण्याचे ठरवले आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये 16 कोच असतील. ही ट्रेन निर्माण करताना 75%  साहित्य भारतीय बनावटीचे वापरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मेधा ही कंपनी भारतीय रेल्वेच्या तिन्ही रेल्वे कोच फँक्टरीच्या सहकार्याने हे कोच बनवणार आहे. मेधा कंपनी यातील तांत्रीक यंत्रसामग्रीची निर्मिती करुन त्यांची जूळणी तसेच अंतर्गत सजावटीचे काम रेल्वेच्या कोच फँक्टरीमध्ये होईल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.ICF कडून 24 तर MCF आणि RCF कडून प्रत्येकी 10 ट्रेन तयार करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. या ट्रेनची डिलीव्हरी कधी करायची? याचे वेळापत्रक देखील तयार करण्यात आले आहे. पहिल्या वीस महिन्यात ट्रेनचे प्रारुप तयार करण्यासाठी दिले आहेत. आणि त्यानंतर प्रत्येकी तीन महिन्यात दोन ट्रेनसेट देण्याचे नियोजन आहे.

आता बघूया तिसरी बातमी तिसरी बातमीस काहीशी नकारत्मक छटा आहे . भारतीयांना अधिक वेगवान सेवा पुरवता यावी या उद्देश्याने भारतीय रेल्वेकडून चालवण्यात येणाऱ्या  पुश पूल पद्दतीच्या रेवलगाड्याचा प्रयोगास अपेक्षित यश ना मिळाल्याने रेल्वेने अखेर हा प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  मुबई येथून मनमाड भुसावळ मार्गे चालवण्यात येणारी राजधानी रेल्वे हि या प्रकारची प्रमुख रेल्वे होती .काही तांत्रिक गोष्टीची पूर्तता न करता हा प्रयोग केल्याने हा प्रयोग फसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱयांचे मत आहे . पश्चिम युरोपीय देश आणि अमेरिकेत हा प्रयोग यशस्वी झाल्याने भारतीय रेल्वेमध्ये हा प्रयोग आणण्याचा आपला प्रयत्न होता . जो आता थांबवण्यात येत आहे .प्रामुख्याने घाट क्षेत्रात ज्या प्रमाणे रेल्वेगाडयनचा मागे एका इंजिन जोडून गाडी चालवली जाते त्या गोष्टीचा  अवलंब  सर्वसाधारण क्षेत्रात करून रेल्वे गाड्याची गती वाढवण्याचा हा प्रयोग होता .मात्र रेल्वे इंजिन ड्रायव्हरना पुढच्या इंजिनात बसून मागील रेल्वे इंजिनाचे नियंत्रण करणे यात प्रचंड अडचण आल्याने आणि एका रेल्वेसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन इंजिनसाठी स्वतंत्र रेल्वे ड्रायव्हर ची तरतूद करणे रेल्वेला परवडत नसल्याने हा प्रयोग आता बंद करण्यात येत आहे . 

 भारतीय रेल्वे वेगाने बदलत असल्याचे यातून दिसत आहे . हि गती अशीच निरंतर राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?