अमेरीकेचा भुगोल आणि सिनेटर्सची संख्या बदलणार ?

 

जगातील सर्वात शक्तीशाली देश असणाऱ्या अमेरीकेचा राजकीय भुगोल आणि सिनेटर्सची संख्या बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे, आणि याला कारणीभूत आहे अमेरीकन सिनेटमध्ये टाँम काँपर  यांनी आणि  हाउस आँफ रिपेंझिटिव्ह अँलीनोर होम्स नाँर्दन यांनी मांडलेले एक विधेयक. हे दोघे डेमोक्रेटीक पक्षाचे प्रतिनिधित्व करतात 
    हे विधेयक जर अमेरीकेतील क्राँंग्रेसमध्ये समंत झाले तर अमेरीकेत नविन 51वे राज्य आकारास येईल. ज्यामुळे सिनेटमधील सदस्य दोनने वाढतील. परीणामी अमेरीकेतील राजकीय भूगोल तर बदलेलच त्या शिवाय सिनेटमधील सदस्य102 होईल.
तर मित्रांनो सिनेटमध्ये टाँम काँपर  यांनी आणि  हाउस आँफ रिपेंझिटिव्ह अँलीनोर होम्स नाँर्दन यांनी 
मांडलेल्या विधेयकानुसार अमेरीकेची राजधानी असलेल्या वाँशिग्टन डिस्ट्रीक  कोलंबियाला अमेरीकेतील नवे राज्य म्हणून मान्यता देण्याचे प्रस्तावित आहे.
अमेरीकेतील दोन्ही सभागृहातील रिपब्लिकन पक्षाचे आणि डेमोक्रेटीक पक्षाचे संख्याबळ बघता हाउस आँफ रीपेंझिटीव्हमध्ये हा प्रस्ताव सहजपणे पारीत होवू शकतो. मात्र सिनेटमध्ये दोन्ही पक्षाचे संख्याबळ 50/50 असल्याने या प्रस्तावाला अडचणींचा सामना करावा लागतो. रिपब्लिकन पक्षातर्फे प्रस्तावावरील चर्चा विनाकारण लांबवत प्रस्ताव बारगळण्याचा प्रयत्न केला जावू शकतो.अमेरीकी क्राँग्रेसचा नियमानुसार असा प्रस्ताव बारगळू देयचा नसेल तर किमान 60 जणांची प्रस्तावाला मंजूरी लागते.सिनेटचे पदसिद्ध अध्यक्ष असणाऱ्या अमेरीकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हँरीस यांनी मते समान झाल्याने आपला विशेषाधिकार वापरत मतदान केले तरी 60 मते प्रस्तावाला पडणे अशक्यप्राय गोष्ट आहे.

     अमेरीकेतील मतदारांचा विचार करता वाँशिग्टन डिस्टीक्ट कोलंबिया येथे  डेमोक्रेटीक पक्षाचा मतदार मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे वाँशिग्टन डिसिक्ट कोलंबिया या भागाला राज्य म्हणून मान्यता देवून  आपला सिनेट मधील हिस्सा कमी करण्याचा आत्मघातकीपणा रिपब्लिकन पक्षातर्फे करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
सन 1800 पासून अमेरीकेची राजधानी असलेल्या या शहराला संवैधानिक अधिकार फार कमी आहेत. हाउस आँफ रिपेझिटिव्ह मध्ये मतदानाचा अधिकार नसलेला एक प्रतिनिधी तर सिनेटमध्ये एकही प्रतिनिधी नाही, असे क्राँग्रेसमील या देशाचे स्थान आहे परीणामी या शहराचे प्रश्न सोडवण्यात अडचणी येतात. त्यामुळे त्याला राज्य म्हणून मान्यता द्यावी, असी मागणी सातत्याने केली जात आहे. वाँशिग्टन डी सी पेक्षा कमी लोकसंख्या असणारे अलास्का सारखे भाग राज्य म्हणून गणले जात असल्याने त्यांचे प्रश्न सोडवले जातात.मात्र वाँशिग्टन डिस्टीक्ट कोलंबिया दुर्लक्षिला जातो, असा युक्तिवाद अमेरीकेत केला जातो.त्याचाच परीणाम म्हणून हे.विधेयक मांडले गेले आहे तर बघूया अमेरीकेचा राजकीय भुगोल खरोखरीच बदलतो का ? हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. याविषयी मी तूम्हाला वेळोवेळी सांगेलच , तूर्तास इथेच थांबतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?