वंदन विश्वनिर्मितीचे कोडे उलगडणाऱ्याला


आपण निरभ्र आकाशात, प्रकाश्याचे प्रदुषण नसताना (लाईट पोल्युशन) आकाशात  नजर टाकली असता , विविध दिर्घीका, तारे, ग्रह, उपग्रह , बटूग्रह , लघूग्रह  दिसतात , आणि आपणास प्रश्न पडतो, या सर्वांची निर्मिती कशी काय झाली असेल? या अथांग विश्वाचे भविष्य काय असेल? असाच प्रश्न आजपासून सुमारे 60 वर्षापुर्वी अमेरीकेच्या एका तरुणाला पडला, त्याने याबाबत सातत्याने संशोधन केले. दुर्दैवाने तो 21 वर्षाचा असताना त्यास दुर्धर असा विकार जडला , ज्यामध्ये त्याची हाताची काही बोटे आणि मेंदू  सोडून सर्व अवयव निकामी झाले, मात्र त्यामुळे खच्चून न जाता त्याने विश्वनिर्मितीचे कोडे उलगडणारे एक पुस्तक लिहले, जे अमेरीकेतील सर्वाधिक काळ बेस्ट सेलर ठरणारे पुस्तक ठरले. न्युटनच्या जन्मानंतर 400 वर्षानी जन्मलेल्या आइन्सटाईनचा वारसा पुढे नेणाऱ्या त्या तरुणाचे  नाव आहे, स्टिफन हाँन्किस हॉकिंग्स  . ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ असणाऱ्या स्टिफन   हॉकिंग्स यांचा 9 जानेवारी हा वाढदिवस, त्याबद्दल त्यांना विनम्र आदरांजली. 
स्टिफन्स हॉकिंग्स यांनी लिहलेल्या त्या पुस्तकाचे नाव आहे "ए ब्रिफ हिस्टरी आँफ टाईम" विश्वाची निर्मिती ही एका स्फोटातून झाली हा आता सर्वमान्य झालेल्या सिध्दांता विषयी इत्यंभूत माहिती आपणास या पुस्तकातून मिळते ( दुसरा सध्या काहीसा मागे पडलेला विश्वनिर्मितीच्या सिध्दांत म्हणजे स्टेडि युनिव्हर्सर्स चा सिध्दांत जो शोधण्यात भारतीयांचा अभिमान असणाऱ्या डॉक्टर जयंत नारळीकर यांचा सिहांचा वाटा होता ) स्टीफन  हॉकिंग्स यांनी मानवाच्या सध्याच्या पृथ्वीवरील सर्व साधनसंपत्ती ओबडण्याच्या कृतीमुळे समस्त सजीव श्रुष्टीवर येऊ घातलेल्या संकटावर भाष्य करून शास्त्रद्न्य हे समाजापासून हटकून वेगळ्याच जगत जगत असतात त्या गृहीतकाला छेद दिला आहे काहीजण त्यांचे संशोधन इतर शास्त्रज्ञाचा तुलनेत फारसे सरस नाही . त्यांना त्यांच्या स्थितीतीलअधिक प्रसिद्धही मिळाली असा आरोप करतात , मात्र त्यामध्ये माझ्या मध्ये फारसे तथ्य नाही  जरी अन्य बौतिकशास्त्रज्ञांचा तुलनेत त्यांचे योगदान फारसे नसेल ही, मात्र  ते पाहता त्यांच्या सारखी स्थिती असणाऱ्या अन्य  व्यक्ती पाहता त्यांनी ज्या स्थितीत हे यश मिळवले त्यामुळे त्याचे योगदान खरोखरीच अतुलनियच आहे यात कोणाच्या मनात तिळमात्र शंका नसावी 

स्टीफन हँकिंग्स यांनी आईस्टाईनच्या सिध्द्तनाच्या आधारे खगोल भौतिकी (Astrophysic ) क्षेत्रात आपले संशोधन केले.आईस्टाईनच्या यांचा अनेक गृहीतकांचा पडताळा त्यांच्या संशोधनातून घेण्यात आला .  कृष्णविवर संबधी त्यांनी अनेक मूलभूत संशोधन केले . खगोलशास्त्र जनसामान्यपर्यंत पोहोचवण्यता त्यांचा मोलाचा वाट होता हे नाकारण्यात काही अर्थ नाही . 
अश्या महान खगोलशास्त्रज्ञास त्यांच्या जयंतीनिमित्य पुन्हा एकदा वंदन करून सध्यापुरते थांबतो नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?