भारतीय रेल्वे प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर

         

  भारतीय रेल्वे वेगाने प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत असल्याचे आपणास ज्ञात असेलच .याच श्रुंखलेत अजून दोन कड्या गुंफल्या गेल्या आहेत. त्याची माहिती करुन देण्यासाठी आजचे लेखन
                तर मित्रांनो, भारतीय रेल्वेतील आरामदायी सेवेसाठी ओळखण्यात येणाऱ्या राजधानी आणि शताब्दी रेल्वेसाठी यापुढे तेजस रेल्वेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोचेस वापरण्यात येणार आहे. ज्यामुळे राजधानी रेल्वे आणि शताब्दी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना तेजसच्या प्रवाश्यांना देत असलेल्या आधुनिक सेवा पुरवणे शक्य होईल.  या रेल्वेसाठी गेल्या पंधरा वर्षापासून एल एच बी कोचेस वापरले जातात. जे आता सर्व सामान्य रेल्वेत वापरले जात असल्याने राजधानी आणि शताब्दी रेल्वेच्या प्रवाश्यांना अधिक आरामदायी सेवा पुरवण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी यांच्या 100 व्या जयंतीप्रित्यर्थ भारतीय रेल्वेकडून 1969 आँक्टोबर 2पासून आरामदायी  प्रवाश्यासाठी शताब्दी सेवा पुरवण्यात येत आहे. आजमितीस 24 शताब्दी सेवांंच्या माध्यमातून 48 रेल्वे वापरण्यात येत आहे. नवी दिल्लीशी देशातील राजधानी  आरामदायी प्रवाश्यांमार्फत जोडण्यासाठी राजधानी ही सेवा वापरण्यात येते . आजमितीस 23 राजधान्यांशी या मार्फत नवी दिल्लीसी जोडलेल्या आहेत. (एकुण 46)या सर्व 94 रेल्वेगाड्यातील प्रवाश्यांना ही सेवा वापरता येईल. मात्र या मुळे या गाड्यांचे भाडे वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. हे लेखन करेपर्यत रेल्वेने या बाबत काहीही प्रसिद्ध केलेले नाही.

                 दुसरी बातमी भारताची शान असलेल्या वंदे भारत या रेल्वेविषयी आहे. भारतीय रेल्वेचा नियमानुसार प्रत्येक रेल्वे डब्याचे 18 महिन्यानंतर किंवा 6 लाख किलोमीटर चालल्यानंतर ओव्हरव्हाँलींग करणे अत्यावश्यक आहे. लाँकडाउन संपल्यानंतर 12 सप्टेंबरपासून ही सेवा प्रवाश्यांचा सेवेत दाखल झाली आहे. मात्र सेवा सुरु झाल्यापासून या सेवेतील डब्यांचे ओव्हरव्हाँलींग न झाल्याने येत्या 15 फेब्रुवारी पासून 31 मार्चपर्यत रेल्वेच्या लखनउ आणि नवी दिल्ली येथील कार्यशाळेत ओव्हरव्हाँलींग करण्यात येणार आहे. याकाळात ही सेवा तेजसच्या डब्यांमार्फत चालवली जाणार आहे.

भारतीय रेल्वे ही झपाट्याने कात टाकत असल्याचेच या घटना द्योतक आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .आज आपण जी भारतीय रेल्वे बघत आहोत , ती रेल्वे येत्या काळात पुर्णतः बदललेली असणार ही काळा दगडावरील रेष आहे. हे बदल वेळोवेळी आपणापर्यत पोहचवण्याचा माझा प्रयत्न असेलच .तूर्तास इतकेच, नमस्कार.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?