जीना इसीका नाम है!

       

  आज सकाळीच गोष्ट आहे. सकाळी एके ठिकाणी चहा पित असताना एका जून्या हिंदी चित्रपटाची धून कानावर ऐकू आली." जिना इसिका नाम है!" आयुष्य कसे जगावे हे सांगणारे हे गाणे असेच या गाण्याच्या बाबतीत म्हणावे लागेल .
     राज कपूर यांच्या अनारी या 1959 साली आलेल्या चित्रपटातील मुकेश यांंनी  गायलेले हे गाणे. ललीता पवार  आणि शोभा खोटे या मराठमोळ्या अभिनेत्रींनी काम केलेला हा चित्रपट मुकेश यांनी त्यांचा कारकिर्दीत जी दुःखी भावनेच्या व्यतिरीक्त जी गाणे गायली त्या पैकी एक असणारे हे गाणे. ज्याला शंकर जयकिसन यांनी संगीत दिलेल्या या गीताचे बोल शैलेंद्र यांचे होते.
स्वतःच्या दुःखांंना कुरवाळत बसण्यापेक्षा इतरांच्या आयुष्यात आनंद झटण्यातच खरा आनंद आहे, हा अत्यंत महत्तवाचा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे.   

        गाण्यामध्ये नायकाकडे पैसे नसतात मात्र तो भिकाऱ्याला आनंद देतो, त्यामुळे तो भिकारीच स्वखुशीने त्याला त्याचाकडचे पैसे देतो. मात्र थोड्या वेळाने त्याला एका अंधभिकाऱ्याला रस्त्याने जाताना एका वेगाने जाणाऱ्या सायकलमुळे अपघात होताना दिसतो. त्याला तो वाचवतो, आणि आपल्या कडचे पैसे देतो आणि त्या भिकाऱ्याला खुश करतो. तसेच या आधीच्या  दृश्यात रस्त्यावर पडलेल्या एका किटकाला सुखरुप शेजारच्या झुडुपावर सोडून देतो . दुसऱ्याला आनंद देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पैसा लागत नाही.कोणीही निर्धन व्यक्तीसुद्धा दुसऱ्याला आनंद देवू शकते. फक्त आपण दुसऱ्याला आनंद देण्यासाठी कृती करणे आवश्यक असते.हेच या गाण्यातून स्पष्ट होते.सुमारे चार मिनिटाच्या या गाण्यात हीच गोष्ट वारंवार सांगितली गेली आहे . आपले जीवन कोणाचे तरी दुःख विसरायला कमी आले जर लोकांच्या मनात आपल्या जाण्यानंतर आठवणीने स्मित हास्य उमटले तर ते स्वर्गसुख मानावे मानवी आयुष्य त्यासाठीच असते हेच या गाण्यातून तर दिसत नाहीना ? असे या गाण्याबाबत म्हटले तर वावगे ठरू नये  .

   जुनी गाणी माझ्या पिढीला कंटाळवाणी वाटतात .अत्यंत संथ संगीतामुळे नकोशी वाटतात . मात्र त्याला हे गाणे अपवाद म्हणावे असे लागेल .शांत मात्र कंटाळवाणे ना वाटणारे संगीत या गाण्यासाठी वापरले आहे ते अफलातूनच आहे . सुरवातीला येणारा मोठा आवाज याचा संथपणा जणू नाहीसच करतो , आणि गाण्याकडे आकृष्ट करतो जाताजाता मी साक्ली ऐकलेल्या गाण्याची झलक खास तुमच्यासाठी 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?