हे पण घडतयं जगात

 

  आपल्या भारतात विविध मुद्यांवरुन रणकंदन पेटलेले असताना काही क्रिडा स्पर्धा देखील झाल्या. दुर्देवाने त्याचे वार्तांकन आपल्या माध्यमातून  फारच कमी केले गेले .असीच एक स्पर्धा म्हणजे टाटा स्टील बुद्धीबळ स्पर्धा.
        15 जानेवारी ते 31 जानेवारी रोजी नेदरलँड (याला हाँलड असेही म्हणतात. मात्र नेदरलँड सरकारने हाँलड हे नाव अनधिकृत ठरवले आहे.) या देशातील Wijk aan zee या   शहरात आँफलाईन पद्धतीने ही स्पर्धा खेळवण्यात आली. स्पर्धेचे हे  83 वर्ष होते. सन  1943, 44 पासून दरवर्षी ही बुद्धीबळ स्पर्धा जानेवारी महिन्यात होते. या 2021 व्या वर्षी झालेली स्पर्धा नेदरलँडच्या जाँर्दन वे फाँरेस्ट या खेळाडून जिंकली. भारतातर्फे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनीष गिरी या खेळाडूचा या स्पर्धेतील प्रवास आनंदाकडून निराशेकडे जाणारा होता. पहिल्या 12 डावात 8 डाव जिंकून, त्यावेळेपर्यत   स्पर्धेत सर्वाधिक गुण 8 गुण प्राप्त करणाऱ्या या खेळाडुचे नशीब 13 व्या डावात बदलले आणि तो पर्यत 7.5 गुण प्राप्त करणारा नेदरलँडचा जाँर्दन वे फाँरेस्ट  हा खेळाडू विजयी झाला . 13व्या फेरीत अनिषचा डाव बरोबरीत सुटल्याने त्याचे 8.5 गुण झाले. तर जाँदर्न वे फाँरेस्ट हा खेळाडू जिंकल्याने त्याचे सुद्धा 8.5  गुण झाले. त्यामुळे विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकर सामना खेळवण्यात आला. ज्यात अनिष गिरी हारला आणि विजयाचा प्रबळ  दावेदार समजणाऱ्या हा खेळाडू अखेर उपविजेता म्हणून घोषित झाला.

     भारतीयांनी भारतात शोधलेला हा खेळ (बँडमिंटन, पोलो.सारखे काही खेळ भारतात शोधले गेले आहेत. मात्र त्यांचे निर्माते ब्रिटीश व्यक्ती होत्या . म्हणून भारतीयांनी भारतात शोधलेला खेळ हे महत्त्वाचे आहे) फारसा प्रेक्षणीय नसल्याने लोकप्रिय नाही. मात्र लवकरात लवकर निर्णय घेण्याची क्षमता विकसीत होण्यासाठी हा खेळ खुप महत्तवाचा आहे. आणि सध्या याबाबत आशादायी चित्र निर्माण होत आहे. माध्यमांनी टाटा स्टिल बुद्धीबळ स्पर्धेला जसे स्थान दिले.त्यापेक्षा अधिक महत्तव दिले तर भारताचा प्रगतीचा अश्व कोणीच रोखू शकणार नाही. हे निर्विवाद सत्य आहे. कारण बुद्धीबळाचा खेळातून निर्माण होणाऱ्या क्षमतेचा रोजच्या आयुष्यात वापर केला जाणारच, ज्यामुळे  त्या व्यक्तीची  प्रगती जोमाने होणार. व्यक्तींचा समुहाने देश बनतो. त्यामुळे व्यक्तींची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती असते. मग बसताय ना बुद्दीबळ खेळायला!




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?