भारताचा शेजारी देशातील डंका


आपल्या भारतात इंधनाच्या किमतीने मागील कित्येक वर्षातील किमतीचे रेकाँर्ड मोडले असताना, भारताच्या सभोवताली  आंतरराष्ट्रीय राजकारणातील  2  घटना नुकत्याच घडल्या. त्यातील एक घटना भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्व वाढवणारी आहे.तर दुसरी साधरण घटना आहे. याविषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन. पहिले साधरण घटना बघूया.
तर मित्रांनो, आपल्या भारताच्या दक्षीणेला असणाऱ्या श्रीलंकेने संयुक्त राष्ट्रसंघातील मानवाधिकाराच्या बाबतीत आपली बाजू भारताने उचलावी, यासाठी साकडे घातले आहे . तसेच श्रीलंकेने त्यांचा दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांचा केंद्रीय विधीमंडळात भाषण करण्यास आधी परवानगी दिली असता नंतर मनाई केली . श्रीलंकेने यासाठी करोना संसर्ग पसरु शकतो, हे कारण पुढे केले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय माध्यमांनुसार इम्रान खान त्यांचा काश्मीरविषयक राग तिथे आवळलू शकतात, जे श्रीलंकेला अडचणीचे ठरु शकते असे वाटल्याने श्रीलंकन सरकारने त्यांना मनाई केली,असो 

त्याचप्रमाणे श्रीलंकेने त्यांचा देशात सिंहली आणि तामिळी असा संघर्ष टोकाला गेलेला असताना संघर्ष मिटवण्यासाठी उपाययोजना करताना सिंहलीवर अन्वयीत अत्याचार केला.अनेकांची निर्घुण हत्या केली. त्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारणा केली असता, तामिळींना अपमानास्पद वाटेल, अशी उत्तरे दिली. सबब त्यांच्यावर मानवाधिकाराच्या हरण केल्याबाबत विविध बंधने लादण्यात यावीत, अशी मागणी काही तामिळी संघटनांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने केल्याने त्याबाबत चर्चा करण्यासाठी सयुंक्त राष्ट्राचा मानवाधिकार संघटनेत प्रस्ताव आणला गेला आहे. त्या प्रस्तावावर श्रीलंकेच्या बाजूने मतदान करावे, अशी विनंती श्रीलंकेच्या परराष्ट्र खात्याने अधिकृतरीत्या केली आहे. ब्रिटीशांनी डचांकडून श्रीलंकेचा ताबा मिळाल्यावर तिथे काँफी आणि चहाची लागवड केली. त्यावेळी तिथे काम करण्यासाठी ब्रिटीशांनी स्थानिक सिंहली लोकांचा वापर करण्याऐवजी शेजारच्या तामिळनाडू मधून लोकांना श्रीलंकेत आणले..श्रीलंकेत हे लोक जाफना प्रांतात प्रामुख्याने राहिले.ब्रिटीशांच्या मदतीमुळे स्थानिक सिंहलीच्या ऐवजी तामिळी अधिक विकसीत झाले. सन 1948 मध्ये ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यावर श्रीलंकेचा विकास करताना त्यावेळचा सरकारने तामिळी लोकांवर अवास्तव्य निर्बंधे लादली .यातूनच जन्म झाला तो श्रीलंकेतील तामिळ सिंहली वादाचा .ज्यातील हिंसाचाराचा संदर्भात ही केस आहे. असो 

आता बघूया भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्व वाढवणारी घटना .तर मित्रांनो इस्लाम हा अधिकृत धर्म असणाऱ्या आणि सिंगापूर (2nd smallest country of Asia) पेक्षा लहान असलेल्या आणि त्यामुळे आशिया खंडातील सर्वात लहान देश म्हणून ओळख असलेल्या , मात्र त्याचा भौगौलिक स्थानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रचंड महत्त्व प्राप्त झालेल्या, तसेच समुद्रातील पाण्याची पातळी वाढत असल्याने चर्चेत आलेल्या मालदीव या देशाबरोबर भारताने संरक्षणविषयक मोठे करार केले आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस  जयशंकर यांनी मालदिवबरोबरच्या करारावर मालदिवच्या राजधानीत अर्थात मालेमध्ये करारावर स्वाक्षरी केल्या. या करारान्वये, भारत मालदीवच्या राजधानी अर्थात मालेपासून जवळच एक नौदल तळ विकसीत करणार आहे. भारताने या ठिकाणी नौदल तळ विकसीत करावा याबाबत मालदीव सन 2013 पासून आग्रही होता. मात्र भारत त्यासाठी आवश्यक तो उत्साह दाखवत  नव्हता, जो आता दाखवत आहे. मध्यंतरी चीनने मालदिव च्या अनेक बेटांपैकी एक बेट 50 वर्षांसाठी भाड्याने घेतलेले आहे. मात्र देरसे आये मगर दुरुस्त आये, या हिंदी म्हणीप्रमाणे या कराराचे आपण स्वागतच करायला हवे.  

भारताने स्वातंत्र्यानंतर त्याचा सारख्या नवस्वातंत्र्य मिळालेल्या देशांचे नेर्तृत्व केले होते (नाम). कालांतराने त्यात खंड पडला होता. मात्र पुन्हा एकदा भारत हा नव्या जगाचे नेर्तृत्व करण्यास सरसावत असल्याचेच हे द्योतक म्हणता येईल, हे नक्की !. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?