शास्त्रीनगरचा आदर्श इतर घेतील का?


नूकतेच सोलापूर येथील गेली 17 वर्षे बंद अवस्थेत असलेले शास्त्रीनगर बसस्थानक  पुन्हा सुरु करण्यात आले आहे. ज्यामुळे सोलापूर शहरातील लोकांची मोठी सोय होत असल्याने या बस स्थानकावर प्रवाश्याची मोठी गर्दी होत असल्याचे एसटी प्रशासनाकडून  जाहीर करण्यात आले आहे , त्यामुळे एक जूनाच मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेत आला आहे तो म्हणजे एसटी कडे असणाऱ्या आणि सध्या वापराविना पडून असलेल्या जागांचा व्यापारी स्तरावर पुनर्वापर करण्याचा , 
मित्रानो पळसाला पाने तीनच , घरोघरी मातीच्या चुली या म्हणीप्रमाणे  सोलापूर शहरासारखे अनेक बसस्थानके सध्या वापराविना पडून आहेत . थोडीसी डागडुजी केल्यावर ही  स्थानके सहज वापरता येऊ शकतात . ज्यामुळे प्रवाश्यांचा सेवेसाठी हे एसटीचे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येईल . तसेच या बस स्थानकाभोवती हॉटेल सारखी व्यवस्था उभारल्यास सध्याचा बेरोजगारीच्या प्रश्नावर अल्पसा का होईना उतारा देखील मिळेल . आमच्या नाशिक शहरात गंजमाळ सारखी  शहरातील अत्यंत मोक्याची जागा जासी एसटी प्रशासनाकडून सुटली तशी पण सुटणार नाही . आणि लोकांना पण आपल्या जवळच एसटी स्थानक आल्याने अन्य खाजगी सेवेचा अवलंब करण्यात अटकाव करता येईल . माझ्या मते आपल्या एसटी संदर्भात केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे ही म्हण तंतोतंत लागू होते . सोलापूर येथील सतरा वर्षे बंद असलेले आणि काही दिवसापूर्वी सुरु करण्यात आलेले शास्त्रीनगर बसस्थानक हे त्याचाच एक भाग म्हणता येऊ शकते . 

आपली एसटी हि जनसामान्यांसाठी आहे , हे अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी सोलापूरचे शास्त्रीनगर बस स्थानक हा मैलाचा दगड ठरू शकतो सोलापूरच्या शास्त्रीनगर सारखे अन्य बस स्थानके सुरु केल्यास एसटीला पुन्हा एकदा सोन्याचे दुदैवास येतील हे नक्की .सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या मागणीबाबत आग्रही भूमिका घेतल्याने सोलापूरचे सतरा वर्ष बंद असलेले शास्त्रीनगर बस स्टॅन पुन्हा एकदा सुरु झाले तसा जोर लावण्याची अन्य लोकप्रतिनिधींना इच्छा होवो ,अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो नमस्कार 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?