करोना नंतरच्या पहिल्या ग्रँडस्लँमला प्रारंभ

                 

                गेल्या  2020  वर्षी समस्त वर्ष करोनाच्या धास्तीत गेले आता कुठे सर्वकाही सुरळीत होत आहे . ऑस्ट्रोलीया  आणि न्यूझीलंड येथे विविध खेळाचे सामने आयोजित करण्यात येत आहे . मात्र ते जास्तीत जास्त करून क्रिकेट सारखे सांघिक खेळ आहेत . मात्र वैयक्तिक पातळीवर खेळले जाणारे टेबल टेनिस सारखे खेळ कमी प्रमाणावर खेळले जात आहेत . मात्र या चित्रात येत्या सोमवार पासून अर्थात 8 फेब्रुवारीपासून या चित्रात आमूलाग्र बदल होणार आहे कारण चार ग्रँड स्लॅमपैकी एक अस्नणाऱ्या ऑस्ट्रोलियन ग्रँडस्लॅमची सुरवात 8 फेब्रुवारीपासून होत आहे. सोमवार  8 फेब्रुवारीपासून 21  फेब्रुवारीपर्यंत हा टेनिसचा कुंभमेळा रंगेल . सामान्यतः जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या ऑस्ट्रोलिअन ओपनचे आयोजन यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होत आहे . त्यामुळे विविध देशातील खेळाडूंचा खेळ पाहण्याची पर्वणी टेनिस प्रेमींना मिळणार आहे . 
                                      सिमेंटच्या हार्ड कोर्टवर होणारी हि स्पर्धा करोनानंतरची पहिली मोठी स्पर्धा आहे . ज्यात विविध देशाचे खेळाडू सहभागी होता आहेत . याआधी झालेल्या स्पर्धा या विशिष्ट देशांमधील असलयाने खेळाडू तसेच प्रेक्षक हे त्यात्या ठराविक देशातीलचहोते . त्यामुळे करोनाचा संसर्ग दुर्दैवाने पसरलाच तर तो मर्यादित देशात पसरण्याचा धोका होता .इथे मात्र तसे नाहीये  इथे विविध देशातील खेळाडू आणि प्रेक्षक असणार आहेत . त्यामुळे अधिक धोका आहे . मात्र तरी देखील हा सोहळा होत आहे . विजेत्याला 80 लाख ऑस्ट्रोलिअन डॉलरचे पारितोषिक मिळणार आहे .स्पर्धचे हे 109 वे वर्ष असून याचे आयोजन इंटर नॅशनल टेनिस ऑर्गनाझेशन मार्फत केले जाते/ पूर्वनियोजित वेळेनुसार  ही स्पर्धा 18 ते 31 जानेवारीला होणार होते ,मात्र करोना संसर्गाच्या भीतीमुळे त्याचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले .     

                 
            ऑस्ट्रोलिया देशाच्या  व्हिटोरीया या राज्यामार्फत  करोना संसर्ग पसरू नयेत म्हणून प्रसारित केलेल्या  नियमानुसार सर्व खेळाडूंना 31 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या वॉर्मअप स्पर्धेच्या आधी   14 दिवसाचे quarantine सक्तीचे कर!ण्यात आले आहे यावेळेस  ऑस्ट्रोलिअन ओपनच्या इतिहासात प्रथमच याच्या पात्रता फेरी ऑस्ट्रोलिया देशाचा बाहेर दोहा कतार आणि दुबई येथे खेळवण्यात आली . मग टीव्हीवर का होईना बघताय ना ऑस्ट्रोलियन ओपनच्या थरार 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?