उत्तराखंड येथील दुर्घटनेच्या निमित्याने उपस्थित झालेले काही प्रश्न

     

    आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजो सकाळी आठ ते नऊ दरम्यान उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील रेणी  हिमस्लखलन झाल्याने धोली  नदीला मोठा पूर आला आहे . या हिमस्लखयामुळे धोली नदीवरील ऋषी गंगा या विद्युत प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे . या पुराचा परिणाम चामोलीपासून ऋषिकेश पर्यंत जाणवणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे . त्यामुळे जोशीमठ श्रीनगरपर्यंत परिणाम जाणवणार आहे . जोशीमठच्या एसडीएम कुमकुम जोशी यांनी माध्यमांशी बोलताना  सांगितले की, “तपोवनमध्ये एनटीपीसी आणि ऋषी गंगाचा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. संपूर्ण नदीच चिखलात परिवर्तीत झाली आहे. हा चिखल हळूहळू वाहत आहे या दुर्घटनेत किती लोक मृत्युमुखी पडलेले आहेत याचा निश्चित आकडा हा लेख लिहीपर्यंत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही टीव्हीवरील बातम्यांनुसार 8 मृतदेह हाती लागले असून अजून 125 ते 150 जणांचा शोध सुरु आहे ईश्वर या दुर्घटनेत आप्तेष्ट गमावणाऱ्या जीवना हे दुःख शान करण्याची ताकद देवो आणि मृतात्म्यांना सगद्गति देवो हि ईश्वरचरणी प्रार्थना .

 
           या निमित्याने पुन्हा एकदा जुनाच प्रश्न उपस्थित झाला आहे .तो म्हणजे  हिमालय विविध प्रकल्पासाठी कितपत सुरक्षित आहे?. काही वर्षांपूर्वी उत्तराखंड राज्यातील टिहरी या जलविदुयत प्रकल्पामुळे या प्रदेशात  मोठा  भूकंप झाल्याचे बोलले गेले होते  . त्या पार्श्वभूमीवर आपणस पुढील गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे प्रुथ्वीच्या दोन्ही टोकाला असणाऱ्या ध्रुवीय प्रदेशानंतर जगातील सर्वात मोठा हिमाचा साठा म्हणून हिमालय विख्यात आहे . दोन्ही  ध्रुवांवरील हिम वेगाने वितळत असल्याचे आणि गंगा नदीचे तसेच यमुना नदीचे उगमस्थान म्हणून विख्यात असणारे गंगोत्री आणि यमुनोत्री या स्थानावरील बर्फ वेगाने कमी होत असल्याचे सर्वश्रुत आहे सन 1995 -96 ला हिमालयात मोठा भूकंप झाल्याचे आपणस माहिती असेलच अनेक भूगर्भशास्त्रद्न्य हिमालयात मोठा प्रमाणवर भूकंप येणार असल्याचे वारंवार सूचित करत आहेच तसेच हिमालय सह्याद्री सारखा कठीण कातळापासून बनलेला नाही तर दोन मोठे भूखंड एकमेकांवर आदळल्याने त्यातील तुलनेने मऊ भूभाग वरती येऊन बनलेला आहे. हिमालयाचा ठिकाणी एक समुद्र होता ज्याचे अवशेष अजून देखील हिमालयात दिसत आहेत . आपल्या भारतातील अरवली पर्वतरांग देखील कठीण कातळापासून बनलेली आहे . त्यामुले सह्याद्री अथवा अरवली पर्वतरांगेसारखा दृष्टिकोन हिमालयाचा बाबतीत घेऊन चालणार नाही .तसेच हिमालयाची उंची आज  2021 साली सुद्धा वाढत आहे . म्हणजेच हिमालय अजून पूर्णतः तयार झालेला नाही .

            सध्या हिमालयात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत . त्यानिमित्याने हिमालयात प्रचंड प्रमाणात खणनकार्य चालू आहे . ते पुरेशी काळजी घेऊन भूगर्भ तज्ज्ञांचा सल्ला मानत केली जात आहे ना ? हा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो . त्यांनी मनाई केलेल्या ठिकाणी लोकभावेच्या आहारी जाऊन बांधकाम केले तर जात नाहीना हे बघणे अत्यंत आवश्यक आहे . आज घडलेल्या घटनेसंदर्भात पुढे चौकशी होईलच.  यात दोषी आढळलेल्या व्यक्तीवर कारवाई झाली आणि पुढे योग्य ती काळजी घेतल्यासच या दुर्घटनेतून आपण यातून काही शिकलो असे म्हणावे लागेल नाहीतर आहेच पहिले पाढे पंचावन्न !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?