मराठी पाउल पडते पुढे !


आपल्या भारतात,  महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देणारे पहिले राज्य , समस्त भारतातला रोजगार हमी योजनेची ओळख करून देणारे राज्य , भारताला सहकाराची ओळख करून देणारे राज्य , महिलांना  शिक्षण देण्याची सुरवात करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे . आणि अश्या प्रतगशील विचाराच्या राज्याची राज्यभाषा म्हणून मराठीची ओळख आहे . जगातील 15 कोटी लोकसंख्येची मातृभाषा असणाऱ्या या मराठी भाषेत नवनवीन विषयावरचे , आधुनिक ज्ञान यावे , मराठीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी , यावर काय करावे?  या बाबत गाठायचा आहे विचारमंथन करणे सोपे व्हावे या उद्देश्याने योजलेला दिन म्हणजे जागतिक मराठी दिन जो 27 फेब्रुवारी रोजी असतो . या दिनानिमित्य समस्त मराठी जनतेला खूप खूप शुभेच्छा . 
     मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून असणे. ग्राहकांना विविध प्रकारची सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांचा सेवा मराठी भाषेत न मिळणे. मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओघ दिवसोंदिवस रोडावणे. इंग्रजी परवडेल पण मराठी भाषा नको, अश्या प्रकारच्या मराठी भाषेतील सरकारी कागदपत्रे छापणे, विज्ञानातील, अर्थशास्त्रातील अनेक उपविषयांची आधुनिक माहिती सहजसोप्या मराठीत उपलब्ध नसणे, आदी विविध प्रकारची आव्हाने झेलत असणाऱ्या मराठीचा गौरव करण्याचा हा दिवस . त्यानिमित्ताने सर्व मराठी भाषिकांना मनःपुर्वक शुभेच्छा.

   मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर समर्थ  रामदास स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे आज सुरु ठेवलेली मराठीची उपासना दिर्घकाळ सुरु राहो, ही इश्वरचरणी प्रार्थना. एखादी भाषा शिकणे, आणि एखाद्या भाषा माध्यमातून शिकणे, यात खुपच मोठा फरक आहे, याचे भान मराठी भाषा दिनी मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांना येवो,  ही या दिनी इश्वरचरणी प्रार्थना . मराठी भाषेत जर ज्ञाननिर्मिती झाली तरच भविष्यात मराठी वाढेल , टिकेल, अन्यथा मराठी निव्वळ लोकभाषा होईल. याची जाणिव मराठी भाषिकांना या दिनी येवो , ही इश्वरचरणी प्रार्थना. मराठी भाषेतील उत्तमोत्तम पुस्तके अन्य भाषेत अनुवादीत करण्याची इच्छा मराठी भाषिकांमध्ये {माझ्या निरीक्षणानुसार अन्य भाषेतील पुस्तके मराठीत अनुवादीत होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मात्र मुळची मराठीतील पुस्तके अन्य भाषेत अनुवादीत होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे}निर्माण होवो, अशी इश्वरचरणी प्रार्थना.
मराठी भाषिकांमध्ये प्रमाण भाषेबरोबर बोली भाषांना देखील समान महत्व देणे अत्यावश्यक आहे, याची जाण येवो, ही या मंगलदिनी इश्वरचरणी प्रार्थना. इंग्रजीसारख्या मराठीमध्ये दोन ते तीन प्रमाण भाषा निर्माण झाल्या (अमेरीकन इंग्रजी, ब्रिटीश इंग्रजी च्या धर्तीवर नाशिकची प्रमाण मराठी भाषा, औरंगाबादची प्रमाण मराठी भाषावगैरे ) पाहिजे, ज्यामुळे मराठी अधिक लोकोपयोगी होवू शकते, अश्या कल्पना मराठी भाषिकांमध्ये निर्माण व्हावा, यासाठी या पावनदिनी इश्वरचरणी प्रार्थना 
मराठी भाषेविषयी खुप काही बोलता येवू शकते. मात्र प्रत्येकाला काहीतरी शेवट असावाच लागतो. तरी मी आपली आता रज्जा घेतो, नमस्कार.



               

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?