खगोलशास्त्रातील नव्या पर्वाला प्रारंभ

     

 आपल्या भारताला अभिमान वाटावा असी खगोलशास्त्रातील घटना 4 फेब्रुवारी रोजी घडली. ज्याविषयी आपणाला सांगण्यासाठी आजचे लेखन.
          तर मित्रांनो अमेरीका आणि रशिया या देशांचा अपवाद वगळता देशातील इतर 10 मोठ्या अवकाश संशोधन संस्थांनी एकत्र येत जगातील आतापर्यतची सर्वात मोठी रेडीओ दुर्बिण उभारण्याचे ठरवले आहे. ज्यामध्ये भारतासह  आँस्टोलिया , चीन, कँनडा , इटली, न्युझीलंड , दक्षीण आफ्रिका, स्वीडन, नेदरलँडस् आणि युनाटेड किंग्डम (युनाटेड किंग्डमला मराठीत इंग्लड म्हणून ओळखतात. प्रत्यक्षात युनाटेड किंग्डमच्या 4 प्रमुख भागापैकी एक भाग म्हणजे इंग्लड आहे) या देशाचा समावेश आहे. या देशांनी Square Kilometer Arreay Observatory council या नावाची एक संस्था स्थापन केली, असून, या संस्थेमार्फत Square kilometer Arrest Telescope नावाची  रेडीओ दुर्बिणीची उभारणी करण्यात येणार आहे. या संस्थेचे प्रमुखपद सध्या फ्रान्स देशात जन्मलेल्या मात्र सध्या ब्रिटीश.नागरीकत्व असणाऱ्या डाँक्टर Catheine Cesasrky या करणार आहेत. 4 फेब्रुवारी रोजी याची अधिकृत घोषणा करण्यात आली. प्रत्येक देश या रेडीओ दुर्बिणीसाठी आपले योगदान देणार आहे.
             भारतातर्फे देण्यात येणाऱ्या योगदानात देशातील 20 नामांकित संस्थांचा सहभाग राहणार आहे. ज्याचे नेर्तृत्व पुणे (अधिक स्पष्टपणे बोलायचे झाल्यास बावदान येथील) येथील  नँशनल सेंटर आँफ अँँस्ट्रो फिजीक्स या TIFR या मार्फत चालवण्यात येणाऱ्या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. भारतातील संस्थांना अणुउर्जा विभाग आणि विज्ञान तंत्रज्ञान विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

      या दुर्बिणीचा उभारणीसाठी दहा वर्षांचा कालावधी अपेक्षीत असुन त्यासाठी1अब्ज 80 लाख पौंडाचा (युकेचे चलन )खर्च होईल असे गृहीत धरण्यात आला आहे. याचे स्थान आफ्रिका किंवा आँस्टोलीया खंडात असेल ,असे प्राथमिक स्तरावर ठरवण्यात आले आहे. या दुर्बिणीतून विश्वाचा जन्म , दिर्घीकांची निर्मिती, गुरुत्वीय लहरी , विश्वातील पहिल्या ताऱ्याची निर्मिती , आदी प्रश्नांचा मागोवा घेण्यात आला आहे.
     नेहमीच्या आँप्टिकल प्रकारच्या दुर्बिणीतून अभ्यास न करता येणाऱ्या अत्यंत कमी व्हेवलेंट (अर्थात जास्त फ्रिवेंसी आणि कमी उर्जा )असणाऱ्या प्रकाशलहरींचा अभ्यास या मुळे करता येईल. आपण ठिकठिकाणी बघतो, त्या आरश्याचा अथवा भिंगाच्या दुर्बिणी या आँप्टिकल दुर्बिणीचा  एक प्रकार आहे. त्याविषयी नंतर कधी बोलेले (कारण त्यासाठी आख्खा रेडीओस्पेट्रम उलगडून सांगावा लागेल ) सध्याइतकेच, नमस्कार.
(या लेखासाठी द हिंदू आणि इंडीयन एक्सप्रेस या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या माहितीचा आधार घेतला आहे. यालेखात जास्तीत जास्त मराठी संकल्पना वापरण्याचा प्रयत्न केला आहे. )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?