भारतीय रेल्वे विक्रमाचा वाटेवर

 

1फेब्रुवारी रोजी जाहिर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली .ती म्हणजे डिसेंबर 2023 पर्यत भारतीय रेल्वेचे पुर्णतः विद्युतीकरण करण्याचे. आतापर्यत अत्यंत प्रगत समजल्या गेलेल्या अमेरीका आदी देशात देखील रेल्वेचे पुर्णतः विद्यूतीकरण करण्यात आलेले नाही. त्या पार्श्वभुमीवर या घोषणेचे महत्व अन्यन्यसाधरण आहे. मात्र या घोषणेमुळे एक प्रश्न उपस्थित झाला आहे, तो म्हणजे सध्या वापरात असलेल्या डिझेल इंजिनांचे काय होणार ?
रेल्वेविषयक तज्ज्ञांच्या मते रेल्वे या डिझेल इंजिनाबाबत पुढील कार्यवाही होवू शकते.
पहिल्या पर्यायानूसार  भारतीय रेल्वे बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ किंवा आफ्रिकन देशातील रेल्वेंना डिझेल इंजिन विकू शकते. आपण काही महिन्यापूर्वीच बांगलादेश रेल्वेला दहा डिझेल इंजिने पाठवली होतीच.
दुसऱ्या पर्यायानूसार जवाहारलाल नेहरु पोर्ट टस्ट सारख्या एखाद्या संस्थेला ही इंजीने विकू.शकते. जवाहरलाल नेहरु पोर्ट टस्ट सारख्या संस्थेला कमी अंतरासाठी वजनाने जास्त असणाऱ्या मालाची सातत्याने वाहतूक करावी लागते.त्यासाठी ही रेल्वे इंजिन वापरता येवू शकतील.

तिसऱ्या पर्यायानुसार तामिळनाडुतील पानम ब्रिज सारख्या इलेक्ट्रॉनिक इंजिनाचा वापर करणे अशक्यप्राय असणाऱ्या ठिकाणी किंवा रेल्वे कोचेसला यार्डात दुरुस्ती देखभालीसाठी घेवून जाण्याचा कामासाठी वापरणे. रेल्वे कोचेसची देखभाल दुरुस्ती होते त्या ठिकाणी रेल्वे कोचेसच्या छतावर चढुन देखील दुरुस्ती होत असल्याने त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इंजीन वापरता येतच नाहीत. त्या ठिकाणी  डिझेल इंजिनच वापरावी लागतात 
पर्याय चौथा जो प्रामुख्याने EMD,प्रकारच्या डिझेल इंजिनाबाबत वापरता येणे सहजशक्य आहे,तो म्हणजे डिझेल इंजिनाचे इलेक्ट्रॉनिक इंजिनात रुपांतर करणे.
पाचवा पर्याय जो अत्यंत अपवादात्मक स्थितीत वापरला जावू शकतो , तो म्हणजे इंजिनाचे लोखंड आदि साहित्य भंगारात विकणे. मात्र रेल्वे हा पर्याय वापरण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
हे काहीही असले तरी मराठीतील नावाजलेले भावगीत असलेले , "झूक झूक अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी, ही स्थिती मात्र पुढच्या पिढीस दिसणार नाही, जरी त्यांनी मामाच्या गावाला जाण्यासाठी रेल्वे वापरली तरी, हे मात्र नक्की!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?