बातम्यांमधील चीन (भाग 2)


चीन, आपल्या भारताबरोबर बांगला देशानंतर सर्वाधिक  लांबीची सीमा असणारा , आर्युवेदासारखीच प्राचीन वैद्यकीय उपचार पध्दती असणारा, मुळच्या सोलापूरच्या असणाऱ्या डाँक्टर डाँक्टर द्वारकानाथ कोटनीस यांनी ज्या देशात आपली वैद्यकीय सेवा दिली तो देश , प्राचीन भारतीय ज्ञानाचे भारतीय सोडून ज्या भाषेत  प्रथमतः भाषांतर झाले, ती चीनी भाषा ज्या देशाची आहे. आपल्या प्रवासवर्णनाद्वारे ज्यांनी भारताची समृद्धी जगासमोर आणली, अश्या प्रवाश्यांचा देश म्हणजे चीन . तर हा चीन सध्या विविध घडामोंडींमुळे गेल्या पंधरवाड्यापासून चर्चेत आला आहे. यातील काही घडामोडी मी या आधीच्या लेखात सांगितल्या आहेत..आता बघूया पुढच्या घडामोडी.
तर मित्रांनो, चीनचा  गिलगीट- बाल्टीस्तान, अफगाणिस्तान या भागाला लागून असलेला प्रांत म्हणजे झिंकीयांग (याचा उच्चार काही ठिकाणी सिंकीयांग पण करतात) अर्थात पुर्व तूर्कस्थानात मुस्लिम बांधवांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. या मुस्लिम बांधवांवर चीन प्रचंड प्रमाणात अत्याचार करत आहे, अशी भुमिका घेवून युरोपीय युनियन आणि  युनाटेड किग्डंम (या युनाटेड किंग्डमला आपल्याकडे इंग्लड असे म्हणतात , मुळात  इंग्लंड नावाचा भाग या देशात आहे. इंग्लंड नावाचा देश भुतलावर अस्तित्वात नाही) या देशाने चीनवर काही बंधने लादली आहेत. या भागातील मुस्लिम बांधवांवर कँम्पमध्ये अन्वयीत अत्याचार करण्यात येत आहेत. त्यांचाकडून वेठबिगार म्हणून अवघड कामे करून घेतली जात आहे. असा आरोप केला आहे. त्याला प्रत्युतर म्हणून चीनने देखील युनाटेड किंग्डम { यु.के. असे संक्षिप्त नामकरण } आणि युरोपीय युनियनवर  काही बंधने लादली आहेत. चीनने  या भागातील कट्टरता कमी करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, इतरांनी या प्रश्नात नाक खुपसू नये, असे सांगितले आहे.

चीनची विस्तारवादाची भुक शेजारच्या देशांच्या भुभागावर आक्रमण करतेच आहे. दोन तीन दिवसापुर्वी चीनच्या मासेमारी करणाऱ्या 6ते7 मोठ्या नौकांनी फिलिपाइन्स च्या एक्सुकिव्ह इकाँनाँमिक झोनमध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली [समुद्रकिनाऱ्यापासून 200 नाँटिकल मैलापर्यत त्या देशाचा एक्सुकिव्ह इकाँनाँमिक झोन म्हणून ओळखला जातो. ज्यातील नैसर्गिक संसाधनावर त्या देशाची मालकी असते. ] यावर फिलीपाइन्सने तीव्र शद्बात नापसंती दर्शवली आहे. सध्या चीनच्या दक्षीण चीन समुद्रातील कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ज्यामुळे त्या भागातील सर्व देश त्रासलेले आहे. दक्षीण चीन समुद्राच्या जवळपास सर्वच भाग आमच्या आहे, असा चीनच्या दावा आहे. त्या दाव्याचा पुर्ततेसाठी चीन आपले नाविकदल वापरुन परीसरातील देशांचा सातत्याने कुरघोड्या करत असतो, त्याच मालिकेतील ही घडामोड आहे.
तिसरी घडामोड आता बघूया .
तर मध्य आशियातील उझबेकिस्तान हा देश वगळून इतर स्तान देश अर्थात किरीगीस्तान, कझाकीस्तान तुर्कमिस्तान  रशिया चीन पाकिस्तान आणि भारत यांची एक बहु उद्देशीय सहकार्य करणारी संघटना आहे. शांघाय काँपरेशन आँरगानयझेशन . या संघटनेचे विविध समुह आहेत. त्यातील एक समुह म्हणजे शांघाय काँपरेशन मिलटरी आँरगनायझेशन.  या शांघाय काँपरेशन मिलटरी आँरगनायझेशनमार्फत येत्या भविष्यकाळात एक लष्करी कवायत पाकिस्तानात करण्यात येणार आहे. ज्या कवायतीमध्ये भारत ,पाकिस्तान आणि चीनचा समावेश आहे. गेल्या वर्षी अर्थात 2020 मध्ये भारताने या कवायतीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र या वर्षी भारत या लष्करी कवायतीमध्ये पाकिस्तान आणि चीनबरोबर सहभागी होवून युद्धाभ्यास करणार आहे.
अर्थात जागतिक राजकारणात हे होतच असते . भारत चीन शांघाय काँपरेशन आँरगानयझेशन या संघटनेबरोबर हे जी 77, BRICS,आशियाई डेव्हलमेंट बँक , संयुक्त राष्ट्रे आदी अनेक व्यासपीठावर एकत्र काम करत आहे. 1962पासून जग खुप पुढे गेले आहे. अजूनही त्याचा हा प्रवास सुरु आहे. मी वेळोवेळी त्यातील घडामोड आपणापर्यत पोहोचवेलच , तूर्तास इतकेच.नमस्कार.
आधीचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?