बातमीतील चीन (भाग 4)


चीन, आपल्या इतिहासाचा दाखल देत आपल्या शेजारील राष्ट्रांचा भुभागावर दावा करणारा देश, जगातील  सर्वात कठीण भाषेंचा यादीत ज्या देशातील प्रमुख भाषेचा वरचा क्रमांक लागतो, तो देश, जगात आजमितीस 2021साली मोजक्या देशात साम्यवादी राजवटी सुरु आहे त्यातील एक देश म्हणजे चीन, सन 1978 पासून साम्यवादी राज्यव्यवस्थेत भांंडवलशाहीला पुरक अर्थव्यवस्था उभारणारा देश म्हणजे चीन (रशियात याचा विरुद्ध म्हणजे स्वातंत्र्यात साम्यवादी अर्थव्यवस्था अमंलात आणली गेली परीणामी तो देश फुटला)1949ला अस्तिवात येवून सुद्धा 1971 पर्यत सयुंक्त राष्ट्र संघात ज्या देशाला प्रवेश नव्हता तो देश म्हणजे चीन .हा चीन देश  दोन दिवसापुर्वी पुन्हा एकदा चर्चेत आला आणि याला कारणीभूत आहे. त्या देशाने भुभागावरुन फिलीपाइन्स या देशाबरोबर सुरु केलेला वाद.
तर मित्रांनो, चीनने आमच्या स्पेशल इकाँमाँनिकल झोनमध्ये त्यांची 200 लष्करी जहाजे आणली असल्याचा आरोप फिलीपाइन्सने केला आहे.समुद्रकिनाऱ्यापासून 12 ते 200 नाँटिकल मैलापर्यतचा प्रदेश त्या देशाचा स्पेशल इकाँनाँमिक्ल समजला जातो.या भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर त्या देशाचा अधिकार असतो.(एक नाँटिकल मैल म्हणजे 1.82 किलोमीटर. नाँटिकल मैल हे समुद्रातील अंतरे मोजण्याचे एकक आहे) चीनच्या मते ते त्यांचा समुद्री हद्दीतच आहे. तसेच ही लष्करी जहाजे नसून मासेमारी करणाऱ्या नौका आहेत.ज्या हवामान खराब असल्यामुळे  तिथे आश्रयास आलेल्या आहेत. मात्र या प्रदेशातील इतर देशांच्या मते तेथील हवामान पुर्णतः स्वच्छ आहे.
चीन आपल्या प्राचीन इतिहासाचा दाखला देत या भुभागावर पुर्वीपासून दावा ठोकत आहे. काही तज्ज्ञांच्या मते चीनचा सदर प्रदेश माझा आहे  असे म्हणजे माझे आजोबा, पणजोबा याठिकाणी बसले होते, सबब ही जागा आता माझी आहे, असा हास्यास्पद दावा करण्यासारखे आहे.हा प्रदेश दक्षीणी चीनी समुद्रात येतो. या ठिकाणी चीनने स्वतःच्या मर्जीने 9पँरलर लाइन नावाची काल्पनिक रेषा आखली असून यात समाविष्ट होणारा सर्व प्रदेश आमचा असा दावा केला आहे. हा प्रदेश नैसर्गिक इंधनांनी समुद्ध प्रदेश आहे. चीन या प्रदेशातील इतर देशांना या भागात कोणतेही काम करु देत नाही.

फिलीपाइन्सने चीनच्या या दाव्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. जिथे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने चीनच्या दाव्यात काहीही तथ्य नाही, ही जागा फिलीपाइन्सचीच आहे असा निकाल दिला होता.
फिलीपाइन्स च्या रक्षणार्थ जर आवश्यकता वाटली तर  अमेरीका स्वतःचे आणि  स्व प्रणित लष्करी संघटना असणाऱ्या नाटोचे (नाँथ अटलांटिक ट्रीटी आँरगनायझेन)लष्कर तैनात करेल असा इशारा अमेरीकेने दिला आहे. त्यामुळे या भागातील तणावात वाढ झाली आहे.
नाँस्टोड्राम या फ्रेंच भविष्यतज्ज्ञांचा मते जगात तिसरे महायुद्ध चीन सुरु करणार आहे. त्याचीच ही नांदी का ? असा प्रश्न चीनच्या गेल्या काही कार्यवाही बघून वाटत आहे. या भागातील घडामोडी वेळोवेळी आपणा पर्यत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल, तूर्तास इतकेच नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?