खुप काही शिकवून जाणारे गाणे !


 कालचीच गोष्ट आहे. एका ठिकाणी चह घेत असताना एका गाण्याचे बोल ऐकू आले. "झूट बोले कंवा काटे, काले कवेंसे बचीयो!...... में मायके चली जाउंगी! तूम देखते रहिंयो!" नवऱ्या बायकोच्या लटक्या भांडणांवर आधारीत  सन 1973 साली आलेल्या बाँबी या चित्रपटातील हे गाणे आपल्याला खुप काही शिकवून जाते असे मला वाटते.या गाण्यासाठी संगीतसाथ दिली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि गायले आहे शैलेंद्र सिंग आणि लता मंगेशकर यांनी. 
   खोटे बोलल्यामुळे काय होते? यावरुन नवऱ्या बायकोत सुरू झालेल्या संवादात  बायको नवऱ्याला ती विविध गोष्टी करेल ,अश्या धमक्या देते .प्रत्येक वेळेस नवरा तीला प्रत्युतर देते. नंतर ती पत्नी आपले अखेरचे शस्त्र , माहेरी जाण्याची धमकी देते. यावेळी नवरा तू जात असेल तर जा, मी तूझी सवत घरी आणतो, असे तीला बजावतो.आपली सवत येणार, या प्रत्युतरामुळे बायको आपला हट्ट मागे घेत नवरा सांगेल तसे वागायचे मान्य करुन आपला हट्ट मागे घेते, अशी गाण्याची मध्यवर्ती कल्पना आहे. 


   माझ्यामते या गाण्यातून कोणत्याही गोष्टीला  उत्तर असतेच. या जगात उत्तर नाही, असी गोष्ट अस्तिवातच नाही. तसेच जगातील प्रत्येकाचा एक कमकुवत दुवा असतोच, त्यावर घाव केल्यास व्यक्ती नामोहराम होते. कोणालाही जास्त काळ दबावाखाली ठेवता येत नाही. हा संदेश अत्यंत सहजतेने देण्यात आला आहे. या ठिकाणी पत्नी त्याला विविध वेळा नामोहराम करण्याचा प्रयत्न करते, प्रसंगी माहेरी जाण्याचे अस्त्र देखील काढते. तीच्या मते तीच्या या धमकीमुळे नवरा घाबरुन तीच्या मागण्या मान्य करेल. तू माहेरी जावू नकोस, मी माघार घेतो, तूझ्या मागण्या मान्य करतो,असे म्हणेल. मात्र शेरास सव्वाशेर असलेला तीच्या या धमकीला भिक न घालता ,तूला जायचे असेल तर जा , मी तूझ्याजागी दुसरी बायको करतो मला तूझी गरज नाही, असे सांगून तीच्या धमकीतील हवा काढतो.
 हे गाणे तीन ते चार मिनीटाचे असले, आणि या गाण्यात वाक्यांची पुनरावर्ती असली तरी या गाण्यासाठी वापरण्यात संगीतामुळे गाणे कंटाळवाणे न होता , अत्यंत उत्कृष्ट झाले आहे. जे कितीहि वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही. उलट आपणास विचार करण्यासाठी भाग पाडते. सध्याचा काहीस्या नकारात्मक  परीस्थितीत आशेचा किरण भरणारे हे गीत मला खुपच आवडले.  मनुष्याने परीस्थितीमुळे कदपी हार मानू नये, परीस्थिती कधीपण बदलू शकते, जे तूमच्यावर कुरघोडी करण्यासाठी पुढे असतात..तेच तूमच्या मागे वाद मिटवण्यासाठी येवू शकतात. हा संदेश हे गीत देते. असे मला वाटते. आपल्या हिंदी चित्रपटश्रुष्टीत छोट्या छोट्या अर्थपुर्ण गाण्याची खाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यातीलच एक रत्न म्हणून याकडे बघावे लागेल. जाताजाता या रत्नाची ओळख त  तूमच्यासाठी पुन्हा एकदा
 .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?