एमपीएसीच्या नावाने


आज मी तुमच्याशी बोलत असताना राज्यांभरात एमपीएससी च्या परीक्षा राडा झाल्याने परीक्षार्थींच्या अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे . कदाचित तुम्ही हा मजकूर वाचत असताना त्यांच्यावर राज्य प्रशासनाने तोडगा काढला असेलही . मित्रानो प्रशासनातील अधिकरी कर्मचारीवृंद निवडण्यासाठी  आपल्या राज्यघटनेच्या  कलम 316आणि 317 नुसार महाराष्ट्रासाठी तयार केलेला हा घटनादत्त अयोग म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा अयोग .  या आयोगामार्फत राज्यसेवेतील पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील अधिकारी निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला तब्ब्ल पाचव्यांदा पुढे ढकलल्यामुळे परीक्षेचे उमेदवार जे पुढे प्रशासनातील महत्त्वाच्या पदावर आरूढ होणार आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत .

मी दोन कालावधीत मिळून  एकूण  पाच वर्षे पुण्यातील सदाशिव पेठे ,नवी पेठ , नारायण पेठ या भागात वास्तव्यास होतो . या भागात विविध स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अक्षरशः पोटाला चिमटा काढत पडेल तसे कामे करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात . अभ्यासिकेत जागा मिळवण्यासाठी अभ्यासिका चालकांची मुजोरी सांभाळत घरून येणाऱ्या पैशावर किंवा स्वतःच्या अन्य स्रोताद्वारे प्रचंड मेहनत करत अधिकारी बनण्यासाठी प्रयत्न करत असतात . स्पर्धा परिक्षेसाठी  परीक्षार्थी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची  वर्षे खर्ची घालतात . अन्य संधीकडे दुर्लक्ष करतात . या अभ्यासिका अत्यंत छोट्या आणि पडक्या इमारतीत असतात . त्या अडचणींवर मात करत मोठ्या संख्येने एका छोट्या जागेत ही  परीक्षार्थी अभ्यास करतात . 


असे असून देखील हा घटनादत्त आयोग वेळेवर परीक्षा न घेणे, घेतल्यास त्याचा निकाल वेळेत न लावणे , निकाल लागल्यावर सुयोग्य परीक्षार्थींची शासनाला शिफारश ना करणे आदी कृत्ये करतो , पूर्वी प्रश्नपत्रिकेत अनेक चुका असे  आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .  महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रमाणेच अन्य राज्य लोकसेवा आयोगाची स्थिती आहे . डिड वर्षांपूर्वी गुजरात लोकसेवा आयोगाच्या बिन सचिवालय या पदासाठी घेतलेल्या परीक्षेत गोंधळ झाला होता हे आपणास आठवत असेलच मात्र चित्र खूपच खराब नाही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धत अजून दर्जा टिकवून आहे ती आहे तशीच राहून अन्य लोकसेवा अयोग्य तसे व्हावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?