अवसान घातकी निर्णय !


शुक्रवार दिनांक 12 मार्च रोजी देशातील अभियांत्रिकी शिक्षणाचे नियंत्रण करणाऱ्या AICTC ने  अभियांत्रीकी बाबत एक निर्णय जाहिर केला. तो म्हणजे अभियांत्रीकीसाठी आधीच्या शिक्षणात भौतिकशास्त्र, रसायनशात्र  अणि गणित नसले तरी अभियांत्रिकीला प्रवेश घेता येण्याचा निर्णण. होय . आतापर्यंत सक्तीचे असणाऱ्या या विषयांना  आता ऐच्छिक विषयांचा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे  या ऐच्छिक विषयाचा सूचित 14 विषयांचा  समावेश करण्यात आला आहे . या ऐच्छिक विषयांचा सूचीतील कोणतेही तीन विषयात सर्वसाधारण गटात 45% आणि राखीव गटात 40% गन मिळवूंन उत्तीर्ण झाल्यास आता अभियांत्रिकीला प्रवेश घेता येणार असल्याचे नव्या धोरणात सांगण्यात आले आहे . आंतरशाखीय शिक्षणाचा पाय म्हणून वाणिज्य शाखेतील व्यक्तींना अभियांत्रिकी शिक्षण घेता यावे म्हणून हा बदल करण्यात येत असल्याचे याबाबत बोलले जात आहे . 
अ_व_सा_न_घा_त_की निर्णय म्हणूनच या निर्णयाकडे बघावे लागेल  अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया म्हणून ज्या विषयांकडे  बघण्यात येते .तेच विषय जर ऐच्छिक केल्यामुळे जर हे विषय ना घेता अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळलेल्या विद्यर्थ्यांना जर भविष्यात या विषयाचा पाय नसल्याने जर शिक्षण अवघड वाटले किंवा त्यांनी जमत नसल्याने अर्धवट माढ्यातच सोडले तर होणाऱ्या नुकसानीस कोणाला जवाबदार धरणार ?  मूलभूत संकल्पना माहिती नसल्याने पाठांतरावर विसंबूंन जर अश्या विद्यार्थ्याने  अभ्यासक्रमातून विषय सोडवून घेतला , तरी असे अभियंता भविष्यात अभियंत्रकीची अव आव्हाने पेलू शकतील का ? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होत आहेत

.    शिक्षणात चांगले बदल केल्यास पुढच्या पिढीवर चांगले आणि वाईट बदल केल्यास पुढच्या पिढीवर वाईट बदल होतात . हे बदल लक्षात आल्यावर याचे होणारे परिणाम बदलले खूप अवघड असते . त्याच पारीपेक्षातून या कडे बघावे लागेल . सध्या आपल्या भारतीय शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होत आहेत . हे बदल अभ्यासातून होत असावेत असे मानले तरी त्यांचा अभ्यास कधी झाला ? त्यासाठी त्यांनी कोणती पध्द्त वापरली ? याबाबत मात्र सविस्तर सांगण्यात येत नाही जे धोकादायक आहे . या बदलावर  होत आहे त्यापेक्षा व्यापक विचारमंथन होणे गरजेचे आहे ,असे मला वाटते . यापुढील बदलाबाबत ते होईल अशी अशा व्यक्त करून सद्ध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?