या धोक्याकडे बघणार कोण ?


कालचीच गोष्ट आहे. सहजच टिव्ही बघत असताना wion या वृत्तवाहिनीवर एक रिपोर्ट दिसला. रिपोर्ट जगभरातील वाढत्या मानसिक अनारोग्यावर होता. त्यात सांगितल्याप्रमाणे रशियाचा एकुण लोकसंख्येचा दुप्पट लोक जगभरात विविध मानसिक आजारांनी गस्त आहेत, आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. 
काही दिवसापूर्वी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना देशात मानसोपचार तज्ज्ञांची एकुण संख्या किती ? याविषयीची माहिती केंद्र सरकार ठेवत नसल्याचे उत्तर दिले होते. डिसेंबर2019 मध्ये इंडियन मेडीकल असोसेशियने दिलेल्या माहितीनुसार देशात मानसिक रोग्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्या पार्श्वभूमीवर wion वरील या रिपोर्टचे महत्त्व लक्षात येते.
    Wion या वृत्तवाहिनीवरील रिपोर्टनूसार समाजातील प्रतिष्ठीत असणाऱ्या लोकांनी त्यांना भेदसवणाऱ्या मानसिक समस्येबाबत जाहिरपणे स्पष्टपणे बोलल्यास त्यामुळे सर्वसामान्य देखील मानसिक समस्येबाबत बोलून त्यावर उपचार करुन घेण्यास तयार होतील. यासाठी काही उदाहरणे देखील यासाठी  देण्यात आली. सध्या मानसिक आजारांकडे एक कलंक म्हणून बघण्याचा दृष्टिकोन  समाजातील प्रतिष्ठित लोकांनी बोलल्यास बदलेल. असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

या रिपोर्टमध्ये नैराश्य आणि उदासिनत्व या आजारांच्या वाढत्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे समाजावर विपरीत परीणाम होत असल्याचे सांगण्यात आले आहे. आपल्याकडेसुद्धा "मन करावे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण" असे समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितले आहेच ना ? Wion चा मानसिक अनारोग्दायाचा संदर्भायील रिपोर्टमध्ये उदासिनत्व आणि नैराश्य ओळखण्याची विविध लक्षणे सांगितली आहेत. युट्युबवर हा रिपोर्ट उपलब्ध आहेत. लोकांनी तो अवश्य बघावा. अत्यंत सहजसोप्या इंग्रजीत तो उपलब्ध आहे. रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे भारतात नैराश्य आणि उदासिनत्व हे फार झपाट्याने वाढत आहे. या ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञ हे आकरण्यात असलेल्या त्यांचा फी विषयी देखील भाष्य केले आहे..भारतातील मानसोपचार तज्ज्ञ
  हे अन्य देशाच्या तूलनेत जास्त फी आकरणी करतात..ती त्यांनी कमी केल्यास भारतातील अधिकाधीक लोक मानसोपचार तज्ज्ञांचा सेवांचा फायदा घेवू शकतील असे या अहवालात सांगण्यात आले आहे.
भारतातील मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य याविषयी खुपच गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी आपल्या परीने wion सारख्या वृत्तवाहिन्या काम करत आहे.. गरज आहे त्यांचे.हात बळकट करण्याचे .भविष्यात अधिकाधीक लोक ते बळकट करण्यासाठी पुढे  येतील अशी आशा व्यक्त करुन सध्यापुरते थांबतो , नमस्कार
मी ज्या रिपोर्टविषयी बोललो, त्याची युट्युब वरील लिंक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?