अशांत भुकवच !

 


मागील 2020 हे वर्ष कोरानाबरोबरच भयावह वाटणाऱ्या वादळांनी न विसरण्यासारखे झाले.आपल्या भारतात कमी वादळे आली, मात्र आशिया खंडातील पँसेफिक किनाऱ्यावर तसेच अमेरीकेच्या अटलांटिक किनाऱ्यावर अत्यंत कमी कालावधीत संख्येने आणि तीव्रतेने आधीचे विक्रम मोडणारी वादळे आली.हे कमी काय म्हणून निसर्ग आता भुकंप आणि ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे आपली परीक्षा घेतोय का ? असे वाटावे , इतक्या मोठ्या प्रमाणात भुकंप आणि ज्वालामुखी उद्रेक सध्या सुरु आहेत.

गेल्या आठ दिवसात आइसलँड या युरोपातील बेटावर किती भुकंप आले असतील? लहानातील लहान भुकंपाचा विचार करता तब्बल 20 हजार (हो वीस हजार भुकंप झाले आहेत. ज्यांना हे खोट वाटतंय त्यांनी द हिंदू, इंडियन एक्सप्रेस सारख्या वर्तमानपत्रावर या संदर्भात बातम्या बघाव्यात) झाले आहेत. या आधी याच परीसरात 2010 साली असीच भुकंपाची लाट आली होती. ज्यामुळे तेथील एक निदीस्त ज्वालामुखी जागृत झाल. या ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे आकाशात एक मोठा ढग तयार झाला . ज्याची परीणीती युरोपात विमान वाहतूक तब्बल चार महिने विस्कळीत होण्यात झाली . अजून आइसलँड मधून ज्वालामुखीच्या उद्रेक झालेला नसला तरी भुगर्भ शास्त्रज्ञांनी 2010 ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवल्याचे वृत्त wion या वृत्तवाहिनीने दिले आहे.आज हा लेख लिहीत असताना (16 मार्च 2021) इटलीमध्ये एका ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणात लाव्हारस बाहेर पडत आहे. तर इंडोनेशियाच्या एका जागृत ज्वालामुखीतून गेल्या पंधरवाड्यात मोठ्या प्रमात लाव्हा उद्रेक झाला होता.
आपल्या सुर्यमालेचा विचार करता अनेक ग्रह उपग्रह भुगर्भशास्त्राचा विचार करता मृतवत आहे. तसे आपल्या पृथ्वीचे नाही , ही बाब सुखावणारी असली, तरी पृथ्वीचे इतके सक्रिय असणे देखील मानवजातीसह समस्त सजीवश्रुष्टीस धोकादायक आहे.

पृथ्वीच्या या सक्रियतेबाबत विविध कारणे सांगितली जातात..त्यातील काही नैसर्गिक आहे. तर काही मानवनिर्मित आहेत.नैसर्गिक कारणाबाबत मानव काही करु शकत नसला तरी मानवनिर्मित कारणाबाबत असे नाहीये, ही मानवनिर्मित कारणे दूर करुन पृथ्वीच्या भुगर्भाची ही सक्रियता रोखली जावू शकते. या सक्रियते बाबत मानवनिर्मित जी कारणे सांगितली जातात त्यामध्ये वाढते तापमान हे प्रमुख कारण आहे. वाढत्या तापमानामुळे समुद्रात खोलवर दडून बसलेल्या हरीतगृह वायूला वातावरणात येण्यासाठी मार्ग सुकर होतो. त्यामुळे त्या वायूचा दबावाखाली दडून बसलेला लाव्हा सुद्धा बाहेर येवून भुगर्भातील हालचाली वाढवतो त्यामुळे या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच भुगर्भात घेत असलेल्या बाँम्बच्या चाचण्यामुळे देखील यात वाढ होत आहे, असे भुगर्भ तज्ज्ञांचे मत आहे.
या ज्वालामुखाच्या उद्रेकामुळे वातावरणाचे तापमान वाढवणाऱ्या हरीतगृह वायूंमध्ये वाढ होत आहे. परीणामी समस्त मानवजातीस धोका उत्पन झाला आहे. हा धोका दूर करण्यासाठी युरोपीय राष्ट्रे , अमेरीका आदी देश प्रयत्नशील आहे. भारताचा देखील सक्रीय सहभाग आहे. त्यामुळे यावर यश मिळणारच .
आपल्या भारतीय पुराणात दोनदा पृथ्वी महा संहारापासून वाचल्याची नोंद आहे. पहिल्यांदा मनूच्या नौकेच्या गोष्टीच्या वेळी, दुसऱ्यांंदा समुद्रमंथनाच्या वेळी विष बाहेर आल्यावर.तसेच यावेळीसुद्धा होईल मात्र तो पर्यत अशी वेळ येवूच न देणे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण सर्व तसे प्रयत्न करतच असू, अशी कल्पना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?