भारताचा वाढता डंका !

आपल्या महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या संख्येबरोबर, एका उद्योगजकाच्या घराजवळ स्फोटके आढळण्याचा प्रकारात पोलीस दलातील काही लोक सहभागी असल्याची बातमी देण्यासाठी चडाओढ लागली असताना भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत अत्यंत दुरग्रामी परीणाम करणारे बदल सुद्धा होत आहे. माझे आजचे लेखन त्यासाठी .
     तर मित्रांनो गेल्या आठवड्याभरात तीन घडामोडींनी भारताचे परराष्ट्र सबंध नव्याने चर्चेत आले. त्यातील पहिली घडामोड म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतासमोर चर्चैचा प्रस्ताव ठेवल्याचा दूसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी सुद्धा भारताबरोबर सबंध सुधारण्यासाठी चर्चेची तयारी दर्शवली. दुसरी घडामोड म्हणजे एकेकाळी भारतीय परराष्ट्र धोरणात अस्पृश्य समजलेल्या गेलेल्या इस्राइलबरोबर भारताने अँल्युमिनीयमचा वापर केलेली बँटरीच्या निर्मितीसाठी केलेले करार. तसेच तिसरी घडामोड म्हणजे जागतिक व्यापार संघटनेमध्ये भारताने ठेवलेल्या प्रस्तावाला अमेरीकेने मान्यता द्यावी यासाठी अमेरीकेच्या सिनेटमधील (आपल्या लोकसभा समकक्ष) सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष जाँन बायडन यांना सादर केलेला प्रस्ताव होय.
आता बघूया या सर्व घडामोडी विस्ताराने .
सध्या प्रचंड आर्थिक विवंचनेत असणाऱ्या पाकिस्तानकडून देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भारताबरोबर चर्चेचा घाट घातला जातोय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2015 नंतर काहीही चर्चा झालेली नाही. पाकिस्तान जो पर्यत दहशतवादाचा मार्ग सोडत नाही, तो पर्यत पाकिस्तानबरोबर चर्चा होणार नाही, असी आपली भूमिका आहे. तर सध्या स्वतःचा  आंतरराष्ट्रीय व्यापार वाढण्याबरोबरच देशांतर्गत असणारी ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी पुर्ण करण्यासाठी भारताबरोबर सबंध चांगले असण्याची पाकिस्तानची अपरीहार्यता आहे. त्या अपरीहार्येतूनच लागोपाठ दोन दिवशी  अनुक्रमे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमल हसन बाजवा यांनी चर्चेचा सुर आळवला आहे.
आता बघूया दुसरी घडामोड .यापुढील भविष्यात नैसर्गिक इंधनावर चालणाऱ्या वहानांच्या जागी बँटरीवर चालणाऱ्या वाहनांची बाजारपेठ विस्तारनार आहे. सध्या अस्या प्रकारच्या गाड्यांमध्ये लिथीयमच्या आयर्न बँटरीचा वापर होतो.  आपल्या पृथ्वीवर लिथियमचे साठे मर्यादित आहेत. एका अंदाजानूसार सध्या ज्या प्रकारे  लिथीयम आयर्न बँटरींची निर्मिती होत आहे , ते बघता 2030 पर्यत लिथीयम हा धातू पृथ्वीवरून जवळपास नाहीसा झाला आहे. त्यामुळे या बँटरीना विकल्प असणाऱ्या बँटरींवर सध्या विविध ठिकाणी संशोधन चालू आहेत. शास्रज्ञांचा मते अँल्युमिनीयम एअर प्रकारच्या बँटरी याला खुप छान पर्याय आहेत. याला लिथीयम आयर्न बँटरीपेक्षा एक दशांश  जागा लागते. तसेच याचा वापर जास्त काळ करता येवू शकतो.  मात्र या प्रकारच्या बँटरीचा चार्जिंगबाबत सध्या अनेक समस्या आहेत. त्या दूर करण्यासाठी भारताची सरकारी मालकीची कंपनी असणाऱ्या इंडियन आँइल काँपरेशन आणि इस्राइलच्या फिनर्जी यांच्या दरम्यान या नव्या अँल्युनियम एअर बँटरीबाबत संशोधन करण्यासाठी महत्तवाच्या गोष्टींची पुर्तता करण्यात आली. सन 2017 मध्ये इंडीयन आँइल कार्पोरेशन या कंपनीने फिनर्जी या कंपनीचे काही समभाग खरेदी केले. त्यानंतर सन 2018 मध्ये इस्राइलचे पंतप्रधान बेजीनाम येत्यानाहू हे भारत भेटीवर आले असता याबाबत अनेक महत्तवाचा घडामोडी घडल्या, ज्याचा पुढील टप्पा नुकताच पुर्ण करण्यात आला.
आता बघूया तिसरी घडामोड .
तर मित्रांनो जागतिक व्यापार संघटनेच्या तीन प्रमुख धोरणापैकी एक असणाऱ्या बौद्धिक स्वामित्व च्या तरतूदीला सध्याचा कोरोना काळात तात्पपुरत्या स्वरुपात का होईना थांबवावे अशी मागणी भारताने केली आहे. या तरतूदीनुसार एखादे विशिष्ट  उत्पादन ,सेवा विकसीत करण्यासाठी एखाद्या कंपनीने, संस्थेने विशेष परीश्रम , आर्थिक कष्ट घेतले असल्यास ती वस्तू बाजारात आल्यावर पुढील 20 वर्षे फक्त त्या कंपनीस ती सेवा, उत्पादननिर्मिती करता येते. इतरांना ते उत्पादन सेवा अन्य लोकांना देयचे असल्यास मुळ कंपनीला मोठ्या प्रमाणात राँयल्टी द्यावी लागते, तसेच या प्रक्रियेसाठी बराच कालावधी जातो. भारताच्या मते सध्या कोरोनाचे औषध निर्मितीचे जगभरात प्रयत्न सुरु आहेत. मात्र या तरतूदीमुळे उत्पादनात अडचण होवू शकते. परीणामी जिवित हानी होवू शकते. त्यामुळे सध्या तरतूदीला फाटा देण्यात यावा. मात्र यास अमेरीकन औषध कंपन्या ,पश्चिम युरोपीय राष्ट्रातील औषध कंपन्या यांचा विरोध आहे. मात्र अमेरीकेने पाठिंबा दिल्यास युरोपीय राष्ट्रेसुद्धा पाठिंबा देतात असा इतिहास आहे. त्या पार्श्वभूमीवर सिनेटच्या सदस्यांनी मागणीकडे बघावे लागेल.
भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर.नवस्वातंत्र्य राष्ट्रांचे नेर्तृत्व केले होते.नंतरच्या काळात भारत त्यात मागे पडला. मात्र भारत नव्या काळाथ पुन्हा एकदा ती जवाबदारी निभवण्यासाठी सरसावला आहे, हेच यातून सिद्ध होते आहे.
हा लेख लिहीत असताना भारताचे कतार आणि अमेरीकेबरोबर काही करार झाले.त्याची माहिती पुढच्या वेळेस देईल , तो पर्यत नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?