जागतिक पाणी दिनाच्या निमित्याने


पाणी...मानवी शरीरात सर्वात जास्त असणारा घटक . जन्मानंतर काही दिवसांपासून मृत्यूपर्यंत आणि हिंदू धर्मियांचा विचार करता मृत्यूपश्चात प्रेताचे दहन करण्याचा विधीपर्यत लागणारा घटक. आपल्या पृथ्वीवर सगळ्यात जास्त असणारा प्राकृतिक घटक,ज्याचे अस्तिव सापडल्यामुळे शनिच्या टायटन या उपग्रहावर अमिबा सारखी प्राथमिक स्वरुपाची का होईना जीवश्रुष्टी असल्याची शास्त्रज्ञांना शक्यता वाटते, तो घटक म्हणजे पाणी.या पाण्याकडे मुबलक असेल किंवा तो किती महत्तवाचा घटक आहे,याकडे दुर्लक्ष केल्यामुळे असेल अनेकांकडून त्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. परीणामी आपल्या पृथ्वीवरील अनेकांना त्याचा शुद्ध स्त्रोतापासून दूर रहावे लागते. जागतिक स्तरावर या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी युनिसेफमार्फत सन1993 पासून दर वर्षी एक संकल्पना घेवून जागतिक पाणी दिन साजरा करण्यात येतो. जो  22 मार्च रोजी असतो.सध्याचा 2021 ची संकल्पना आहे "valuable water" अर्थात मौल्यवान पाणी .पाण्याची नासाडी रोखण्यासाठी काय करावे लागेल. याबाबत जागतिक स्तरावर पहिल्यांदा 22 मार्च 1992 रोजी विचार झाल्याने 1993 पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे.

आपण पाण्याची खरी किंमत जाणतो का ? आपण सहजतेने खराब करणाऱ्या , वाया घालणाऱ्या पाण्याची खरी किंमत नक्की काय आहे? पाणी किती मैल्यवान घटक आहे? याची आपणास जाण, समज आहे का ?यावर विचारमंथन होण्यासाठी 2021 सालची संकल्पना राबवण्यात येत आहे.  ही संकल्पना ही 2021 फेब्रुवारी 25 रोजी युनिसेफकडून जाहिर करण्यात आली.

 मी पुण्यात साडेपाच वर्षे वास्तव्यास होतो, त्यावेळी मला अनुभवयास आले की स्वतःची पाण्याची गरज भागवण्यासाठी चार चार धरणे असल्याने पुणेकरांकडून मनमानी पद्धतीने पाण्याची उधळपट्टी होते. याउलट लातूर सारख्या ठिकाणी पाण्याचा दुर्भिक्षतेमुळे रेल्वेमार्फत पाणी आणावे लागते. पाण्याचा अभावामुळे मानवी विकास कसा रोखला जातो, हे मनमाड आणि मराठवाड्याचा उदाहरणातून दिसून येते. मनमाडला रेल्वेच्या पुलाचे गर्डर तयार करण्याचा कारखाना, मोठा इंधनसाठा तसेच भारतीय खाद्य महामंडळाचे मोठे गोदाम असूनही फक्त पाण्याचा दुर्भिक्षतेमुळे मनमाडची अपेक्षीत प्रगती होत नाहीये. माझा एक मित्र सातत्याने म्हणतो, एकवेळ भारत चीन सीमावाद , भारत पाकिस्तान समस्या सुटेल, पाकिस्तान दहशतवादाचा मार्ग सोडेल. मात्र मनमाडचा पाणी प्रश्न सुटणे अवघड आहे. मराठवाडा अविकसीत राहण्यामागे पाण्याचा दुर्भिक्षतेमुळे शेती आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास न होण्याचे एक प्रमुख कारण आहे 

\आपण पृथ्वीवर 71% पाणी आहे, असे म्हणतो, मात्र त्यातील बहुसंख्य पाणी मानवास आहे त्या स्थितीत वापरण्याजोगे नाही. तसेच ते वापरण्याजोगे करण्यासाठी येणारा खर्च जास्त आहे. वापरण्याजोगे पाण्यातील ही बराचसा भाग पर्यावरणाचा विचार करता वापरणे धोक्याचे आहे, परीणामी वास्तविक वापरण्याजोगे आणि पर्यावरणास हानी न पोहचवणाऱ्या पाण्याचा साठा अत्यंत मर्यादित आहे. याच मर्यादित पाण्यात वाढती गरज भागवण्यासाठी  प्रबोधन करण्यासााठी योजलेेला  दिवस म्हणजे जागतीक पाणी दिवस. काही तज्ज्ञांच्या मते जगात तिसरे महायुद्ध पाण्यावरुन होईल. पाकिस्तान जरी धर्माच्या नावाखाली काश्मीरची मागणी करत असला तरी या मागचा मुळ हेतू काश्मीर मधील पाण्यावर नियंत्रण मिळवणे हाच आहे. पाकिस्तानात सात प्रमुख नद्या आहेत. { अधिक माहितीसाठी त्यातील अफगाणिस्तानातून पाकिस्तानात जाणारी काबुल नावाची नदी सोडता सर्व नद्या भारतातून पाकिस्तानात जातात} त्यातील 4 नद्या काश्मीरमधून वाहत पाकिस्तानात जातात. चीनचा अकसाइचीनचा दावा देखील याच पाणीस्त्रोतांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहे.असो.


तर पाणी पाजणे , पाण्यासारखा खर्च केला आदी म्हणींमधून जनसामान्यात अढळ स्थान असलेल्या पाण्याचे रक्षण करण्याचे आपण ठरवले असेल.{पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28, फेब्रुवारी 2021रोजीच्या मन की बात मध्ये सुद्धा याचा संदर्भ दिला होता} असी कल्पना करुन सध्यापुरते थांबतो नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?