समुद्री साधनसंपत्ती दिन विशेष



सध्या अलाहाबाद या ठिकाणी  कुंभमेळा सुरु आहे. या कुंभ मेळ्याची अशी गोष्ट सांगितली जाते की , समुद्रातील संपत्ती काढण्यासाठी एकदा देव- दानव यांनी एकत्रितरित्या सहकार्य करत कार्य केले.  त्यातून पडलेल्या अमृताच्या कालशासाठी देव आणि दानव यांच्यात युध्द झाले  .त्यात या अमृताचे चार थेंब जिथे पडले तिथे आता  कुंभमेळा भरतो . आता ही  गोष्ट खरी की खोटी ते देव दानवच जाणो . पण ही गोष्ट खरी  मानली तर आपणास एक गोष्ट मान्य करावीच लागते, ती म्हणजे आपल्या पुर्वजांना समुद्रातील संपत्तीची ओळख होती ( पुढे कुठे माशी शिंकली आणि आपण समुद्र ओलांडणे अपवित्र वगैरे मानू लागलो कोणास ठाऊक?) जी लौकिक अर्थाने जगाला फार उशिरा समजली तिचे संवर्धन आणि त्याबाबत  जागृतीसाठी प्रयत्न सुरु झाले. ज्यामध्ये 5 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणारा जागतिक समुद्री साधनसंपत्ती दिनाचा प्रामुख्याने समावेश करावा लागतो .
       सागरी किनाऱ्यापासून 12 नाॉटीकल मैल (समुद्रातील अंतरे नॉटीकल मैल या एककात मोजतात . एक नॉटीकल मैल म्हणजे सूमारे  दिड किलोमीटर ) पर्यतची साधनसंपत्ती फक्त  त्या देशाची असते. त्या भागात फिरणे म्हणजे त्या देशात फिरणे होय. त्या भागात जर एखादा गुन्हा घडल्यास सबंधीत देशाचे कायदे लागू होतात.   त्यापुढील 200 नाँटिकल मैलापर्यतच्या भागातील प्रदेशात  इतर देशांची जहाजे, विमाने विना परवानगी येवू जावू शकतात. मात्र तेथील साधनसंपत्तीवर त्या देशाचाच हक्क असतो. त्यापुढील प्रदेशावर कोण्या एका देशाची नसून त्यावर आंतरराष्ट्रीय हक्क असतो .(या प्रदेशातील पाणी काळे असते, ज्या नौदलाची इथपर्यत जहाजे येवू शकतात . त्याला ब्लँक वाँटर नेव्ही असे म्हणतात)

 त्याबाबत जनजागृती करणे , ही साधनसंपत्ती समुद्रात तळाशी असल्याने ती काढताना पर्यावरणाचे कमीत कमी नूकसान होईल अशी तजवीज करण्यासाठी देशांना भाग पाडणे आदि कामे आंतरराष्ट्रीय समुद्री साधनसंपत्ती संघटनेकडुन केली जातात. जनसामन्यांना या बाबत जागृत करण्यासाठी आयोजित करण्यात येणारा दिन म्हणजे जागतिक समुद्री साधनसंपत्ती दिन. 
भुगोलाच्या दोन मुख्य शाखांपैकी एक असणाऱ्या प्राकृतिक भूगोल (Physician Geography )[दूसरी शाखा म्हणजे मानवी भुगोल म्हणजेच Human Geography] या शाखेच्या समुद्रभुरुपशास्त्र {oceanography} या उपशाखेमार्फत केल्या जाणाऱ्या अभ्यासाची  जनसामन्यांना माहिती व्हावी, यासाठी हा दिन आयोजीत करण्यात येतो.
मित्रांनो, मानवास आकाशाचे, त्यातील ग्रह ताऱ्यांचे ,उपग्रहाचे ,दिर्घीकांचे, तेजोमेघाचे बऱ्यापैकी ज्ञान मानवास झाले आहे. या उलट स्थिती पृथ्वीवरील सर्व समुद्राच्या खालील भूरूपांची जीवसृष्टीची आहे. समुद्राच्या खालील भुरुपांची जीवसृष्टी ची मानवास खुपच कमी माहिती आहे. पणजी येथे स्थापन करण्यात आलेली भारतीय समुद्रविज्ञान संस्था सारख्या संस्था हे अज्ञान दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांना आपले कार्य समाजापुढे आणण्यासाठीचे व्यासपीठ म्हणजे 5 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणारा समुद्र विज्ञान दिन होय.
आपल्या भारतात समुद्राला देवता मानण्याची मोठी परंपरा आहे. रामेश्वर, गणपतीपुळे सारखी अनेक देवस्थान समुद्रकिनारी आहेत. त्यामुळे असेल कदाचित समुद्रविज्ञान या बाबतीत आपल्याकडे पुरेसी जागृती नाही.त्यामुळे आपल्याकडे या सारख्या दिनाची नितांत आवश्यकता आहे.
आपल्याकडील विष्णूच्या अवतारांची यादी बघीतली असता, सुरवातीचे सर्व अवतार हे पाण्यातील आहेत. आधूनिक विज्ञानसुद्धा आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टीची सुरवात पाण्यातूनच झाली, असे मानते. समुद्रमंथनाची गोष्ट सुद्वा आपल्या पुर्वजांना समुद्रातील साधनसंपत्तीची ओळख होती, याची साक्ष देते. मधल्या काळात आपण ते ज्ञान गमावले. ते परत ग्रहण करण्याची संधी आपणास या दिनातून परत मिळणार आहे. चला तर मग हे ज्ञान परत ग्रहण करुया , ज्यासाठी अधिकाधीक लोकांना या दिनाची माहिती देणे आवश्यक.आहे. मग देताय ना,  या दिनाची माहिती इतरांना !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?