भट्टी तापत आहे! सावधान!


काल 30 मार्च रोजी नाग विदर्भातील ( विदर्भातील नागपूर प्रशासकीय विभागाला नाग विदर्भ ,तर अमरावती प्रशासकीय विभागाला वऱ्हाड म्हणतात विदर्भात शेतकऱ्यांचा ज्या  आत्महत्या होतात, त्यातील 95 ते 96% आत्महत्या या वऱ्हाड भागात असतात ) चंद्रपूर जिल्ह्यात मार्च महिना संपायला 1 दिवस शिल्लक असताना तापमानाने 43.4 अंश सेल्यीयस तापमानाची नोंद केली. नाग विदर्भातील नागपूर वर्धा,चंद्रपूर या जिल्ह्याचा काही भागात जंगले आहेत तर गडचिरोली, भंडारा गोंदीया या तिन जिल्ह्यात जवळपास 100% क्षेत्र वनाच्छादीत आहे. मात्र खनिज उत्खनन कार्य तसेच काही औद्योगिक वसाहतींमुळे गेल्या काही वर्षापासुन चंद्रपूर जिल्ह्यात सातत्याने विक्रमी तापमान नोंदवले जात आहे
           दर वर्षी  मागच्या वर्षीचा उच्चांक मोडून नविन तापमान नोंदवले जाते.काही दिवसापूर्वी मुंबईतील पाऱ्याच्या उंचीने 40अंशाची मर्यादा ओलांडली होतीच.तर काही महिन्यापुर्वी द्राक्षाचे नुकसान व्हावे इतकी थंडी नाशिकच्या निफाड तालूक्यात पडल्याचे आपणास स्मरत असेलच. ज्या प्रमाणे मार्च महिन्यापासून तापमानाचे उच्चांकच्या बातम्या येतात, त्याप्रमाणे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तापमानाच्या निच्चांकच्या बातम्या आता आपल्या सवयीचा झाल्या आहेत. आज तीसी पस्तिशीत असणाऱ्या व्यक्ती त्यांचा शालेय जीवनात ज्या ग्लोबल वार्मिंगविषयी बोलत असत, त्याचे दृष्यस्वरूप म्हणून या घडामोंडीकडे बघावे लागेल.

शहरी नोकरीधंद्यात असणाऱ्या पांढरपेश्या मध्यमवर्गाला या बदलाची फारशी झळ बसणार नाही. मात्र शेतकरी वर्गाचे कंबरडेच यामुळे मोडणार आहे. या बदलाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी वर्गाला तयार करणे , हे आपले सध्याचे पहिले कर्तव्य असायला हवे. या हवामान बदलाला सक्षमपणे तोंड देवू शकतील अस्या नव्या पिकांच्या जाती शोधणे आवश्यक आहे.  आपल्या देशातील कृषी विद्यापीठे याबाबत संशोधनात व्यस्त आहेत. मात्र कृषी विद्यापीठ्यातील संशोधनाचा प्रत्यक्ष शेतीत किती टक्के फायदा होतो, हे जगजाहिरच आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठांबरोबर अन्य प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये  सडक्या अन्न धान्यचा वापर करत  विविध मद्याला उत्तेजन देणे, आदी गोष्ट करता येईल. सध्या गाजत असणारे कृषी कायदे हे उत्पादन तयार झाल्यावर त्याचा वितरणाची व्यवस्था करणारे आहे. त्यामुळे मुळातील उत्पादनाची व्यवस्था बिघडवणाऱ्या हवामान बदलाकडे आपण बघायलाच हवे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?