नाशिकपासून हाकेच्या अंतरावील दुर्लक्षित दुर्ग , घारगड !

           

 आपल्या महाराष्ट्राला दुर्गांची मोठी परंपरा आहे  यातील काही दुर्गांवर पर्यटक सत्याने जात असतात . काही दुर्गांच्या नशिबात हे भाग्य मात्र येत नाही . त्या दुर्गांवर अन्य दुर्गांच्या तुलनेत कमी लोक प्रवास करतात असाच एक दुर्ग म्हणजे नाशिक पासून हाकेच्या अंतरावर असलेला घारगड हा किल्ला . मुबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणापासून जवळच आहे .गडावर पोहोचणे काहीसे  सोप्या असणाऱ्या या किल्यावर फारच कमी लोक चढाई करतात  . या किल्यावर मी गरुडझेप दुर्गप्रेमी या संघटनेमार्फत रविवार 7  मार्च रोजी भेट दिली  
किल्यावर फारसे बांधकाम नाहीये . एक भुयार एक मंदिर आणि   2/3  पडकी बांधकामे इतकेच सध्या अस्तित्वात आहे  . पायथ्यापासून सहज अर्ध्यातासात किल्याचा वरती पोहोचता येते . घारगड 
                 या किल्याचा फारशा इतिहास उपलब्ध नाहीये .अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात हा किल्ला मराठ्यांचा ताब्यात आला  सन  1818 मध्ये पेशवाईचा अस्त्र झाल्यावर त्रंबकचा किल्ला ब्रिटिश सत्तेकडे गेल्यावर  काही दिवसनंतर हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला .सध्या किल्ल्याची मालकी भारतीय पुरातत्व खात्याकडे आहे . मात्र किल्ला परिसरात भारतीय पुरातत्व खात्याकडून काहीही सोयीसुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत असो ज्यांना सुट्टीच्या दिवशी कंटाळा येतो काय करायचे ते समजत नाही अश्या लोकांसाठी हा किल्ला एका दिवसासाठी उत्तम ठिकाण आहे . किंवा ज्यांना हिमालयात जाण्यासाठी आपल्या शारीरिक क्षमता वाढवायचा आहेत त्यांच्यासाठी हा किल्ला एक उत्तम साधन आहे . 


         मी हा किल्ला गरुडझेप प्रतिष्टानच्या माध्यमातून बघितला . गरुडझेप प्रतिष्ठानचे नदी सुधारणा दिव्यांग कल्याण वाहतूक सुधारणा आदी विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कित्येक वर्षांपासून कार्य सुरु आहे . त्यांच्याच कार्याचा एक भाग म्हणजे गरुडझेप दुर्गभ्रमंती होय ज्याचा साह्याने मी या किल्याला भेट दिली किल्ल्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग चांगला आहे . नाशिकच्या जवळ असणाऱ्या वाडीवऱ्हे या गावातून या किल्ल्यापर्यंत डांबरी आणि खडीचा रस्ता आहे . या रस्त्यावरील घारगडवाडी या गावातील दत्त मंदिरापासून किल्ल्याकडे जाता येते 
किल्ला एका दिवाश्याच्या छोट्या सहलीसाठी एक उत्तम ठिकाण आहे . मग येताना किल्ल्याला भेट देयाला . या किल्ल्याला मिलालेला अप्रकाशित राहण्याचा शाप मिटवायला . अनेकांना नवनवीन ठिकाणी जाण्याची आवड असते त्यांनी तर या किल्ल्यावर जायलाच हवे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?