बातम्यांमधील चीन


चीन
आपल्या भारताच्या पुर्वेकडील देश. जगात लोकसंख्येचा बाबतीत दुसरा, क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसरा, जगात सर्वाधिक देशांबरोबर सीमा शेअर करणारा, तसेच भारताइतकीच प्राचीन संस्कृती असणारा देश म्हणजे चीन . हा देश गेल्या पंधरवाड्यात बऱ्याचा मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. त्याविषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन .

तर मित्रांनो, गेल्या पंधरवाड्यात टेस्ला या इलेक्ट्रिक वाहनाची निर्मिती करणाऱ्या कंपनीला देशात नाकरलेला प्रवेश, सौदी अरेबिया या देशाबरोबर केलला वीज निर्मितीचा करार, तसेच अमेरीकेच्या अलास्काया राज्यात केलेली चर्चा यामुळे चीन चर्चेत आला  होता. 

भारताचा पाकिस्तानपेक्षा धोकादायक शत्रू चीन आहे,त्यामुळे त्याचा संदर्भातील गोष्टी आपणास माहिती असणे आवश्यक आहे. त्या माहिती करुन घेण्यासाठी आजचे लेखन 


तर मित्रानो टेस्ला या कंपनीच्या गाड्या चीनच्या लषकरी आस्थापने तसेच चीनच्या लष्करच्या रहिवासी क्षेत्रात वापरू नयेत असे चीन प्रशासनतर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे . यामध्ये बसवलेल्या कॅमेरांमुळे परिसराची सुरक्षा धोक्यात येते असे कारण त्यांसाठी देण्यात आले आहे . टेस्ला या कंपनीच्या बाजरपेठेचा विचार करता अमेरिकेनंतरची क्रमांक दोनची बाजरपेठ ही  चीन हा देश आहे . मात्र यातील जाणकरांच्या  मते टेस्ला भारतात करत असलेल्या गुंतवणुकीला शह देण्यासाठी चीनने हे कुंभाड रचले आहे , त्यासाठी चीनच्या वर्तमानपत्रात याच्या आधी टेस्ला या कंपनीविषयी आलेल्या बातम्या आणि ऍपल या कंपनीविषयी चीन प्रशासनाच्या भूमिकेचा दाखला देण्यात येत आहे , टेस्ला या कंपनीला तुम्ही आमची किंवा भारत यापैकी एकाची निवड करण्याचा छुपा सल्ला चीन यातून देत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे . चीनच्या लष्कराशी संबंधित भूभाग आणि संबंधित  लोकसंख्या बघता टेस्ला वॉर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे हे  नक्की  

        एकीककडे हे घडत असतांना सौदी अरेबिया या देशातील सौदी सरकारच्या मालकीच्या तेल उत्पादक कंपनी सौदी अर्मोकॉ या कमानीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नस्सार यांनी ओन्लीणे पद्धतीने सुरु असलेल्या चायना फोराम या कार्यक्रमात सौदी पुढील 50 वर्षे चीनला माफक दारात ऊर्जासाधने पुरवण्यास इच्छुक असल्याचे विधान केले आहे . त्यामुळे एकेकाळी अमेरिकेच्या गळयातील ताईत असलेल्या सौदी अरेबियाला (त्यामुळे जगभर मानवी हक्कांसाठी टाहो फोडणाऱ्या अमेरिकेला सौदी अरेबियातील मानवी हक्क उल्लंघन दिसत नव्हते , असो ) शस्त्रात्रे पुरवण्यामध्ये कपात केली तसेच सौदी बाबत काहीशी कडक भूमिका घेतल्यावर सौदीने चीनशी सौख्य केल्याचे दिसून येत आहे .चीनतर्फे  सौदीला आण्विक हत्यारांसह विविध हत्यारे पुरवण्यासह  सौदीत काही विकासकामे करण्याचे प्रयोजन आहे . भारत अमेरिकेच्या जवळ गेल्यामुळे असेल भारताने  सौदीला तेल उत्पादन वाढवण्याची {ज्यामुळे आंतराराष्ट्रीय बाजारात भाव कमी होतील } किंवा भाव थोडे कमी करण्याची  केलेली विनंती सौदीने अव्हेरली आहे , चीन आणि अमेरिका कटुता सर्वश्रुत आहेच . 

आता बघूया तिसरी घडामोड तर बायडेन यांनी सूत्रे हाती घेतल्यावर प्रथमच चीन आणि अमेरिका यांच्यात अलास्का राज्यातील Anchorage  या शहरात बैठक झाली ,.या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्रीय सल्लागार    jake Sullivan   आणि     Secretary of State  (आपल्या परराष्ट्र  मंत्री समकक्ष ) Antony Blinken यांनी आणि चीन कडून Yang Jiechi and Wang Yi.  यांनी हजेरी लावली चीनकडून तैवान हॉंगकॉंग झिंजियांग राज्यात  ( झिंजियांग या राज्याचा उल्लेख सिंकीयांग असा देखील करतात याला पूर्व तुर्कस्थान म्हणून  देखील ओळ्खतात ) या राज्यात चालवण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला यामुळे जागतिक स्थेर्यावर अनुचित परिणाम होत असल्याने हे चीनचे अंतर्गत मुद्दे ठरत नाही अशी भूमिका अमेरिकडून घेण्यात आली याला उत्तर देताना अमेरिकेने मानवी हक्काची बाजू घेत जगभरात खूप नर संहार केला आहे खुद्द अमेरिकेत अनेकदा मानवी हक्कनचे हनन झाले आहे अशी भूमिका चीनने मांडली 


चीन हा निद्रिस्त ड्रॅगन आहे तो जागा होईल तेव्हा जगाची झोप उडवेल असे विधान स्वामी विवेकानंद यांनी केले होते चीनबरोबर आपले एक मोठे युधद झाले आहे अनेकदा छोटे संघर्ष होत असतात त्या पार्श्वभूमीवर आपण चीनच्या कृतीकडे बघायला हवे माझ्या वेळोवेळी आपणास याबाबत अवगत करण्याचा प्रयत्न असेलच तूर्तास इतकेच , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?