भारतीय रेल्वेची प्रगतीची एक्सप्रेस सुसाट !


सध्या कोरोना संसर्गाच्या भितीने आपल्या महाराष्ट्राची गाडी काहीसी मंदावली असली तरी, भारतीय रेल्वेची प्रगतीची गाडी ठिकठिकाणी हिरवा सिग्नल मिळाल्याने अतिशय वेगात सुरूच आहे. गेल्या पंधरवाड्यात रेल्वेत महत्तवाचे ठरतील असे 3 निर्णय जाहिर झाले,ते बघता ही गाडी काही काळ असीच वेगाने जाणार हे निश्चित 
    तर मित्रांनो, भारतीय रेल्वेची दळणवळण सोयी, संपर्क संदेशवहण यासाठी कार्यरत असणारी  उपकंपनी अर्थात  रेलटेल मार्फत अधिक वेगवान  आणि स्वस्त दराची  तसेच अधिक डेटा मर्यादेची सेवा सुरु करण्यासाठी विविध योजना तयार करण्यात आली आहेत . भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेली रेलटेल ही बि.एस.एन.एल, एअरटेल, वी, जी सारखी ग्राहकांना इंटरनेटसेवा पुरवणाऱ्या कंपनीसारखी तृतीय स्तरावरील कंपनी आहे { अधिक माहितीसाठी समुद्रात मोठमोठ्या तारा आहेत ज्याद्वारे इंटरनेटचा प्रवास होतो, याची व्यवस्था करणाऱ्या कंपनीला पहिल्या स्तरावरचा कंपन्या म्हणतात. या कंपन्याचे समुद्रकिनाऱ्यालगत जगभरात सेंटर आहेत.  तिथून काही कंपन्या इंटरनेट घेतात, त्याला द्वितीय स्तरावरच्या कंपन्या म्हणतात..या दुसऱ्या स्तरावरील कंपन्या आपण ज्यांचाकडून इंटरनेट घेतो, त्यांना म्हणजेच वी, एअरटेल, बिएसएनएल, जीओ ला नेट सेवा पुरवतात वी, बिएस एनएल एअरटेल या कंपन्यांना तिसऱ्या स्तरावरील कंपन्या म्हणतात.} त्यामुळे अत्यंत स्वस्तात  रेलटेल सेवा पुरवू शकतो.हे दर पुढीलप्रमाणे आहेत.
34MBPS या दराने एका दिवसासाठी 10 रूपयात 10 जिबि, 5, दिवसासाठी 20 रूपयात 10 जिबि , तर 30 रुपयात 20 जिबि , 10 दिवसांसाठी 40 रुपयात 20 जिबि, 50 रुपयात 30 जिबि , तर 30दिवसांसाठी 70 रुपयात 60 जिबि डेटा वापरता येवू शकतो. ही प्रिपेड सेवा असून रेल्वेच्या 4000 रेल्वेस्टेशनवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या शिवाय पुर्वी सुरू असणारी 5900 रेल्वे स्टेशनवर अर्ध्या तासासाठी 1MBPS वेगाने मोफत असणारी डेटा सेवा सुरूच राहणार आहे.

   तर रेल्वेच्या प्लँटफाँम तिकीटाबरोबर  उपनगरीय सेवांमधील जवळच्या स्टेशनमधील तिकिट दर वाढवून एकसमान करण्यात आले आहे. पुर्वी उपनगरीय सेवांसाठी न्यूनतम भाडे 5 रुपये होते. तर प्लँटफाँम तिकिट 10 रूपये असे.परीणामी काही चतूर रेल्वेप्रवाशी न्यूनतम प्रवाश्याचे म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनहून खडकी, दापोडी , कासरवाडी असे तिकिट काढत मात्र प्रवास करण्याऐवजी प्लँटफाँमवरील सेवांचा उपभोग घेत असत. यावर मात करण्यासाठी आणि अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी दोन्हींचे भाडे एकसमान करण्यात आले आहे. जे तब्बल 30 रुपये आहे. म्हणजेच प्लँटफाँम तिकीट तिप्पट तर जवळच्या स्टेशनचे तिकीट सहापट महाग करण्यात आले आहे.
        तसेच भारताच्या रेल्वे मालवाहतूकीचा विचार करता अत्यंत मैलाचा दगड असणाऱ्या वेस्टन डेडीकेडेट काँरीडाँरमध्ये रेवाडी ते पालमपूर या दोन रेल्वे स्टेशन दरम्यान रोल अँड रोल ही सेवा सुरु करण्यात आली आहे. ही सेवा रोरो या नावाने सुप्रसिद्ध आहे.यामध्ये रेल्वेच्या एका विशिष्ट प्रकारच्या डब्याच्या मार्फत ट्रकची वाहतूक केली जाते.
तर मित्रांनो,भारतीय रेल्वे आपल्या उत्पनाचा साधनांसाठी पारंपारिक साधनाबरोबर नव्याने साधने निर्माण करत आहे. तसेच अनावश्यक ताण कमी करत असल्याचे हे द्योतक आहे. म्हणजेच भारतीय रेल्वे वेगाने बदलत आहे, असेही आपण म्हणू शकतो. ही बदलांची गती असीच वेगाने विना अडथळा सुरु रहावी असी इश्वरचरणी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो,नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?