बातमीतील पाकिस्तान (भाग1)

 

 पाकिस्तान, शांघाय काँपरेशन, सार्क आदी संघटनेतील भारताचा सहकारी देश. जगभरात  पोलिओ अजून ज्या देशात धूमाकुळ घालतोय,अस्या हाताच्या बोटावर मोजता येइल अस्या देशांपैकी एक देश.ज्या देशातील सात प्रमुख नद्यांपैकी सहा नद्या भारतातून वहात जात त्या देशात प्रवेश करतात असा देश. शांततेच्या काळात ज्या देशासी  दोन रेल्वेमार्गाने (मुनाबाओ-कराची, आणि दिल्ली लाहोर हे रेल्वेमार्ग ) तसेच दोन बससेवेमार्फत(श्रीनगर मुज्जफराबाद, आणि नवी दिल्ली  लाहोर हे बसमार्ग औ)संपर्क ठेवला जातो, तो देश म्हणजे पाकिस्तान
    तर मित्रांनो पाकिस्तान  आपण भारत देशातील विविध राज्यातील निवडणूका आणि कोरोनाचा उद्रेकाच्या बातम्या वृत्तपत्रात वाचताना, आणि वृत्तवाहिन्यांवर बघत असताना तीन  वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आला.त्यातील दोन गोष्टी प्रत्यक्षपणे भारताशी सबंधित आहे. ते सांगण्यासाठी आजचे लेखन. ज्या दोन घटनांशी आपला प्रत्यक्ष सबंध आहे, त्यातील एक घटना भविष्यातील आहे, तर दूसरी घटना सध्या घडत आहे.तर प्रथम सध्या घडत असणारी घटना बघूया .
तर सन 1974 साली भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारानूसार भारतीय शीख बांधव पाकिस्तानात धार्मिक  यात्रेसाठी कधीही जावू शकतात. सध्या शीख बांधवांच्या बैशाखी या सणानिमित्त शीख बांधवांची तयारी सुरू आहे . याच तयारीचा एक भाग म्हणून  भारतातील 1,हजार शीख बांधव इस्लामाबाद जवळील एका गुरुद्वाराला भेट देण्यासाठी अमृतसरहून बसने निघाले आहेत. मात्र पाकिस्तानी केंद्र सरकाविरुद्धचा  ताहरीके लबेक या   मुलतत्ववादी विचारसरणीच्या संघटनेचा नेता रिझवी याने सुरु केलेल्या आंदोलनामुळे ते लाहोर येथे एका गुरुद्वारात अडकले आहे. फ्रान्स चे अध्यक्ष मेक्राँन यांनी इस्लाम धर्माविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानने फ्रान्सबरोबर सर्व प्रकारचे सबंध तोडून टाकावे, अशी मागणी  रिझवी याने केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यावेळी पाकिस्तान सरकारने2021 एप्रिल 20पर्यत फ्रान्ससी असणारे सर्व प्रकारचे सबंध तोडण्यात येइल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानुसार काहीही कार्यवाही न केल्याने रिझवीने अचानक आंदोलन सुरू केले. त्याला पाकिस्तानात मोठा पाठिंबा मिळत आहे. परीणामी अचानक सुरु झालेल्या या आंदोलनामुळे पाकिस्तानला गेलेले भाविक लाहोरजवळच अडकून पडले आहेत. 
अमेरीकन सरकारच्या संरक्षण खात्याचा एका विभागामार्फत जगातील संभाव्य आर्थिक, लष्करी घडामोडींचा अंदाज व्यक्त करणारा अहवाल प्रसिद्ध दर 4वर्षांनी प्रसिद्ध करण्यात येतो. हा अहवाल शास्त्रीय पद्धतीने माहिती मिळवून तिचे शास्त्रीय पद्वतीने  विश्लेषण करुन तयार केला जातो.अहवाल ज्या वर्षी प्रसिद्ध होतो मागील अहवालातील त्यात सांगितलेल्या अनेक संभावत्या घटना घडलेल्या आहेत.अहवाल प्रसिद्ध होतो त्याचा पुढील 4 वर्षाचा अंदाज यात व्यक्त केला असतो.नुकत्याच 2021साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालामध्ये भारत पाकिस्तान यांच्यात मोठे युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतात दहशतवादी हल्ला किंवा भारताने सिंधू पाणी वाटप कराराचे उल्लंधन केल्यामुळे हे युद्ध सुरू होईल असे या अहवालात सांगितले आहे.आता खरच हे युद्ध होते का ?हे येणारा काळच ठरवेल.
युनाटेड किंग्डम आँफ ग्रेट बिट्रन अँड नार्दन आयर्लंड (आपल्या बोलीभाषेत इंग्लंड जो या देशातील एक भाग आहे.)या देशाकडून आर्थिकदृष्ट्या ज्याच्यांशी व्यापार करणे धोक्याचे आहे, अस्या देशांची यादी प्रसिद्ध केली आहे. जागतिक व्यापार संघटनसुद्धा असी यादी.प्रसिद्ध  करत असते. मात्र  युकेच्या यादीपेक्षा ही यादी वेगळी असते. तर युनाटेड किंग्डम आँफ ग्रेट बिट्रन अँड नार्दन आयर्लंड (आपल्या बोलीभाषेत इंग्लंड जो या देशातील एक भाग आहे.)या देशाकडून आर्थिकदृष्ट्या ज्याच्यांशी व्यापार करणे धोक्याचे आहे, अस्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश करण्यात आला आहे. ही एका देशाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली यादी आहे. जागतिक व्यापार संघटनेकडून प्रसिद्ध केलेल्या यादीपेक्षा हीचे महत्त्व कमी आहे, हे आपण लक्षात घेयला हवे.
पाकिस्तान बरोबर आपण मोठी सीमा शेअर करतो, पाकिस्तानच्या महत्तवाच्या औद्योगिक  शहर असलेल्या सियालकोटपासून आपले जम्मू शहर फक्त 40 ( आपले 25 त्यांचे 15)किमीवर आहे.  पाकिस्तानचा महत्तवाचा प्रांत असलेल्या पंजाबची राज्यधानी लाहोर ते अमृतसर  यातील अंतर 50 किमी आहे. तसेच अन्य शहरांचे आहे. त्यामुळे तेथील घटनांचे आपल्याकडे प्रतिसाद उमटतातच . त्यामुळे आपण त्याबाबत सजग राहिले पाहिजे. मी वेळोवेळी त्याविषयी माहिती देइलच, तूर्तास इतकेच नमस्कार.
(ताजा कलम :हा लेख लिहीत असताना पाकिस्तानविषयी अजून तीन घटना घडल्याचे वृत्त आहे. त्याविषयी पुढच्या भागात बोलेल.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?