बातमीमधील पाकिस्तान (भाग2)


पाकिस्तान,  भारताचे 3 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांबरोबर सीमा शेअर करणारा देश. राजकारणी लोकांकडून सातत्याने आपल्या विरोधकांना ज्या देशात जा, असे सांगितले जाते, तो देश म्हणजे पाकिस्तान. असा पाकिस्तान हा देश गेल्या महिन्याभरात 6 वेळा चर्चेत आला. त्यातील 3गोष्टींचा उहापोह मी कालच्या लेखात केला. आज उरलेल्या तीन गोष्टींविषयी बोलूया . 
तर  तूर्कस्थान या देशाला पाकिस्तानच्या   जाँइट चीफ आँफ स्टाफ कमिशन प्रमुख {आपल्याकडील चिफ आँफ आर्मी स्टाफ समकक्ष हे पद आहे}  नदीम राझा यांनी खुप दिवसासाठी भेट दिली
युरोप आणि आशिया खंडात असणारा घटनेनूसार धर्मनिरपेक्ष मात्र मुस्लिम बांधवांची जवळपास 100% वस्ती असणारा देश म्हणून तूर्कस्थान ओळखला जातो. या देशाची इच्छा मुस्लीम जगताचे नवे नेर्तृत्व म्हणून तूर्कस्थानला ओळखावे असी  आहे.(सध्या मुस्लिम जगताचे नेर्तृत्व सौदी अरेबिया करत आहे.  जे स्थान मिळवण्यासाठी इंडोनेशिया आणि तूर्कस्थान स्वतंत्र्यपणे प्रयत्न करत आहेत) या भेटीत पाकिस्तान आणि तूर्कस्थानात घट्ट मैत्री व्हावी, मे यासाठी भरीव कार्य केल्याचा प्रित्यर्थ सम्मान करण्यासाठी हेतूने त्यांना तूर्कस्थानाचा सर्वोच्च नागरी सम्मान देत आहोत, असे तूर्कस्थानने जाहिर केले आहे.जरी मैत्रीत घनिष्ठता यावी यासाठी हा सम्मान देत असल्याचे सांगण्यात येत असले तरी, पाकिस्तानने तूर्कस्थानाची  आधूनिक विमाने तूर्कस्थानला आण्विक हत्याराचे तंत्रज्ञान देण्याचा बोलीवर घेतल्यामुळे हा सम्मान दिला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.पाकिस्तानचा पुर्वेतिहास बघता हे होणे सहजशक्य आहे. या मदतीचा वापर आपणाविरूद्धच होणार हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
मात्र सर्वच वाइट आहे, असे नव्हे .भारतासाठी चांगली गोष्ट सुद्धा घडत आहे. चीनच्या बिल्ट रोड इनेसेटिव्ह (BRT) या अंतर्गत होणाऱ्या चीन पाकिस्तान इकाँनाँमिक्स काँरीडाँर (CPEC { ज्यास सिपेक म्हणून ओळखतात}) मध्ये होणाऱ्या काही महामार्गाचा कामासाठी चीनकडून गेल्या वर्षाभरात 4पैकी 3 तिमाहीत उशीरा पैसे मिळाले असल्याचे पाकिस्तान नँशनल हायवे आँथेरेटीने जाहिर  केल्याचे  वृत्त द हिंदूने दिले आहे. याच बातमीत BRTच्या जगभरातील कामांसाठी चीन कडुन 54% निधीची कपात झाल्याचे म्हंटले आहे.पाकिस्तानच्या सर्व 4 ही पुर्ण प्रांतात याचा परीणाम होणार आहे( पाकिस्तानात पंजाब, खैबर ए पश्खुतनवा 【 याला आताआतापर्यत वायव्य सरहद प्रांत म्हणत】, सिंध , बलूचिस्थान हे पुर्ण प्रांत आहेत. तर इस्लामाबाद या राजधानीच्या क्षेत्रासह  गिलगीट- बाल्टीस्थान, आझाद काश्मीर याला फेडरली अँडमिस्टेड टेरीटरी म्हणतात) पाकिस्तानची प्रगती होण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्तवाचे आहे. BRT प्रकल्पात भारता शेजारचे तसेच जगभरातील अनेक देश सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही घडामोड भारतासाठी सुखवणारीच म्हणायला हवी.
आता बघूया तिसरी घडामोड .तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या विकास होण्यात महत्तवाची भुमिका बजावणाऱ्या  भारताच्या दोन जलविद्युत प्रकल्पाला पाकिस्तानने विरोध केला असला, तरी भारताने या विरोधाला केराची टोपली दाखवली आहे. बियास या नदीवर हे दोन जलविद्युत प्रकल्प आहेत भारत पाकिस्तानमध्ये 1960  साली झालेल्या आणि उभयतांमध्ये युद्ध सुरु असताना देखील अमलात आणलेल्या सिंधू वाटप कराराचे हे उल्लंधन आहे, भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तानची शेती धोक्यात येईल अशी प्रतिक्रिया पाकिस्तानने व्यक्त केली आहे. तर आपण करत असलेली कृती कराराचे उल्लंधन नसून करारानूसार भारत वापरु शकत असलेले मात्र अद्याप न वापरलेले पाणी वापरण्यासाठी हे जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे, असे आपले म्हणणे आहे.
पाकिस्तानमधील घटना आपल्यावर मोठा परीणाम करतात. त्या आपणापर्यत पोहोचवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, तूर्तास इतकेच, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?