भारत आणि बिमस्टेक2021

 


आपल्या महाराष्ट्रात कोरोनाच्या संख्येबाबत आपली महाराष्ट्रातील माध्यमे, मनात भिती उत्पन होवून त्या भितीपोटी मनोशाररीक विकाराद्वारा कोरोना होतो का ? असे वाटावे असे वार्तांकन करत असताना, 1एप्रिल रोजी ज्या संघटनेमध्ये भारत महत्तवाचा सदस्य देश आहे, अस्या बिमस्टेक या संघटनेतील मंत्री स्तरावरील परीषद आँनलाइन पद्धतीने झाली. ही या प्रकारची 17 वी परीषद होती. या परीषदेचे अध्यक्षपद श्रीलंकेकडे होते.

    ज्यांचा बंगालचा उपसागराला किनारा लागून आहे, किंवा बंगालचा उपसागरासी जवळचा संपर्क आहे, अस्या सात देशांची संघटना म्हणजे बिमस्टेक . भारत ,श्रीलंका, नेपाळ, भुटान,बांगलादेश, म्यानमार ,थायलंड हे सदस्य देश असणाऱ्या या संघटनेची स्थापना एका जाहिरनाम्याद्वारे थायलंडची राजधानी बँकाक येथे 1997 साली झाली. बिमस्टेक हे या संघटनेचे संक्षीप्त रुप आहे, जीचे पुर्ण रुप आहे Bay of Bengal, intiative for mulut sectorial technological and economical cooperation  . या संस्थेचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाली. सुरवातीला ही संघटना सहा उदिष्टांसाठी स्थापन झाली होती. त्याचामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ 2008 मध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. आज 2021 मध्ये ही संघटना 15 उदिष्टांसाठी कार्यरत आहे.  व्यापार, पर्यटन शेती, मासेमारी ,हवामान बदल हे त्यातील काही प्रमुख क्षेत्रे आहेत.


या वर्षी झालेल्या बिमस्टेक मंत्रीस्तरावरील चर्चेत भारताचे प्रतीनिधीत्व भारताचे परराष्ट्र मंत्री  एस जयशंकर यांनी केले. या परीषदेत भारताने  संभाव्य नैसर्गिक आपत्तीचे पुर्वावलोकन, संघटनेतील सदस्य देशांतील दळणवळण,  पर्यटन तसेच विविध देशातील गुन्हेगारांचे नागरीकांचे हस्तांतरण (या हस्तांतराचा मुख्य फायदा भारत श्रीलंकेदरम्यान मासेमारी करताना दुसऱ्याचा सागरी हद्दीत गेल्यामुळे अटक होणाऱ्या कोळ्यांना होणार आहे.) आदी बाबतीत आपली कटीबद्धता दाखवली.

     सार्कमध्ये पाकिस्तान देत असलेल्या त्रासाला प्रत्यूतर म्हणून उभारण्यात आलेल्या या संघटनेच्या 2021 च्या अधिवेशनात तीन गोष्टींवर सदस्य राष्ट्रांमध्ये MOU {memorable Of Understanding}वर सहमती दर्शवण्यात आली, ज्यामध्ये सदस्य राष्ट्रांमध्ये गुन्हेगारांचे हस्तांतरण करण्यासाठी करार करणे, एकमेकांसाठी सांस्कृतिक आणि राजकीय आदानप्रदान व्हावे यासाठी संस्थांची उभारणी करणे आणि कोलोंबा येथे प्रादेशिक सांस्कृतिक केंद्र उभारणे या गोष्टी होत्या.

भारत ज्या संघटनांमध्ये सहभागी आहे, त्या संघटनांमधील परीषदेची माहिती मी यापुढे आपणास वेळोवेळी देइलच , तूर्तास इतकेच, नमस्कार. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?