बातमीतील पाकिस्तान भाग 3


सध्या आपल्या भारतात जरी कोरोनाचा उद्रेक हा विषय सर्व माध्यमांमध्ये दिसत असला तरी चँनेल न्युज एशिया, बिबिसी, आणि यासारख्या अन्य माध्यमांमध्ये कोणत्या विषयावर वार्तांकन केले जात आहे. याचा मागोवा घेतल्यास आपणास उत्तर मिळते पाकिस्तान .
गेल्या तीन ते चार दिवसात घडलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे बघीतल्यास 3गोष्टींमुळे पाकिस्तान चर्चेत आला आहे. पहिली गोष्ट म्हणजे युनाटेड अरब अमिरात या देशाच्या अमेरिका देशातील राजदूताने भारत पाकिस्तान विषयी केलेले विधान, दुसरी गोष्ट म्हणजे अमेरीकेने रशियाला अमेरिकेच्या अंतर्गत बाबीमध्ये ढवळाढवळ केल्याचा आरोपावरुन एक कंपनी,आणि सहा नागरीकांवर लादलेले निर्बंध आणि तिसरी गोष्ट म्हणजे फ्रान्स विरूद्ध होणारे दंगे. आता बघूया एक एक गोष्ट सविस्तरपणे.
तर अनेक आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये ज्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, त्या बाबीवर अर्थात भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा गोष्टीला युनाटेड अरब अमीरात या देशाच्या अमेरिकेतील राजदूताने पुष्टी दिली आहे. युनाटेड अरब अमिरात जगभरात स्वतःची प्रतिमा साँफ्ट पाँवर करण्यासाठी गेल्या काही वर्षात प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नातून त्यांनी इशान्य आफ्रिकेतील   इथोपिया आणि इथेरिया या दोन देशात 2018साली शांतता प्रस्थापित केली. आता भारत आणि पाकिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहेत. ज्याची पुष्टी आता झाली आहे.हा मजकूर लिहीत असताना दोन स्वतंत्र्य दौऱ्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर  आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहमद्द कुरेसी युनाटेड अरब अमिरातमध्ये आहे. मात्र या दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांचा भेटीचा काहीही कार्यक्रम नसल्याचे वृत्त द हिंदूने दिले आहे.
आता बघूया दूसरी घडामोड. तर अमेरीकेचा अध्यक्ष हा रिपब्लिकन पक्षाचा व्हावा यासाठी समाजमाध्यमांमध्ये बनावट खाती तयार केली,ज्याद्वारे  जनमत रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने 2016 आणि2020 साली वळवण्याचा प्रयत्न रशियाने केला. या रशियाचा प्रयत्नाला पाकिस्तानामधील सेकंड आय सोल्युशन या कंपनीने आणि 6नागरीकांनी मदत केली, असा आरोप करत या कंपनीविरूद्ध तसेच 6नागरीकांविरुद्ध अमेरीकेने सँक्शन जाहिर केले आहेत. या कंपनीने बनावट कागदपत्रे तयार करुन डेमोक्रँट्रिक पक्षाविरोधात विविध फेसबुक खाती, पेजेस गृप तयार केले, असा आरोप त्यांच्या विरोधात आहे.असा प्रकारचा प्रकार 2024 किंवा 2028च्या निवडणूकीत आपल्याकडेही होवू शकतो, कारण भारतीय ज्या प्रमाणात आपल्या पक्षांना ओळखतात, तितकेच पाकिस्तानी ओळखतात , अशी भिती यामुळे निर्माण झाल्याची भिती या क्षेत्रातील माहितगार व्यक्त करत आहेत.
आता बघूया तिसरी घडामोड तर पाकिस्तानचा पस्तीशीतील धार्मिक नेता रिझवी च्या अटकेच्या विरोधात पाकिस्तानात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. रिझवीचे समर्थक रस्त्यावर जाळपोळ करत आहे. ज्यामध्ये काही लोकांचा बळी देखील गेला आहे. फ्रान्सच्या सरकारने त्यांचा नागरीकांना तात्काळ देश सोडण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी 16 एप्रिलला त्यांचा सरकारने संपुर्ण देशातील इंटरनेट सकाळी 11 ते दूपारी 3पर्यंत बंद ठेवले होते. रिझवी ताहरीके लबेक पाकिस्तान या कट्टर धार्मिक संघटनेचा नेता आहे. या संघटनेच्या मते पाकिस्तानात पुर्णतः शारीया लाँ लावावा. इस्लामेत्तर लोकांना इस्लाम मान्य करण्यास सरकारने  भाग पाडावे. सरकारने या संघटनेवर बंदी घातली आहे. फ्रान्स चे अध्यक्ष मेक्राँन यांनी इस्लाम धर्माविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानने फ्रान्सबरोबर सर्व प्रकारचे सबंध तोडून टाकावे, अशी मागणी  रिझवी याने केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यावेळी पाकिस्तान सरकारने2021 एप्रिल 20पर्यत फ्रान्ससी असणारे सर्व प्रकारचे सबंध तोडण्यात येइल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानुसार काहीही कार्यवाही न केल्याने रिझवीने अचानक आंदोलन सुरू केले.
पाकिस्तानातील बदलांचा आपल्यावर निश्चितच परीणाम होतो, त्यामुळे ते सांगण्याचा माझा प्रयत्न होता, तो आपणास आवडला असेल. असे मनोमनी मानून सध्यापुरते थांबतो, नमस्कार 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?