हार्ट ऑफ आशिया आणि भारत


गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानचे भवितव्य ठरवण्यासाठी तूर्कमेनिस्तान या मध्य आशियातील देशात एक परिषद झाली. ही परीषद 2011 पासून दर वर्षी भरत असते. अफगाणिस्तान या परीषदेचा  कायमस्वरुपी अध्यक्ष असतो.सर्व प्रथम या परीषदेसाठी तूर्कस्थानने पुढाकार घेतल्याने या परीषदेला जरी आशिया  इस्तंबूल समिट असे म्हणत असले तरी या परीषदेचे अधिकृत नाव हार्ट आँफ एशिया समिट असे असते. दरवर्षी एक उद्देश घेवून ही परीषद होत असते. या 2021 चा विषय आहे. अफगाणिस्तानमधील शांतता. ही विविध स्तरावरची परीषद असते. कधी राजदूतांची परीषद होते. कधी सरकारच्या प्रमुखांची परीषद होते, कधी परराष्ट्र मंत्र्यांची परीषद होते. गेल्या आठवड्यात झालेली परीषद ही परराष्ट्र मंत्र्यांची परीषद होती.या परीषदेसाठी भारतातर्फे एस जयशंकर यांनी प्रतिनिधित्व केले.
      अफगाणिस्तान आजपासून 42 वर्षापूर्वी सन 1979 मध्ये युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशिया (USSR)ने आक्रमण केल्यापासून विविध प्रकारची अस्थिरता अनुभवणारा देश. दहा वर्षे चाललेल्या या युद्धात  अमेरीकेने केलेल्या काही गोष्टींमुळे अफगाणिस्तान धार्मिक कट्टर पंथीयांचा ताब्यात गेला. ज्याचा शेवट  न्युर्याक येथील वल्ड टाँवर सेंटरवर विमाने धडकवण्यात झाली. त्यानंतर अमेरीकेने अफगाणिस्तानवर हल्ला करुन धार्मिक कट्टरता नष्ट करायचा प्रयत्न केला.  ज्यामध्ये ओसामा बिन लादेन या स्वयंनिर्मित दहशतवादाचा मृत्यू करून कागदोपत्री शेवट केलेला असला तरी अफगाणिस्तानातील कट्टरता  मुळातून संपली नाहीये. असो. मात्र सततच्या युद्धामुळे बेचिराख झालेल्या या देशाची पुनर्स्थापना करण्याचे प्रयत्न सन2009 पासून सुरु झाले. त्या मालिकेमध्ये सन 2011 पासून तूर्कस्थानने विशेष प्रयत्न सुरू केले, ते म्हणजे ही परीषद होय.

       आधी तालिबान बरोबर झालेल्या चर्चेदरम्यान ठरल्याप्रमाणे अमेरीका आणि तीच्या साह्यासाती लढणाऱ्या नाटोच्या फौजा 2021 मे 1 रोजी अफगाणीस्तानमधून पुर्णतः जाणार आहे. अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत पुर्णतः मंजूरी दिली होती.मात्र सध्याचे अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जाँन बायडन यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अमेरीकन आणि नाटो सैन्य पुर्णतः माघारी परतल्यावर काही दिवसातच अफगाणिस्तानमध्ये तालीबान पुन्हा सत्तेत येईल. त्या पार्श्वभूमीवर या परीषदेतील तरतूदी महत्वाचा आहेत.भारताने अफगाणिस्तानातील अंतर्गत शांतता आणि बाहेरील शांतता अफगाणिस्तानच्या विकासासाठी आवश्यक आहे. हा मुद्दा मांडण्यात आला.जो भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मांडला.
     भारत अफगाणिस्तानामध्ये सुमारे 450 विकास प्रकल्प उभारत आहे. ज्यामध्ये त्या देशाच्या राजधानी अर्थात काबूल या शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काबूल नदीच्या एका उपनदीवर धरण बांधणे प्रस्तावित आहे. ज्या प्रकल्पाचा अफगाणिस्तानला फायदा होइल .मात्र जे अफगाणिस्तानच्या भौगोलिक क्षेत्रात नाही, असे  इराणच्या चाहबहार बंदरापासून इराण अफगाणिस्तान सीमेपर्यत दळणवळणाच्या आधुनिक सोयीसुविधा या प्रकल्पाचा यात समावेश नाही.
या परीषदेला भारत, तूर्कस्थान , पाकिस्तान , तूर्केमेनीस्तान , चीन अफगाणिस्तान , रशिया , किरगीस्तान, तजाकिस्तान कझागीस्तान उझबेकीस्तान , अर्मेनिया,
इराण सौदी अरेबिया, युनाटेड अरब अमिरात या सदस्य राष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री हजर होते. या15 पुर्ण  सदस्य राष्ट्रांसह 12सहयोगी सदस्य, सात विविध प्रादेशिक विकास संघटना याचा भाग आहेत. 
अफगाणिस्तानमध्ये शांतता असणे भारत पाकिस्तानच्या सबंध सुधारणे तसेच काश्मीरमध्ये शांतता येण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर येणारे दोन महिने अत्यंत महत्तवाचे आहे. याबाबत घडणाऱ्या घडामोडी मी वेळोवेळी आपणास सांगेलच ,तूर्तास इतकेच नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?