वंदन महान समाज सुधारकाला

   

1827 एप्रिल 11 ही फक्त तारीख नाहीये. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची ती जन्मतारीख आहे. त्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा शेतकऱ्यांचे दैन्य जाणणारे , त्याविषयी काय केले पाहिजे?, हे माहिती असणारे, स्त्रीयांची प्रगती होण्यासाठी काय करावे लागेल? ही माहिती असणारे, त्याचासाठी कृतिशील कार्यक्रम राबवणारे, राष्ट्रीय सभेसारख्या समाजसुधारेबाबत केवळ बोलघेवडापणा करणाऱ्या संस्थेवर संस्थेचा कार्यपद्धतीवर संस्थेच्याच अधिवेशानात, पारंपारिक वेशभूषेत अस्सलिखीत इंग्रजीत टिका करणारे, तळागाळातील व्यक्तींचे दुःख आपल्या लेखनीतून समर्थपणे मांडणारे कृतिक्षील समाजसुधारक म्हणजे महात्मा ज्योतीबा फुले.या 2021 या वर्षी त्यांची 194वी जयंती, त्यानिमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
अज्ञानाचा फायदा घेत लोकांना लुबडण्याचा समाजातील प्रतिष्ठीत लोकांचा वृत्तीवर त्यांनी आपल्या लेखनातून कठोर शद्बात टिका केली. आपणास लूबाडले जात आहे, याची जाणीव समाजातील दिन दुबळ्यांना व्हावी यासाठी त्यांनी नाटके, लेख, पोवाडे  लिहले. त्यांची शेतकऱ्यांचा आसूड, तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. 
महिला शिक्षीत झाल्यास सर्व समाजाची प्रगती होईल. कोणत्याही सुधारणेची सुरवात आपल्यापासून करायची असते, हे लक्षात घेवून आपल्या पत्नीला साक्षर करणारे, विधवा महिलांची दैन्यावस्था दूर करण्यासाठी झटणारे, एका ब्राह्मण विधवा महिलेचा पुत्र दत्तक घेणारे. महात्मा फुले , त्यामुळे समकालीन फक्त बोलघेवड्या समाजसुधारकांपेक्षा उजवे ठरतात. आजमितीस देखील त्यांचे नाव सातत्याने घेतले जाते, यातच सर्वकाही आले.समाजातील सर्व प्रकारच्या दैन्यावस्थेला लोकांचे अज्ञानच कारणीभूत आहे, हे लक्षात त्यावर आपल्या लेखनीतून प्रहार करणारे समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतीबा फुले वंदणीय ठरतात.
       समाजाचा पैसा विनाकारण मोठ्या प्रमाणावर साजऱ्या केल्या जाणाऱ्या लग्न आदी समारंभावर खर्च होतो, परीणामी समाजात गरीबी वाढते हे लक्षात घेवून कमी खर्चात लग्न होण्यासाठी सत्यशोधक विवाह पद्धती रुजू करणारे , समाजातील विधवांचे होणारे केशवापन सारखी पद्धत दूर होण्यासाठी न्हावी लोकांचा संप घडवून आणणारे, समाजात कायमस्वरुपी समाजसुधारणा व्हावात यासाठी सत्यशोधक मंडळाची स्थापना करणारे महात्मा फुले त्यामुळे वंदणीय ठरतात.
   प्रसंगी समाजाचा कुटुंबियांचा विरोध पत्करुन, त्यांच्याकडून विविध प्रकारचा अत्याचार, अपमान हसत हसत स्विकारत आपले समाजप्रबोधनाचे कार्य पुढे नेणारे, महात्मा ज्योतीबा फुले वंदणीय ठरतात.महात्मा फुले यांचे कार्य एका ब्लाँग पोस्टचा विषय नाहीच. आज आपणास समाजातील तळागाळातील व्यक्ती समाजात मानाच्या ठिकाणी विराजमान झालेल्या दिसतात, याचे श्रेय निसंशय महात्मा फुले यांनांच जाते.त्यांचा जयंतीनिमित्य सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देत, आपली रजा घेतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?