धूम्रपान बंदी !

 

 टिव्हीवर wion नावाची वृत्तवाहिनी बघत होतो. या वृत्तवाहिनीवर अनेक जागतिक घडामोडी सहजसोप्या ,भारतीय  उच्चाराच्या इंग्रजी भाषेत सांगितल्या असतात. Wion या वृत्तवाहिनीवर ग्रँव्हटाझ् नावाचा एक उत्तम कार्यक्रम बघाच. शांतपणे कोणताही आक्रस्ताळेपणा न करता जागतिक घडामोड यात सांगितली असते, असो.
     मी बघीतलेल्या कार्यक्रमात न्यूझीलंड 2025 पर्यत धूम्रपान विरहीत देश करण्यासाठी उपाययोजत असल्याचे सांगितले होते.(हाच तोच न्यझीलंड आहे, ज्याने कोव्हिड 19 कोरोना या रोगावर जगात पहिल्यांदा यशस्वी नियंत्रण मिळवले. एकदा नियंत्रण मिळाल्यावर आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाहीये) यासाठी 2004 नंतर जन्मलेल्या व्यक्तींना सिगारेट न देणे. सिगारेट विकण्यासाठी आवश्यक  परवानगी किचकट करणे, ज्यामुळे कमी दुकानात सिगारेट विकली जाइल. धूम्रपानासाठीची वयोमर्यादा वाढवणे आदी उपाय योजले जात आहेत. देशातील वाढती कर्करोगाची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.
मरणासंपन्न व्यक्तींना इच्छामरणाचा अधिकार देणे. यासारखे जगाला आदर्श ठरणारे कित्येक कायदे न्युझीलंडमध्ये करण्यात आले आहे. महिलांचा मातृत्वविषयक अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी आपल्या लहान अपत्यांना सयुंक्त राष्ट्रसंघाचा आमसभेच्या सभागृहात घेवून येणे,त्यांना सयुंक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात स्तनपान करणे आदी अनेक उपाययोजना जेमतेम पस्तीशीत असणाऱ्या न्युझीलंडच्या पंतप्रधानांनी केल्या आहेत. भारताला दिशा देणारे अनेक कायदे जसे रोजगार हमी कायदा, माहितीचा अधिकार, महिलांना विधीमंडळात 33% जागा राखीव ठेवणे आदी कायदे हे ज्या प्रमाणे महाराष्ट्राने केले. त्याचप्रमाणे जगाला दिशा देणारे अनेक कायदे न्युझीलंडने केले आहेत. तेही सर्वांना विश्वासात घेवून. लोकशाही मार्गाने .
या आधीचा इतिहास बघता न्युझीलंड यात देखील बाजी मारणार हे नक्की. पर्यावरण रक्षण, हवामान बदल यात न्युझीलंडने केलेले कार्य उत्तमच आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. न्युझीलंडमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तेथील दहशतवाद्याविरोधात त्यांनी राबवलेली मोहिम खरोखरीच वाखण्याजोगी होती  .न्युझीलंडच्या आदर्श भारतीय राजकारण्यांनी घ्यावा, अशी मनोकामना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?