तंत्रज्ञानाचे बळी !


शूक्रवार दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी नाशिकजवळील वालदेवी धरणात एक मुलगा आणि 5 मुली बुडाल्या . फोटो काढण्यासाठी पाण्याचा जवळ जात असताना पाय घसरुन एक जण पडल्यावर त्यास वाचवायला गेलेले अन्य लोक सुद्धा बुडाले. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या गृपमध्ये त्यामुळे शोककळा पसरली.(मुळात शहरात संचारबंदी लागू असताना ते नउ जावूच कसे शकले? त्यांची बुडण्याची जी वेळ सांगितली जात आहे, ती बघता ते सायंकाळी सातपर्यत नाशिकला पोहचू शकतात का ? असे प्रश्न निर्माण होत आहेत, मात्र ते सोडून  देवूया ) मी या दुर्घटनेत आपले आप्तस्वकीय गमवलेल्या  व्यक्तींचा प्रती संवेदना व्यक्त करतो.इश्वर त्यांना हे दुःख पचवण्याची ताकद.देवो, ही इश्वरचरणी प्रार्थना 
 स्व कर्तुत्व ,जगाला सांगण्याची मानवास फार पुर्वीपासून सवय आहे. कोणालाही आपली स्तुती हवी हवीच असते. त्यामुळे मनाला आनंद मिळतो. त्यामुळे त्यांनी फोटो काढाला घेतला , यात गैर काहीच नाही. मात्र तंत्रज्ञानाचा अतिवापर करत फोटो काढण्याचा प्रकार केल्यास अस्या प्रकारचा दुर्घटना घडतात. पुर्वीसारखे एकदा फोटो काढल्यावर आठवड्याभराने फोटो मिळण्याऐवजी लगेच फोटो मिळणे तसेच फोटो न आवडल्यास लगेच दुसरा फोटो काढता येणे, फोटो काढण्यावर पुर्वी जसी 32 फोटोची मर्यादा असे सध्या नसल्यानं उत्साहाचा भरात खुप फोटो काढले जातात, या फोटो काढताना वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे हे बळी गेले आहेत.असे मला वाटते
     मला शाळेत असताना निबंधाला एक विषय असे,"विज्ञान शाप की वरदान" . त्या संदर्भात या घटनेचा विचार करायचा झाल्यास विज्ञानाचा शाप म्हणून विचार करताना ज्या घटनेचा संदर्भ देता येवू शकेल असी ही दुर्देवी घटना आहे. फोटोग्राफीतील सुलभतेचा ते बळी ठरले आहेत. मानवाच्या स्व कौतूकाच्या प्रवृत्तीस तंत्रज्ञानच्या सुलभतेमुळे आलेले अयोग्य स्वरुप म्हणून याकडे बघता येवू शकते. 
काही जण या ठिकाणी लाइफ सेव्हिंग गार्ड का नव्हता? म्हणून प्रश्न उपस्थित करतील. मात्र एखादा समुद्रकिनारा किंवा धरणाचे बँक वाँटर हे खुप मोठे क्षेत्र असते. सबंधीत क्षेत्राच्या एखाद्या टोकाला जर जीवरक्षक असेल तर  माहिती मिळून सुद्धा तो सबंधित क्षेत्रात पोहचेपर्यत दूर्घटना घडलेली असते. एखाद्या जलतरणतलावासारखी तिथे स्थिती  नसते. आणि अस्या क्षेत्रात जिथे जास्त जीवरक्षक ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते.त्यामुळे ज्याप्रमाणे रस्त्यावर जसा  मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असा विचार असतो त्याचप्रमाणे एखादी  मौजमज्जा नंतरही करता येईल.सध्या केली जावू शकते, तितकीच आनंदायी किंबहूना कदाचित त्याहुन जास्त प्रमाणात करता येवू शकते. मात्र एकदा गेलेला जीव परत येणे अशक्यप्राय आहे, याची जाणीव ठेवणे, त्यासाठी एखादा शालेय विषय अस्तिवात आला तरी चालेल, मात्र अंगी बाणवने, आवश्यक आहे,तर आणि तरचं या सारख्या दुर्घटना थांबतील.जाता जाता पुन्हा एकदा यात आपले आप्तस्वकीय गमावलेल्या व्यक्तींचाप्रती संवेदना व्यक्त करुन इथेच थांबतो, नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?