स्मरण एका जग बदलवणाऱ्या घटनेचे

 

   आज सोमवार 19 एप्रिल 2021, आजच्याच दिवशी 46 वर्षापूर्वी म्हणजे 1976 एप्रिल 19 रोजी एक चमत्कार घडला होता. एक विकसनशील देशाने युनाटेड सेव्हीयत सोशालिस्ट रशिया या देशाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह आकाशात यशस्वी प्रक्षेपित केला होता. तो विकसनशील देश होता भारत. आणि त्या उपग्रहाचे नाव.होते आर्यभट्ट . आज भारत जगभरातील अनेकांचे उपग्रह स्वतःच्या प्रक्षेपण यानातून प्रक्षेपीत करतो, भारताचे सुद्धा कित्येक उपग्रह आज अंतराळात भ्रमण करत आहेत. या सर्वाची मुहुर्तमेढ या गोष्टीने रोवली गेली होती. या ऐताहासिक घटनेच्या 46 व्या वर्धापनदिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा .
मित्रांनो, त्यावेळी भारतात प्रचंड प्रमाणात भुकबळी जात होते. गरीबांची संख्या देखील प्रचंड होती. देशातील दूधाचे उत्पादन नगण्य होते. मासेमारीत देश जगाचा विचार करता प्रचंड मागे होता. अस्यावेळी काळाची पाउले ओळखून उचललेल्या पाउल किती गरजेचे आहे. हे आपण जाणतातच.       आज आपण टिव्हीवर विविध वाहिन्या बघतो, तसेच हवामानाचा अंदाज व्यक्त करतो.  इग्नू वाय.सी.एम. ओ.यू. सारख्या विद्यापीठांतून खेडोपाडी शिक्षण देतो, शत्रूवर लक्ष ठेवतो. यामागे सर्व किमया असते. ती उपग्रहांची. भारताने हवामानाचा अभ्यासासाठी जीसँट तर शिक्षणासाठी एज्यूसँट या  प्रकारचे उपग्रह अवकाशात सोडले आहेत. यासाठीची सुरवात होती ती. 
चंद्रावर पहिल्यांदा पाउल ठेवताना नील आमस्टाँगने जे ऐताहासिक वाक्य उच्चारले होते ( हे माझे छोटेस पाउल असले तरी मानवाच्या प्रगतीचे मोठे पाउल म्हणून याची नोंद होईल) त्याचप्रमाणे जगातील अन्य  विकसीत देशांसाठी ही छोटीसी गोष्ट असली तरी भारतासाठी अत्यंत मोठी गोष्ट होती ती. जगात पहिल्यांदा अवकाशात उपग्रह सोडल्यावर 18 वर्षानी झालेली ,जेमतेम 18 वर्षांनी. 25 वर्षापूर्वी  एक अत्यंत अविकसीत , गरीब अवस्थेत, फाळणी होवून (ज्यामुळे मानवी इतिहासातील एक वाइट अध्याय असलेल्या दंगली झाल्या होत्या) दिडसे वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालेल्या देशाने केलेला भीम पराक्रम होता तो. त्याच्याबरोबर स्वातंत्र्य मिळालेल्या देशांच्या स्वप्नात देखील जी गोष्ट आली नव्हती. ती गोष्ट आपल्या भारताने केली होती.त्याबद्दल समस्त भारतीयांना आपला स्वतःचा अभिमान वाटायला हवा.
त्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांनी स्व कष्टावर भारताची स्वतःची उपग्रह प्रक्षेपण यंत्रणा उभारली. ज्याद्वारे आजमितीस भारत इतर देशांचे संस्थाचे उपग्रह अन्य देशापेक्षा कमी खर्चात पाठवून परकीय चलन मिळवत आहे. तसेच एकाचवेळी जास्तीत जास्त संख्येने तसेच वजनाचे उपग्रह अवकाशात विविध कक्षेत पाठवत आहे. ज्यामुळे जगभरात भारतीय शास्त्रज्ञांचे नाव आदराने घेतले जाते.याची सुरवात या घटनेने झाली होती. 
या ऐतिहासिक घटनेबद्दल सर्व भारतीयांना पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?