भारत अमेरीका सबंध ,नव्या वळणावर


अमेरीका, जगातील भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा, मुक्त विचारांचा पुरस्कर्ता, जगातील एकेकाळची महासत्ता, क्षेत्रफळाचा विचार तिसऱ्या क्रमांकाचा देश.आधूनिक लोकशाही ज्या देशात सुरवातीला आली, त्यापैकी एक देश. या देशाबरोबर आपल्या भारताचे सबंध नव्याने विकसीत होत आहेत. गेल्या महिन्याभराचा विचार करता अमेरीका आणि भारत सबंधात चार घडामोडी घडल्या त्याची माहिती देण्यासाठी आजचे लेखन.
तर आजपासून एक महिन्यापूर्वी क्याड या समुहा अंतर्गत येणाऱ्या  भारत अमेरीका, जपान आँस्टोलीया या सदस्य देशांच्या प्रमुखांंनी चीनचा वाढत्या आर्थिक आणि लष्करी ताकदीबाबत काय उपाययोजना करता येईल, याबाबत आँनलाइन पद्धतीने चर्चा झाली. ज्यावर अनेक बाबींवर चर्चा झाली. भारताकडून पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी या चर्चेत भाग घेतला. आँस्टोलीयेकडून त्यांचे पंतप्रधान तर फ्रान्स आणि अमेरीकेकडून त्या त्या देशाच्या अध्यक्षांशी सहभाग नोंदावला 
    तसेच नुकतेच क्याड या समुहातील चारही सदस्य देश आणि फ्रान्स हा जगात सर्वाधिक स्पेशल इकाँनाँमिक्स झोन असलेल्या देशांनी एकत्रीत {आपण फ्रान्सला युरोपिय देश समजत असलो तरी दक्षीण अमेरीकेतील फ्रेंच गयाना सारखे जगभरात फ्रान्सचे अनेक प्रदेश आहेत. ज्याला ओव्हरसीज फ्रान्स म्हणतात. या ओव्हरसीज फ्रान्समुळे जगात सर्वात जास्त स्पेशल इकाँनाँमिक्स झोन हा फ्रान्सचा आहे}एक नौदल कवायत देखील केली.
सुमारे तीन आठवड्यांपुर्वी अमेरीकेचे सेक्रेटरी आँफ डिफेन्स जेम्स आँस्टन (अमेरीकेत अध्यक्षीय पद्धत असल्याने तेथील तेथील विविध प्रमुखाना सेक्रेटरी म्हणतात .आपल्या भारताच्या केंद्रीय कँबिनेट मंत्र्यांचा समकक्ष त्यांचा दर्जा असतो.) [आपण ज्याला मुख्यमंत्री म्हणतो, त्या पदाला युनाटेड किंग्डम मध्ये (बोली भाषेत इंग्लडमध्ये)फस्ट मिनिस्टर म्हणतात.फस्ट मिनिस्टर आँफ स्काँटलंड वगैरे] जेम्स आँस्टन यांचा हा दौरा जाँन बायडन यांनी सत्तेची सुत्रे हाती घेतल्यावरचा पहिला मोठ्या व्यक्तीचा दौरा होता. जपान , साउथ कोरीया आणि भारत या त्रीदेशीय दौऱ्यातील हा शेवटचा भाग होता. या तीन दिवशीय भारत दौऱ्यात आँस्टन यांनी तीन मुख्य मुद्यांवर भारताबरोबर चर्चा केली पहिला मुद्दा इंडो पँसिफिक गटातील चीनचे वाढते प्रभुत्व आणि चीन भारत सीमाविवाद हा होता. दूसरा मुद्दा भारतातील दहशतवादी हल्ल्यात अमेरीका कसे साह्य करू शकते हाचौ होता. तर तिसरा मुद्दा अफगाणिस्तानमधील शांतता हा होता. आँस्टीन यांनी राजनाथसिंह, नरेंद्र मोदी , अजित डोवाल यांच्यासह विविध लोकांशी चर्चा केली .
आता बघूया चौथी घडामोड .तर 7एप्रिल रोजी अमेरीकेच्या लष्करी जहाजाने लक्षद्वीप बेटांजवळ भारताच्या पुर्वपरवानगी शिवाय भारताच्या स्पेशल इकाँनाँमिक्स क्षेत्रात प्रवेश केला . कोणत्याही देशाच्या किनारपट्टीपासून 12 नाँटिकल (एक नाँटिकल मैल म्हणजे 1.82 किलोमीटर )मैलापर्यत टेरोट्रीयल वाँटर समजले जाते. या भागातून जाणे म्हणजे त्या देशातून जाणे म्हणतात. तेथून 200 नाँटिकल मैलापर्यतचा भाग स्पेशल इकाँनाँमिक्स झोन समजला जातो, या भागातून दूसऱ्या देशाच्या व्यापारी आणि प्रवाशी  जहाजाला जायला काही अडकाठी नसते.मात्र जर लष्करी जहाज जायचे असल्यास सबंधीत देशाची परवानगी लागते.तसेच त्यावरील तोफांची दिशा किनाऱ्याचा विरुद्ध ठेवावी असा 1982साली जागतिक करार आहे. अमेरीकेने या करारावर सही केलेली नाही. तसेच मुक्त समुद्री मार्ग असे अमेरीकेचे धोरण असल्याने अनेकदा अमेरीका इतर देशांच्या स्पेशल इकाँनाँमिक्स झोनमध्यून प्रवास करते , तसाच तो त्यांनी 7 एप्रिलच्या दिवशी केला 
जागतिक राजकरणात संदर्भ नेहमी बदलत असतात .1971 ला भारतविरोधी पाकिस्तानला साह्य करणारी अमेरीका आता आपल्याबरोबर मैत्री करण्यास उत्सुक आहे.1962 साली चीनविरोधी यूद्धात आपणास मदत नाकरणारा रशिया तीनच वर्षानी आपल्या मदतीस धावला. आताही तसेच होत आहे. हे बदल आपणापर्यत मी वेळोवेळी सांगेलच तूर्तास इतकेच नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?