सौदीतील बालके गिरवणार रामायण, महाभारताचे धडे


सौदी अरेबिया, जगातील 25% देशांचा(सयुंक्त राष्ट्रसंघ, आँल्मपिकं या संघटनेनूसार जगात 210 देश आहेत.त्यातील 51 देशांचाअधिकृत धर्म  इस्लाम आहे. ) अधिकृत धर्म  इस्लाम ज्या देशात 1400 वर्षापुर्वी उदयास आला. तो देश म्हणजे सौदी अरेबिया , आपल्या कट्टरतेमुळे, तसेच अत्यंत कडक कायद्यामुळे जगात ओळखला जाणारा देश म्हणजे सौदी अरेबिया. ज्या देशातून एकही नदी वाहत नाही, तसेच जगात सर्वाधिक नैसर्गिक इंधनाचे स्त्रोत असणारा देश म्हणजे सौदी अरेबिया. राजाचे आडनाव ज्या देशाच्या नावात आहे, असा 100वर्षापूर्वी स्थापन झालेला राजेशाहीचा देश म्हणजे सौदी अरेबिया
तर अश्या सौदी अरेबियात हिंदू धर्मियांसाठी  मोठा निर्णय ठरेल असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. हा लेख लिहीत असेपर्यत याबात सौदी अरेबिया सरकारकडून काहीही अधिकृत जाहिर करण्यात आलेले नाही. मात्र गैर सरकारी संस्थेचा हवाल्याने बोलायचे झाल्यास ही बातमी 100% खरी आहे.
        तर सौदी अरेबियातील पुढील पिढी सहिष्णू  इस्लामेत्तर धर्मियांचा आदर करणारी आधूनिक विचारसरणीची बनावी, या हेतूने  भावी सौदी राजे प्रिन्स बिन सलमान यांच्या कडून काही बदल करण्यात येत आहेत. या बदलास vision 2030 असे म्हणतात. या बदलांनूसार सौदीतील शालेय अभ्यासक्रमांमध्ये या पुढे विविध धर्मीयांची ओळख करुन देण्यात येणार आहे. ज्यामध्ये हिंदू धर्मियांची ओळख करुन देताना रामायण आणि महाभारत या ग्रथांचा परीचय सौदी अरेबिया या देशातील मुलांना करुन देण्यात येणार  आहे. सौदीतील पहिली अधिकृत योगा शिक्षक  नाँली अलमरेया यांनी केलेल्या ट्टीट मुळे ही गोष्ट   जगासमोर आली. नाँली यांनी मुलाची समाजशास्त्र  विषयाची प्रश्नपत्रीका जगासमोर ट्टीटरद्वारा आणली. ज्यामुळे ही गोष्ट जगाला समजली. नाँली या सौदीत वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरीक आहेत .
काही परदेशस्थ वृत्तपत्रांनुसार सध्याची भारताकडून सौदीकडे कमी होत असलेली तेलाची मागणी, तसेच जगाचा अपारंपरिक उर्जासाधनांकडे वाढत जाणारा कौल विचारत घेवून भारताची बाजारपेठ टिकवण्यासाठी सौदीने खेळलेली ही चाल आहे. यासाठी सौदीवर या आधी अमेरीका आदि देशातून कट्टरतेचे असहिष्णूतेचे  शिक्षण देण्याचा आरोप होवून सुद्धा न बदलण्याचा आणि आता बदलण्याचा संदर्भ दिला जात आहे.
सौदी खरोखरीच आधूनिक बनण्यासाठी हे पाउल उचलत आहे की, यामागे त्यांचे व्यापारी हितसबंध आहेत, हे येणारा काळच ठरवेल, ते त्याचावरच सोडलेले बरे. मात्र यामुळे सौदीच्या वाळवंटात हिंंदू धर्मियांची थोडी का ओळख होणार हे नक्की!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?