गर्जा महाराष्ट्र माझा !

 

महाराष्ट्र, राज्यातील प्रजाननांना सुशासन मिळावे म्हणून  देशात पहिल्यांदा माहितीचा अधिकार लागू करणारे राज्य .(ज्याची उपयुक्तता लक्षात आल्यावर केंद्राने समस्त देशात लागू केला)देशाला एक्सप्रेस वे, रोजगार हमी कायदा यांची ओळख करुन देणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र, देशातील  सार्वजनिक परीवहन सेवेला बळकटी मिळावी यासाठी एसटीचा प्रयोग आपल्या राज्यात करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र  .महिलांचे राजकारणातील प्रमाण वाढावे म्हणून कायदा करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र,देशाच्या महसुलात सर्वाधिक वाटा उचलणारे राज्य उचणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. अभियांत्रीकी आणि वैद्यकीय शिक्षणाची गंगा जनसामान्यापर्यत पोहोचावी, यासाठी उपाययोजना करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. अहिंदी पट्टयातील असूनदेखील हिंदींचा सहजतेने स्विकार करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचे आजचे स्वरुप म्हणजे महाराष्ट्र.
या अस्या महाराष्ट्राचा 1 मे हा स्थापना दिवस त्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज 2021 साली महाराष्ट्र 61 वर्षाचा झाला. मानवी आयुष्याचा विचार करता महाराष्ट्र हा  काळ वृद्धत्वाचा समजला जातो. मात्र एखाद्या प्रदेशाबाबत हा काळ काहीच नाही, त्या हिशोबाने महाराष्ट्राला अजून बराच मोठा पल्ला गाठणे बाकी आहे
    आज महाराष्ट्र राज्य कोरोनाचा वाढत्या संख्येमुळे देशभरात नकारात्मक प्रसिद्ध होत आहे. मात्र ही नकारात्मकता काही काळच असणार आहे.  हा कोरोनाचा प्रकोप संपल्यावर  महाराष्ट्राचा हा कलंक पुसला जावून नव्या दम्याने भारताचे नेर्तूत्व करण्यास महाराष्ट्र सरसावेल या बाबत खात्री बाळगा. देश अडचणीत असताना ,देशात नव्याने काही उभारताना महाराष्ट्रीयन व्यक्तीचे योगदान न विसरता येण्यासारखे नाही. यशवंतराव चव्हाण,  सि .डी देशमुख ही त्यापैकी काही नावे. स्वातंत्र्य भारतात महाराष्ट्राला रेल्वेमंत्रीपद फार कमी वेळा मिळाले. मात्र जेव्हा मिळाले तेव्हा महाराष्ट्रीयन व्यक्तींनी नेहमी देशाच्याच प्रगतीचा विचार केला. अन्य लोकांप्रमाणे स्व राज्याचाच विचार केला नाही(त्याची काही प्रमाणात झळ सुद्धा सोसली. कल्याण-अहमदनगर-परळी तसेच नाशिक -पुणे आदी रेल्वेमार्गाबाबत झालेला विलंब  ही त्याचीच उदाहरणे)
आपल्या प्राणाचे 107 जणांनी मोल देवून महाराष्ट्र अस्तिवात आणला. त्यानिमित्ताने त्या सर्व हुतात्म्यांंना विनम्र आदरांजली. मात्र आज देखील प्रचंड प्रमाणात मराठी भाषिक प्रदेश असणारा बेळगाव, कारवार निपाणी सह 85 गावे अजूनही महाराष्ट्रात येण्यास इच्छुक आहे, हे विसरता कामा नये. या भौगोलिक प्रदेशाला बाँम्बे कर्नाटक म्हणतात (आपल्या महाराष्ट्रातील मराठवाडा ,विदर्भ , खानदेश समकक्ष)यातील बाँम्बे हा शद्ब आपल्या मुंबईशी नाते जोडतो. ही बाब लक्षात घेयला हवी. एकीकडे हा भाग येवू इच्छित असताना विदर्भ हा स्वतंत्र होण्याची भाषा करतोय. हा मुद्दा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. 
आज महाराष्ट्राचा विचार करता प्रादेशिक असमतोल(आपल्या महाराष्ट्रात 28महानगरपालिका आहेत , ज्यातील प्रत्येकी 4 महानगरपालीका विदर्भ आणि मराठवाड्यात आहे. प्रत्येकी 5 महानगरपालिका उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात आहे. तर सर्वाधिक 10 महानगरपालिका या मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (MMRDA) क्षेत्रात आहे)
 , तसेच वेगाने घटणारे वनाच्छादन ( विदर्भाचा पुर्व भागात ज्याला नाग विदर्भ म्हणतात.याच ठिकाणी सर्वाधिक {नागपूर प्रशासकीय विभाग}वनाच्छादन आढळते) अनिर्बंध नागरीकरणाने निर्माण केलेल्या विविध  समस्या,( उरळी देवाची कचरा डेपो, फुरसुंगी कचरा डेपो, देवनार कचरा डेपो ही त्याची काही प्रमुख उदाहरणे), विविध समाज घटकांचा आंदोलनाने निर्माण झालेली अस्थिरता, रेल्वेचे रखडलेले विविध प्रकल्प (कराड चिपळूण रेल्वेमार्ग, नीरा फलटण रेल्वेमार्ग यांची उभारणी मराठवाड्यातील रेल्वेचे दुपद्रीकरण ही त्याची काही उदाहरणे) कोरोनेत्तर आव्हाने सध्या महाराष्ट्रासमोर आहेत.यासारखी अनेक आव्हाने  यापुर्वीही महाराष्ट्राने लिलया पेलली आहेत. ही आव्हाने सुद्धा महाराष्ट्र लीलया पेलेल , असा विश्वास मला वाटतो. आपणास देखील वाटत असेल असे मनोमनी मानून सध्यापुरते थांबतो, नमस्कार . जय महाराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?