हे पण घडतयं आपल्या सभोवताली !

   

    मित्रांनो, सध्या आपल्या सभोवताली कोरोना आणि लाँकडाउनविषयक चर्चा अधिक प्रमाणात घडत असल्या तरी जगात  आपल्यावर परीणाम अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडी प्रामुख्याने हवामान बदलाविषयी घडत आहेत. त्याविषयी आपणास माहिती देण्यासाठी आजचे लेखन.
तर मित्रांनो, येत्या 22 एप्रिलला अमेरीकेच्या नेर्तृत्वाखाली जगातील 40 देशांची हवामान बदलाविषयी काय कृती कार्यक्रम असावा,हे ठरवण्यासाठी आँनलाईन पद्धतीने एक परीषद होणार आहे. पँरीस करारानूसार  हवामानाची स्थिती 18 व्या शतकात जसी होती, त्या स्थितीत आणण्यासाठी करावयाचा कामांमध्ये यशस्वीतेसाठी गुणांकन करायचे झाल्यास ज्या देशाचा क्रम 7 वा लागेल,(सगळ्यात उत्तमास पहिला क्रमाक नंतर दुसरा या क्रमाने) तो भारत यात सहभागी होणार आहे. या यादीत भारताच्या पुढे स्विडन, नार्वे फिनलंड, डेन्मार्क, चिली, युनाटेड किग्डम आँफ ग्रेट ब्रिटन अँड नाँदर्न आयलंड (आपल्या बोली भाषेत इंग्लड) हे देश आहेत.{ मी ही यादी ते ज्या नंबरवर आहेत, त्यानुसार बनवलेली नाही.फक्त पुढे असणाऱ्या देशांची यादी बनवलेली आहे} भारताने या करारानूसार 2030पर्यत आपल्या एकूण उर्जैपैंकी 40% उर्जा ग्रीन उर्जा प्रकारातील वापरणे बंधनकारक होते. आज 2021 साली म्हणजे ही मुदत संपायचा 9 वर्ष  आधी हे प्रमाण 38% आहे. तापमानवाढीच्या निष्कर्षावर सुद्धा भारताची प्रगती उत्तम आहे. या उलट स्थिती अमेरीकेची आहे. एका सर्व्हैक्षणानूसार जवळपास 80% अमेरीकन्स हवामान बदल अस्तिवात नाही किंवा यामध्ये मानवाच्या औद्योगिकीकरणाचा काही सहभाग आहे, हेच मानत नाहीत.  याउलट भारताची स्थिती आहे.
      जागतिक हवामानबदलाचा अभ्यास करता पश्चिमी युरोपीय देश आणि अमेरीका यांचे  जागतिक तापमानवाढीत योगदान सुमारे 40% आहे. त्यांनी स्वतःचा विकास करण्यासाठी केलेल्या नैसर्गिक संसाधनाच्या वापरामुळे आजची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र हे विकसीत देश नुकतेच विकासाची शिडी चढणाऱ्या भारतासारख्या देशांनी आमच्याच बरोबर योगदान द्यावे, असा धोषा लावत आहे.यामुळे Climatical colonialism ही नविन संकल्पना उदयास आलेली आहे,असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.      हवामान बदल अनेक गोष्टींंमुळे होत आहेत. ज्यातील अनेक गोष्टींंमुळे  हवामान बदल होतो, हेच बहूसंख्याचा गावीही नसते. वाया जाणारे अन्न हा त्यापैकीच एक घटक. वाया जाणारे अन्न कुजते, त्यामुळे तापमानवाढीस साह्य करणारे कर्बवायू तयार होतात. परीणामी तापमान वाढते. माझ्या एका वाया गेलेल्या अन्नातून किती ग्रीन हाउस गँसेस तयार होतील? असा विचार करुन चालणार नाही.थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनूसार जगभरातील एकूण अन्न नासाडीचा विचार करता , हे प्रमाण खुप जास्त होते. त्याच प्रमाणे बदलत्या जीवनशैलीत उदयास आलेल्या अधिक वस्तूचा उपभोग घेण्याचा वस्तूमूळे अनेक उत्पादने तयार होतात. त्यातील जीन्स पँट सारख्या वस्तूचे उत्पादीत होताना अनेक विषारी पदार्थ तयार होतात.ज्याची आंतीम परीणीती तापमानवाढीत होते. आपल्या प्रत्येकाला झाडे लावणे शक्य नाही. मात्र वर सांगितल्यासारखे तापमानवाढ करणाऱ्या बाबी टाळल्या तरी खुपच उत्तम होईल.
भारतासारख्या जगातील 16% लोकसंख्येचा भार  2.5% भुभागावर वाहणाऱ्या देशावर हवामान बदलाचा विपरीत होत आहे. त्यामुळे आपण त्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे .भारतीय हवामान.खात्याचा एका अहवालानूसार 1900 ते2018 पर्यत भारताचे तापमान 0.6 अंश सेल्यीयसने वाढले आहे. आपण हे कमी करायलाच हवे. यामुळे भारतातील अतिवृष्टी अथवा कोरडा दुष्काळाचे प्रमाण येत्या काही वर्षात वाढलेले आपणास दिसते. ज्याचा आपल्या शेतीक्षेत्रावर विपरीत परीणाम होतो. भारताच्या एकूण जिडीपीचा विचार करता शेतीचा वाटा कमी असेलही【सध्याचा कोरोना संसर्गाचा विचार करु नये 】मात्र त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता याचा परीणाम मोठ्या जनसंख्येवर होत आहे. सबब आपण हवामान बदलाकडे गांभीर्याने बघायला हवे.त्यासाठी भले सि एन एन, चँनेल न्युज एशिया, या सारख्या पुर्णतः परदेशी आणि द हिंदू सारख्या स्वदेशी मात्र बहसंख्य लोकांना परदेशी असणाऱ्या वृत्तपत्राची मदत घेतली तरी बेहत्तर.मी 22 एप्रिल ला काय घडणार याची माहिती मिळवेलच, असा निश्चर्य करुया. मी याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करेलच. तूर्तास इथेच थांबतो,नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?